सर्वात सुंदर म्हणून मान्यता असलेल्या या महिलांना आंघोळ करण्यास मनाई आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सुंदर दिसणं हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. विशेषतः महिलांचा. आपल्या परंपरेत महिलांच्या १४ प्रकारच्या श्रुंगारांचा उल्लेख सर्वश्रुत आहे. दक्षिण कोरियामध्ये तर पुरुषांसाठीही सुंदर दिसण्यासाठीचे कार्यक्रम टिव्हीवर घेतले जातात. त्यात तिथे काहीच गैर नाही.
शहरातील पॉश बाथरूम असू द्या किंवा अगदी एखाद्या नवथर तरुणीने, नयनरम्य निसर्गातील एका झुळझुळणाऱ्या ओढ्यामध्ये मारलेली डुबकी असो, सुंदर दिसण्यासाठी शुद्ध सचैल स्नान हा अगदी महत्वाचा नित्यनेम असतो.
जगभरात सुंदर दिसण्यासाठी असे वेगवेगळे प्रयोग केले जातात.
पण – आफ्रिका, जिथे माणसांचा उगम झाला असं म्हणतात, त्याठिकाणी तिथल्या एका आदिवासी जमातीबद्दल एकदम वेगळीच परिस्थती आहे.
हिंबा जमातीच्या महिलांना आफ्रिका खंडात सर्वात सुंदर महिला म्हणून मान्यता आहे. त्या महिलांना आंघोळ करण्यास मनाई आहे, किंवा आंघोळ करणं हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही.
तरीही या महिला सर्वात सुंदर !
अशी कोणती सौंदर्य प्रसाधनं वापरतात या महिला ? पुढे जाणून घेऊया.
पाण्याने हात धुण्यास मनाई
जगातील सर्वात जास्त आदीवासी जमाती आपल्याला आफ्रिकेत पहायला मिळतात. सर्वाधीक जंगलं ही आफ्रिकेत आहेत. आफ्रिकेतील लोकं इतरांच्या तुलनेत वेगळी आहेत.
हिंबा जमातीचे लोक उत्तर आफ्रिकेत नांबिया देशातील कुनैन प्रांतात राहतात. इतर आदिवासी जमातींप्रमाणे त्यांच्याही ठरावीक रिती, रुढी व परंपरा आहेेत.
कुनैन प्रांतात २० ते ५० हजाराच्या आसपास या जमातीची लोकसंख्या आहे. या जमातीच्या महिलांना पाण्याने हात धुण्यासही मनाई आहे.
स्वतःला स्वच्छ ठेवण्याचा यांचा एक वेगळा प्रकार आहे.
विशेष झाडपाल्याच्या धुराचा करतात वापर
हिंबा जमातीच्या महिला काही ठराविक झाडपाला पाण्यात उकळून त्या झाडपाल्याच्या धुराची वाफ घेतात. त्यामुळे त्यांच्या अंगाला दुर्गंधी सुटत नाही. तर त्या झाडपाल्याचा सुगंध त्यांच्या अंगाला येतो. असं धुर घेतल्यामुळे त्यांना फ्रेश वाटतं.
–
- अंघोळ करताना केलेली फक्त “ही” एक गोष्ट कित्येक आजारांना कायम दूर ठेवेल…
- ६७ वर्षांत अंघोळही न करणारा तो, आरशात स्वतःला न्याहाळून कसं दिसायचं ते ठरवतो!
–
प्राण्यांच्या चरबीचे लोशन अंगाला लावतात
आशिया खंडाप्रमाणे इथे मोसमी पाऊस नसतो. तसंच शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय नाही. त्यामुळे उरदनिर्वाहासाठी आफ्रिकन लोकं शिकार करतात. प्राणीच त्यांच्या जगण्याच्या उपजिविकेतले महत्वाचे साधन आहे.
त्याच प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेले लोशन हिंबा महिला आपल्या अंगाला लावतात.
प्राण्यांच्या चरबीत हॅमेटाइट मिसळून ते अंगाला लावल्याने या महिलांच्या अंगकांतीचा रंग लाल होतो. हे मिश्रण लावल्याने त्यांचे उनापासून रक्षण होते. तसंच त्यांना किडे देखील चावत नाहीत.
पाणी न वापरण्याचं कारण
हिंबा जमातीच्या लोकांमध्ये स्त्री पुरुष समानता आहे. तसंच हे लोक निसर्गाला आपला देव मानतात.
नैसर्गिक गोष्टींचा अपव्यय होऊ नये म्हणून हिंबा महिलांना पाण्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.
आकर्षक केश रचना
सर्व आफ्रिकन जमातींपेक्षा हिंंबा जमातीच्या महिलांचे केस वेगळे आहेत. त्या आपल्या केसांना लावायला प्राण्यांची चरबी व चिखल वापरतात. तसंच या महिलांना झोपतेवेळी वेगळी उशी घेण्याची गरज नसते. त्या आपले केस गुंडाळून ते उशाला घेतात.
केसांसाठी वापरत असलेली सामग्री ही देखील पारंपारिक आहे. त्यामुळे त्यांना याचा कोणताही साइडइफेक्ट होत नाही. तसंच या महिलांची केसं गळत नाहीत.
केश रचनेचे प्रकार
–
- प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर, ह्या बायकांमध्ये पाळली जाणारी ही प्रथा ‘अमानवी’ आहे!
- विश्वास बसणार नाही, पण भारतातील या गावात “स्त्रिया” चक्क ५ दिवस निर्वस्त्र राहतात
–
हिंबा जमातीत केशरचनेचे प्रकार महिलांच्या वयानुसार तसंच विवाहित व अविवाहित असण्यावरूनही ठरते.
अविवाहित मुली डुकराच्या शेपटीचा वापर आपली केश रचना करताना वापरतात. तसंच जुळ्या मुलांना जन्म दिलेल्या महिला एकच पोनी टेल बांधतात. त्यावरून समाजातील लोकांना लक्षात येतं की या महिलेला जुळी मुलं आहेत.
वयात आलेल्या मुली केसांची लड चेहऱ्यावर घेऊन चेहरा झाकतात. जेणेकरून पुरुषांनी त्यांना पाहू नये…!
हिंबा जमाती विषयी
हिंबा ही आफ्रिकेतील आधुनिक जमात आहे. ते सरकारी मदत स्विकारतात. तसंच नव्याने आणि समाजउपयोगी बदल स्विकारतात. हिंबा महिला त्यांच्या मुलांना शाळेत पाठवतात.
त्याचप्रमाणे या आदिवासी जमातींना नव्याने शेती विषयक प्रशिक्षण स्थानिक सरकार देत आहे. त्याद्वारे हिंबा समाज आपली प्रगती करतो आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.