रात्र होण्यापूर्वी “या” मंदिरातून वेळीच बाहेर पडा, अन्यथा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतात कित्येक अशी ठिकाणं आहेत जिथलं रहस्य अद्यापही उलगडलेलं नाही.एखादी गुहा असो, भव्य असा राजवाडा असो किंवा एखादा रस्ता, त्याबद्दलची गुढता आजही काय आहे. ही गुढता खरी की केवळ कथांपुरती मर्यादित यावर नेहमी वाद होतात, चर्चा रंगतात.
पण काहीही असो, अशा जागांबद्दलचं कुतुहल मात्र दिवसेंदिवस वाढत हे मात्र खर. आपल्या देशात अनेक आश्चर्यकारक गोष्टी बघायला मिळतात. अशाच एका मंदिराबद्दल आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत, जिथे माणसं दगडाची बनून जातात.
राजस्थानमध्ये एक असे मंदिर आहे, तिथे जर कोणी रात्री थांबलं तर तो माणूस दगड बनून जातो.विश्वास बसत नाहीये? तसं ऐकताक्षणी यावर कुणाचाही विश्वास बसणं तसं कठीण आहे. मात्र मंदिरात रात्रीअपरात्री घडणा-या या घटनांच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
या कथेनुसार मंदिरात दिवसा तर लोकं असतात पण रात्री हे मंदिर पूर्णपणे सुनसान होऊन जाते. मात्र या मंदिराचं वैशिष्ठ्य असं की, रात्री भयाण वाटणारं हे मंदिर प्रत्यक्षात अत्यंत सुंदर आहे. या मंदिराची शिल्पकला तुमचं मन मोहून घेईल.
एवढी सुंदर शिल्पकला असलेल्या या मंदिराला आजही हवी तेवढी लोकप्रियता मिळालेली नाही.
या मंदिराला किराडू मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात आहे.
या मंदिराची शिल्पकला एवढी आकर्षक आहे की याला राजस्थानचे खजुराहो देखील म्हटले जाते. पण दुर्दैवाने या मंदिराला मध्यप्रदेशातील खजुराहो मंदिराएवढी लोकप्रियता नाही मिळाली.
हे मंदिर कित्येक वर्षांपासून असंच सुनसान आहे.
–
- अनेक तास देवदर्शनासाठी रांगेत उभे राहणारे भाविक मात्र ‘या’ मंदिरात जायला घाबरतात
- शंकर आणि विष्णूची एकत्रित पुजा होणाऱ्या या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो
–
या मंदिरात रात्र काढणारा माणूस दगड होऊन जातो, असे मानले जाते.
असं म्हणतात की, एका ऋषींच्या श्रापामुळे हे मंदिर आणि येथील गाव हे मागील ९०० वर्षांपासून सुनसान आहे.
यामुळे मंदिर रात्री निर्जन असतं…
शेकडो वर्षांआधी या गावात एक ऋषी त्यांच्या काही शिष्यांसोबत आले होते.
या ऋषींनी त्यांच्या शिष्यांना मंदिरात राहण्यास सांगून ते देशभ्रमंती करिता निघून गेले. जेव्हा ते ऋषी या मंदिरात परतले तेव्हा त्यांनी बघितले की त्यांच्या शिष्यांची प्रकृती खूप खराब झाली आहे.
त्यांच्या शिष्यांची अशी अवस्था असून देखील गावातील कोणीही त्यांची मदत केली नाही हे बघून ऋषी संतापले. तेव्हा त्यांनी रागात येऊन या गावाला शाप दिला की,
‘जिथल्या लोकांचे मन दगडाचे आहेत, ते मनुष्य म्हणून राहण्या योग्य नाही, त्यामुळे येथील सर्व लोकं दगडाचे होऊन जातील.’
पण गावातील एका महिलेने ऋषींच्या शिष्यांची मदत केली होती. त्यामुळे ऋषींनी त्या महिलेवर दया दाखवली आणि तिला हे गावं सोडण्यास सांगितले. ते महिलेला म्हणाले की,
‘तू सायंकाळ व्हायच्या आत गावं सोडून दे आणि जाताना मागे वळून बघून नकोस.’
त्या महिलेला ऋषीचे म्हणणे खोटे वाटले म्हणून तिने मागे वळून पाहिले आणि ती देखील दगडाची बनली.
त्या महिलेची दगडरुपी मूर्ती आजही त्या मंदिरापासून थोड्या अंतरावर बघायला मिळते. त्यानंतर जो कोणी या गावात सायंकाळ नंतर थांबायचा तो दगड बनून जायचा अशी आख्यायिका आहे.
–
- हे मंदिर बंद असतानासुद्धा यातून होणारा प्रचंड घंटानाद जगाला बुचकळ्यात टाकतो…
- या मंदिरात श्रीकृष्णाबरोबर राधा नव्हे तर चक्क मीराची पूजा केली जाते!! वाचा
–
म्हणूनच या मंदिरात दिवसा तर लोकं दिसतील पण येथे रात्री कोणीही थांबत नाही.
दगड होण्याच्या भीतीने सायंकाळ होताच हा परिसर पूर्णपणे शांत होऊन जातो.
या किराडू मंदिराची निर्मिती १०-११ शतकात झाली असल्याचं सांगितल्या जातं पण ते कोणी बनवलं याबद्दल काही ठोस माहिती नाही. पण येथे अनेक राजघराण्यांनी राज्य केलं.
इतिहासकारकांच्या मते एकेकाळी या ठिकाणी सर्व सुख-सुविधा होत्या.
इतर गावांप्रमाणे हे गावं देखील एक परिपूर्ण गावं होते. पण मुगलांच्या आक्रमणानंतर हे गावं निर्जीव झाले, मात्र मुगलांनी १४ व्या शतकात आक्रमण केले होते असं सांगितलं जातं. पण हे गाव १२ व्या शतकापासूनच निर्जीव होते.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.