मोठ्या पायाचे ठसे दिसणं तर काहींना प्रत्यक्ष दर्शन! हे गूढ वाचू तेवढं अगम्य होत जातं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुम्ही चित्रपटांमध्ये हिममानव म्हणजेच यतीला पाहिले असेल. तो एखाद्या महाकाय चिंपाजीसारखा दिसतो, पण खूपच भयानक आणि शक्तिशाली असतो. त्याला हरवणे सोपे नसते आणि ते आपल्याला चित्रपटातून दिसून येते. पण काही जणांचे म्हणणे आहे की, यती हा खऱ्या आयुष्यामध्ये देखील आहे. काहींनी तर त्याला बघितले असल्याचे देखील सांगितले आहे. यतीच्या अस्तित्वावरुन कितीतरी दशकांपासून वाद चालू आहेत. आता पुन्हा एकदा शास्त्रज्ञांनी परत एकदा हे रहस्य उलगडल्याचा दावा केला आहे.
बफलो विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी आपल्या रिसर्चमध्ये असे सांगितले आहे की, हिमालयामध्ये मिळालेले दात, केस, हाडे यांचे नमुने हिममानवाचे नाही आहेत. एका रिपोर्टनुसार, संशोधकांनी एकूण ८ नमुन्यांवर रिसर्च केली आहे, ज्यामधील एक कुत्र्याचा आहे आणि बाकी नमुने आशियाई काळ्या अस्वलाचे आहेत. संशोधकांनी तिबेटच्या पठारावर मिळालेल्या नमुन्यांवर रिसर्च केली होती.
या नमुन्यांमध्ये हाताची कातडी, हाड यांचा समावेश होता. कातडीचे नमुने आशियाई अस्वलाशी मिळतात, तर हाडाचे नमुने तिबेटच्या अस्वलाशी मिळतात. असे काही पहिल्यांदाच झालेले नाही, जेव्हा यतीच्या डीएनएवर संशोधन केले गेले. याआधी देखील अशा प्रकारचे खूप शोध झाले होते, पण तरीदेखील काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नव्हती.
यती नाही अस्वल
या शोधात हिमालयात बघितल्या जाणाऱ्या २३ आशियाई अस्वलांच्या नमुन्यांवर अभ्यास केला गेला. यामध्ये त्यांनी त्या नमुन्यांचा देखील समावेश केला, ज्यांना यतीचे केस म्हटले गेले होते. पण काही मुद्द्यांवरून अजूनही मतभेद आहेत.
जसे, संशोधकांच्या एका टीमचे मानणे आहे की, केसांचा हा गठ्ठा ४० हजार वर्ष जुन्या प्रजातीच्या पोलर बियरचे आहेत. तर दुसऱ्या टीमचे म्हणणे आहे की, हे केस तपकिरी रंगाच्या अस्वलाचे आहेत, सर्वसाधारणपणे हिमालयात दिसतात. त्यांनी सांगितले की, हिमनद्या आणि पर्वतांमुळे हे अस्वल इतरांपासून वेगळे झाले असतील.
असे असून देखील पोलर बियरविषयी दावा करणाऱ्या टीमनुसार, त्यांचे म्हणणे हे नाही की, ते हिमालयात आहेत. पण अशी संभावना आहे की, उच्च हिमालयीन क्षेत्रांमध्ये त्यांच्या उप – प्रजाती असू शकतात. तिथे असे देखील म्हटले जात आहे की, यती तपकिरी अस्वलांची एक उप – प्रजाती असू शकतात.
===
- रशियाने समुद्रात लपवलेल्या ‘या’ महाकाय राक्षसाने अमेरिकेची झोप उडवली होती!
- हे १० प्राणी सुद्धा बुद्धिमत्तेच्या बाबतीत माणसापेक्षा फार मागे नाहीत, बरं का…
===
काय असतात यती?
यतीला बिग फुट, हिममानव, महामानव अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. येती हा खूप वर्षापासून एक रहस्य बनले आहे. कितीतरी टीव्ही चॅनल्स ते वैज्ञानिक यावर रिसर्च करून चुकले आहेत. पण अजूनही हे रहस्य उलगडले, असे वाटत नाही. यती एक विशालकाय माणसासारखा एक जीव आहे, ज्याचे संपूर्ण शरीर केसांनी भरलेले आहे.
त्याच्या एक वेगळ्या प्रकारचा गंध येतो. तसेच, यतीचे पाय मोठे असतात आणि त्याचा आवाज किंचाळण्यासारखा असतो, असे म्हणतात.
यतीला पाहण्याचा दावा १९२५ मध्ये एका जर्मन फोटोग्राफरने केला होता. असे म्हटले जाते की, नेपाळ, भारत आणि तिबेटच्या हिमालयाच्या प्रदेशामध्ये यतीचे घर आहे.
रशियाच्या सायबेरीयाच्या भागामध्ये यती दिसल्याचा दावा केला गेला आहे. १९५३ मध्ये सर एडमंड हिलेरी आणि तेन्जिंग नोर्गेने देखील माउंट एव्हरेस्टवर मोठ्या पायांचे ठसे दिसण्याची गोष्ट केली होती, पण त्यानंतर हिलेरीने आपल्या वक्तव्याचे खंडन केले होते.
२००८ मध्ये एका जपानी एडवेंचररने सांगितले होते की, त्याने देखील मोठ्या पायांचे ठसे पाहिले होते, जे यतीचे असू शकतात.
अशाप्रकारे यतीचे अस्तित्व असल्याचे काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्याचे अस्तित्व स्पष्ट नाही आहे आणि लोकांचे त्याला पाहणे हा त्यांचा भ्रम देखील असू शकतो.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.