' भारतातील शेवटचे “अमृततुल्य” दुकान आहे ११ हजार फूट उंचावर! – InMarathi

भारतातील शेवटचे “अमृततुल्य” दुकान आहे ११ हजार फूट उंचावर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

चहा हे खास भारतीयांचे पेय मानले जाते. भारतात जिथे तिथे चहाप्रेमी बघायला मिळतात. इथे जवळपास सगळीकडेच चहा उपलब्ध असतो.

घरी आलेल्या पाहुण्याला तर चहा पाजल्याशिवाय बाहेर पडू देत नाहीत. अशा या चहाशी सगळ्यांचे खूप जवळचे नाते तयार झालेले आहे.

 

 

“चहाची टपरी” हे एक सार्वजनिक ठिकाण असल्यासारखं असतं. भारतीय जग टपरी-टपरीवर वसलेलं असतं. कॉलेज कुमारांपासून रिटायर्ड आजोबांपर्यंत…सर्वांसाठी गाव-शहरातील चहाच्या टपऱ्या म्हणजे भेटीगाठींचं हक्काचं ठिकाण असतं. त्यासाठीच ह्या टपऱ्या प्रसिद्ध असतात.

प्रत्येकाचे चहा आवडण्याचे ठराविक ठिकाण असते. तिथे ती व्यक्ती वेळात वेळ काढून जातेच जाते. शिवाय एखाद्या नवीन ठिकाणी चहा मिळणे सुरु झाले की तिथे जाऊन चहाची चव बघण्याचाही अनेकांना शौक असतो.

पण तुम्हाला ‘भारतातील शेवटच्या चहा’च्या टपरीबदल कुणी काही सांगितलेय का?

शेवटची टपरी म्हटल्यावर अनेकजण चिंतेत पडले असतील. आता यानंतर चहाच्या टपऱ्यांवर बंदी आली की काय असाही प्रश्न अनेकांना पडला असेल. पण अजिबात काळजी करू नका. ही टपरी जरा वेगळ्या कारणाने शेवटची टपरी आहे. ही टपरी जरा वेगळ्या कारणाने भारतभर प्रसिद्ध आहे –

“भारतातली शेवटची टपरी” म्हणून.

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात असलेले ‘माणा’ हे भारतातील शेवटचे गाव…

समुद्रसपाटीपासून ११ हजार फुट उंचावर स्थित हे गाव वर्षातील सहा महिने बर्फाने झाकलेले असते.

या गावापासून अवघ्या २४ किमी अंतरावर भारत-चीन आंतरराष्ट्रीय सीमा आहे. आणि या शेवटच्या गावात असलेले चहाचे दुकान प्रसिध्द आहे ‘भारतातील शेवटचे चहाचे दुकान’ म्हणून… !

 

last-tea-stall-marathipizza01

स्रोत

या गावात इतरही बरीच चहाची दुकानं आहेत. पण सीमेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हे सगळ्यात शेवटचे दुकान आहे. म्हणूनच या दुकानाच्या मालकाने भारतातील शेवटचे चहाचे दुकान असे नाव देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. कितीतरी पर्यटक कुतुहुलापोटी या ठिकाणी आवर्जून येतात.

येथे भेट द्यायला येणारे पर्यटक या दुकानात चहा पिल्याशिवाय आणि येथे फोटो काढल्याशिवाय परत जातच नाहीत!

 

last-tea-stall-marathipizza03

स्रोत

 

हे चहाचे दुकान चंद्रसिंह बडवाल यांच्या मालकीचे आहे. हिंदूंचं तीर्थक्षेत्र, श्री बद्रीनाथ धामपासून ३ किमीवर हे दुकान आहे.

पूवी बद्रीनाथला जाणाऱ्या अनेकांना असलेल्या ह्या दुकानाची माहिती नसे. पण आता प्रसिद्धी मिळाल्यामुळे अनेक लोक आवर्जून दुकानला भेट देऊन जातात.

दुकानाच्या बाजूला लावलेला ‘भारत की आखिरी चाय की दुकान’ हा बोर्ड सध्या ‘सेल्फी पॉइंट’ ठरत आहे.

 

last-tea-stall-marathipizza02

स्रोत

या बोर्डवर भारतातील १० भाषांमध्ये असे लिहिले आहे की, “भारतातील शेवटच्या चहाच्या दुकानामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.”

 

last-tea-stall-marathipizza07

स्रोत

हे चहाचे दुकान महर्षी-व्यासांच्या लेण्यांजवळ स्थित आहे. असे म्हणतात की याच लेण्यांमध्ये महर्षी व्यासांनी गणपती कडून जगातील सर्वात महान महाकाव्य ‘महाभारत’ लिहून घेतले.

या गावाबाबत इतरही अनेक कथा प्रसिद्ध आहेत. पांडव स्वर्गात जात असताना इथून गेले होते असे मानले जाते. त्यावेळी त्यांच्यातील भीमाने बांधलेला पूल म्हणजेच तिथे नदीवर अस्तित्त्वात असणारी  शिळा आहे असेही म्हणतात. त्यामुळेच या दृष्टीनेही हे गाव प्रसिद्ध आहे.

उत्तराखंड सरकारने ‘माणा’ गावाचे असलेले भौगोलिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याला ‘‘Tourism Village’ चा दर्जा दिला आहे. या गावाला भारतातील शेवटचे गाव म्हणूनही ओळखले जाते.

हे भारतातील चहाचे शेवटचे दुकान आहे याची साक्ष देणारा हा एसबीआय बँकेचा बोर्ड!! (प्रूफ हवं असणाऱ्यांसाठी खास 😉 )

 

last-tea-stall-marathipizza04

इथून अगदी जवळच आहे जगातील सर्वात उंच Motor-able Road (म्हणजेच गाडी चालवण्याजोगा, सर्वात उंचावर असलेला रस्ता).

 

last-tea-stall-marathipizza05

भारतातून तिबेट मध्ये प्रवेश करायचा असल्यास तुम्हाला या चहाच्या दुकानाजवळूनच जावे लागते.

गेल्या २५ वर्षांपासून एवढ्या उंचीवर थंडीने गारठून जाणाऱ्या प्रवाश्यांची चहाची तल्लफ हे दुकान भागवत आहे.

 

last-tea-stall-marathipizza06

 

तसे आता इथे अनेक चहाची दुकाने झाली आहेत, परंतु पर्यटकांच्या मनावर याच चहाच्या दुकानाने कायमचा ठसा उमटवला आहे. त्यामुळेच हे दुकान इतके प्रसिध्द आहे.

 

last-tea-stall-marathipizza08

 

पूर्वी या दुकानावर केवळ चहाच मिळायचा, पण आता नुडल्स आणि इतर स्नॅक्स देखील मिळतात. त्यामुळे इथे ग्राहकांचा ओढा अधिकच वाढला आहे.

हा लेख वाचतानाच अनेकांची चहा घेण्याची तल्लफ नक्कीच झाली असेल. ही तल्लफ भागवायला एकदा या ठिकाणीही नक्की जाऊन या…

अतुल्य भारतातील आणखी एक “अमृततुल्य” गोष्ट!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?