ज्या द्रव्यानं डायनासोर संपले, तेच द्रव्य माणसांना कॅन्सर मुक्त करु शकेल?!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लाखो वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर डायनासोर्सचे अस्तित्व होते. हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. आपण विविध चित्रपटांमध्ये हे डायनासोर कशाप्रकारचे असतील आणि त्यांचा काळ कसा असेल, हे बघितलेले आहे.
मानवाने आपल्या कल्पनाशक्तीचा मोठा वापर यासाठी केलेला आहे.
या डायनासोर्सचे अस्तित्व या पृथ्वीवरून नष्ट झाले. त्यांचे अस्तित्व नष्ट होण्यासाठी कारणीभूत असलेल्या लघुग्रहापासून कर्करोग बरा होऊ शकतो, असे एका प्राध्यापकाचे म्हणणे आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया, याबद्दलची संपूर्ण माहिती..
डायनासोअर्सच्या विनाशाचे कारण बनलेला लघुग्रह हे मानवी आरोग्यासाठी एक वरदान बनले आहे.
युनायटेड किंग्डममधील वॉर्विक विद्यापीठ आणि चीनमधील सन यट – सेन विद्यापीठाच्या संशोधकांनी असे दाखवून दिले आहे की, उल्कापातातील एक दुर्मिळ धातू कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकतो.
इरीडीयम पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एक अविश्वसनीय घटक आहे. पण काही अंतराळातील खडकांमध्ये त्याचे भरपूर प्रमाण आहे. आपल्या पृथ्वीला कोटिंग केलेल्या क्ले लेयरमध्ये इरीडीयम सापडते. याच लेयरमुळे डायनासॉरचे अस्तित्व नष्ट झाले होते.
संशोधनासाठी शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय टीमने इरीडीयम आणि सेंद्रिय पदार्थाचे एक संयुग तयार केले. त्यानंतर लेझरवर लक्ष केंद्रित करून कृत्रिम अवरोध निर्माण केले. त्यामुळे त्या मटेरियलचे ऑक्सिजनमध्ये परावर्तन होऊन उच्च उर्जा असलेले ऑक्सिजन तयार होतो.
हे कर्करोगाच्या पेशींवर मात करून त्या नष्ट करतात. संशोधकांनी सांगितले की, या प्रक्रियेमध्ये तुमच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
वॉर्विक विद्यापीठाच्या कुकसन चीव्ह या रसायनशास्त्र संशोधकाने सांगितले की,
“हे नवीन इरीडीयम आधारित संयुगे कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करतात आणि प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी येणारा अडथळा दूर करण्यास मदत करतात. कर्करोगावर हा उपाय खूप उपयोगी आहे.”
इरीडीयम हा मुळातच १८०३ मध्ये नैसर्गिक प्लॅटिनममध्ये असलेल्या अशुद्धीमध्ये सापडला होता. सामान्यतः किमोथेरेपी उपचारामध्ये आढळणारा हा घटक आहे. त्यामुळे कदाचित इरीडीयममध्ये कर्करोगावर उपचार करण्याचा गुणधर्म असेल, यात काही आश्चर्याची बाब नाही.
“मौल्यवान धातू प्लॅटिनमचा ५० टक्क्यांपेक्षा जास्त वापर कर्करोगाच्या किमोथेरेपीमध्ये केले जातो. अशाच मौल्यवान धातूंपैकी इरीडीयम हे आहे, जे कर्करोगाच्या पेशींवर प्रभावीपणे हल्ला करून एका वेगळ्याप्रकारे कर्करोग बरा करण्यास मदत करतात.
हे वापरण्यासाठी देखील सुरक्षित आहे आणि याचे दुष्परिणाम खूपच कमी प्रमाणात आहेत.” असे प्रोफेसर पीटर सॅडलर यांनी सांगितले आहे. पीटर सॅडलर हे देखील या संशोधनाचे सह – लेखक आहेत.
आंतरराष्ट्रीय सहयोग यामुळे वाढण्याची शक्यता आहे.
६६ दशलक्ष वर्षापूर्वी एखाद्या लघुग्रहामुळे आताचा भयानक असा कर्करोग बरा होऊ शकतो.
या संशोधनामुळे कर्करोगाने पिडीत असलेल्या रुग्णांना पारंपारिक उपचारांपेक्षा जलद गतीने रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे आता कर्करोग हा भयानक रोगांंमध्ये गणला जाणार नाही. यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना आता नक्कीच दिलासा मिळणार आहे.
कर्करोग अर्थात कॅन्सरचे समूळ उच्चाटन करणे आज तरी सहजशक्य होत नाही. कॅन्सरच्या प्रत्येक रुग्णाला वाचवणे अजून तरी शक्य झालेले नाही. कदाचित हा शोध कर्करोगाच्या उपचाराकरिता एक अत्यंत महत्त्वपूर्ण पायरी ठरू शकेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.