' ह्या ६ वर्षीय मुलाची वार्षिक कमाई बघून तुम्ही नक्की डोकं खाजवायला लागाल – InMarathi

ह्या ६ वर्षीय मुलाची वार्षिक कमाई बघून तुम्ही नक्की डोकं खाजवायला लागाल

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तुम्ही जेव्हा ६ वर्षांचे होते, तेव्हा काय करायचे तुम्हाला आठवत का? तशी तर ६ वर्षांच्या वयात सामान्य मुले नुकतीच शाळेची पहिली पायरी चढत असतात. या वयात पैसे म्हणजे काय हे देखील त्यांना नीट कळत नसत. पण एक सुपरचाईल्ड आहे, जो ६ वर्षांच्या वयात आम्हा-तुम्हाला लाजवेल एवढं कमावतो आहे आणि तेही केवळ युट्युब व्हिडीओच्या माध्यमातून…

 

Ryan ToysReview-inmarathi06
youtube.com

६ वर्षांचा रियान हा युट्युबच्या एका लोकप्रिय चॅनल ‘Ryan ToysReview’ चा होस्ट आहे, तुम्हाला हे एकूण नक्की आश्चर्य वाटेल की या लहानग्याची एका वर्षाची कमाई ही करोडोंमध्ये आहे.

 

Ryan ToysReview-inmarathi04
youtube.com

रियान हा कुठलाही सामान्य मुलगा नाही. खेळण्यांशी खेळण्याच्या वयात तो वर्षाला ११ मिलियन म्हणजेच ७० कोटी रुपये कमवतो.
अमेरिकेत राहणारा रियान युट्युबचा सर्वात कमी वयाचा स्टार आहे. ‘Ryan ToysReview’ नावाने युट्युबवर या चिमुकल्याचे स्वतःचे चॅनल आहे. याच्या चॅनलवर टाकण्यात येणाऱ्या प्रत्येक व्हिडीओवर लाखो हिट्स आणि करोडो व्ह्युज येतात. युट्युबवर हे चॅनल रियानचे कुटुंब चालवते. ज्यावर रियान खेळण्यांचे रीव्ह्युव्ह देतो. या चॅनलच्या सुरवातीच्या व्हिडीओजमध्ये तो केवळ या खेळण्यांशी खेळताना दिसायचा. पण जसे जसे त्याचे व्हिडीओ हिट होत गेले, त्याने त्या खेळण्यांचे रीव्ह्युव्हज द्यायला देखील सुरवात केली.

 

Ryan ToysReview-inmarathi02
ytimg.com

रियानला खेळणी खूप आवडतात आणि तो युट्युबवर जास्तकरून लहान मुलांचे व्हिडीओज बघायचा. त्यालाही असे वाटायचे की तो देखील युट्युबवर फेमस व्हावा, लोकांनी त्याला देखील बघावे. म्हणून रियानच्या आई-वडिलांनी त्याच्या नावाने चॅनल क्रीएट करण्याचा निर्णय घेतला.
रियान आज युट्युबवर एवढा प्रसिद्ध झाला आहे की, त्याच्या युट्युब चॅनल RyanToysReview चे १० मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत आणि त्याचे ६०० हून अधिक व्हिडिओज आहेत. याच व्हिडीओच्या भरवश्यावर तो वर्षाला करोडो कमवतो. RyanToysReview चॅनल हे युट्युबच्या सर्वात लोकप्रिय चॅनल्सपैकी एक आहे.

 

Ryan ToysReview-inmarathi01
businessinsider.in

हे चॅनल रीयांचे आई-वडील चालवतात. चॅनलवर पूर्णपणे लक्ष देता यावे याकरिता त्याच्या आईने आपली शिक्षिकेची नोकरी देखील सोडली. रियान आता एवढा लहान आहे की कदाचित त्याला हे कळत देखील नसेल की तो युट्युबवर एवढा फेमस आहे.

 

Ryan ToysReview-inmarathi05
youtube.com

फोर्ब्सच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या युट्युब सेलिब्रिटीच्या वार्षिक लिस्ट नुसार, २०१७ मध्ये रियानच्या कुटुंबाकडून चालविण्यात येणाऱ्या या युट्युब चॅनल RyanToysReview ने Pretax Incomeमध्ये जवळपास ११ मिलियन डॉलर कमावले आहे. मागील वर्षी, The Verge ने RyanToysReview चॅनल आणि रियानच्या पालकांचे प्रोफाईल बनवले होते. ज्यांनी मार्च २०१५ मध्ये रीयानचे व्हिडीओज चॅनलवर रिलीज करण्यास सुरवात केली.

 

Ryan ToysReview-inmarathi03
ytimg.com

हळू हळू Ryan ToysReview चॅनल लोकांनी बघायला सुरवात केली, पण जुलाई २०१५ मध्ये रियानचा एक व्हिडीओ वायरल झाला. या व्हिडीओमध्ये “GIANT EGG SURPRISE” होतं, ज्याच्या बॉक्समध्ये Pixar’s “Cars” series च्या १०० हून अधिक खेळणी होत्या. सध्या या व्हिडीओचे व्ह्यूज ८०० मिलियन पर्यंत पोहोचले आहे.

 

Ryan ToysReview-inmarathi
youtube.com

The Verge नुसार, सध्या या चॅनलच्या सबस्क्रायबर्सची संख्या जवळजवळ १० मिलियन आहे. ज्या नुसार दर महिन्याला जाहिरातींमुळे यांची जवळपास १ मिलियन डॉलर एवढी कमाई होते.

यावरून हेच कळून येते की पैसे कमावण्यासाठी मोठ्या ऑफिस, व्यवसायाची नाही तर केवळ प्रतिभेची गरज असते आणि ती या ६ वर्षीय चिमुकल्यात आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?