' विदेशी ठिकाणांना मागे टाकत हे भारतीय मंदिर बनले जगातील सर्वात जास्त बघितले जाणारे पर्यटन स्थळ – InMarathi

विदेशी ठिकाणांना मागे टाकत हे भारतीय मंदिर बनले जगातील सर्वात जास्त बघितले जाणारे पर्यटन स्थळ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येकालाच नवनवीन ठिकाणी फिरायला जायला आवडते. नवनवीन ठिकाणी जाऊन येथील ठिकाणांची आणि संस्कृतीची माहिती मिळवण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

त्यामुळे माणसे वर्षातून एकदा तरी कुठेतरी लांब फिरायला जाण्याची योजना आखतात. या सर्व कारणांमुळे आपल्या देशातील लोक परदेशात आणि परदेशातील लोक आपल्या देशात पर्यटनासाठी येतात.

त्यातल्या त्यात मंदिरे, प्राचीन शिल्प, लेण्या अशा सांस्कृतिक ठिकाणी पर्यटनासाठी जाण्याचा लोकांचा कल जास्त असतो. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्णमंदिर म्हणजेच ‘गोल्डन टेम्पल’.

 

Golden Temple.Inmarathi
tripoto.com

अमृतसरमधील हे मंदिर खूप खास आहे. मंदिरामध्ये जगातील सर्वात मोठी लंगर चालते. रोज लाखो लोक या मंदिराच्या लंगरमध्ये जेवतात.

तसेच, येथे प्रत्येकजण स्वइच्छेने काम करत असतो, मग ते काम छोटे असो वा मोठे किंवा तो मनुष्य गरीब असो वा श्रीमंत.

या मंदिरात सर्वांना समान वागणूक दिली जाते. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांमध्ये या मंदिराबद्दल एक वेगळीच श्रद्धा आणि आपुलकी आहे.

जीवनात कधी फिरायचे प्लॅनिंग केले, तर नक्की अमृतसरच्या या सुवर्ण मंदिराला भेट द्या.

या मंदिराचा इतिहास आणि वर्तमान एवढा गौरवशाली आहे की, कुणीही एकदा तरी येथे जाण्याची इच्छा नक्की मनामध्ये धरेल.

हे मंदिर खूपच सुंदर आणि विशाल आहे, त्यातील नक्षीकाम अप्रतिम आहे. या मंदिराच्या गौरवामध्ये आता अजून भर पडली आहे, कारण हे मंदिर जगातील सर्वाधिक बघितले जाणारे पर्यटन स्थळ बनले आहे.

या मंदिराला हा पुरस्कार ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ (WBR) द्वारे मिळाला आहे. डब्लूबीआर ही लंडनमधील एक कंपनी आहे, जी जगभरातील सर्व रेकॉर्ड्सवर नजर ठेवते.

२४ नोव्हेंबरला शुक्रवारी डब्लूबीआर पुरस्कारची भारतीय जनरल सेक्रेटरी सुरभी कौल आणि डब्लूबीआर पंजाबचे अध्यक्ष रणदीप सिंग कोहलीद्वारे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) चे मुख्य सचिव रूप सिंग आणि दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा तेज सिंग समुंदरी हॉल येथे पार पडला.

 

Golden Temple.Inmarathi1
hindustantimes.com

हा पुरस्कार दर तीन महिन्यांनी देण्यात येतो. या पुरस्कारासाठी सप्टेंबरपासून सुवर्ण मंदिरात येणाऱ्या श्रद्धाळूंवर नजर ठेवण्यात आली होती.

सुवर्ण मंदिराच्या व्यतिरिक्त जगभरातील सर्वात जास्त पाहण्यात येणाऱ्या पर्यटन स्थळांमध्ये शिर्डीमधील साई बाबा मंदिर, वैष्णव देवी आणि माउंट आबू देखील आहे.

डब्लूबीआरने सुवर्ण मंदिरात येणाऱ्या लोकांच्या ठेवलेल्या रेकॉर्डच्यानुअसार, सुवर्ण मंदिरामध्ये प्रत्येक दिवशी जवळपास एक लाख लोक येतात.

भारतातील डब्लूबीआरचे अध्यक्ष संतोष शुक्ला म्हणाले की,

“हा पुरस्कार म्हणजे एकप्रकारे या सुवर्ण मंदिराला आम्ही वाकून नमन केल्यासारखे आहे.” रणदीप सिंग कोहली म्हणाले की, २ महिन्यांपूर्वीच पंजाबच्या आमच्या कमिटीने संतोष शुक्ला यांना सुवर्ण मंदिराची या पुरस्कारासाठी शिफारस केली होती.

 

Golden Temple.Inmarathi2
haanji.com

या पर्यटन स्थळांच्या व्यतिरिक्त आता अमृतसरमधील अटरी – वाघा बॉर्डर आणि दुर्गियाना मंदिर या पर्यटन स्थळांची या पुरस्कारासाठी नावे देण्यात येणार आहेत. त्यामुळे अजून काही भारतातील पर्यटन स्थळांना यामुळे पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

देशातील इतर काही पर्यटन स्थळे देखील खूप प्रसिद्ध आहेत आणि ही पर्यटन स्थळे देखील लवकरच हा पुरस्कार पटकावतील अशी आशा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?