नव्या नोटांमधील हे १० बदल आवर्जून समजून घ्या!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
मोदी सरकारच्या नोट बंदीला एक वर्ष उलटलय. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बाद करत ५०० आणि २००० नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. जुन्या नोटांच्या तुलनेत या नवीन नोटा फार वेगळ्या आहेत. यांचा रंग तसेच साईज देखील वेगळा आहे. पण याव्यतिरिक्त देखील काही खास आहे या नोटांमध्ये जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…
१. स्वच्छ भारता अभियानाचा लोगो
नव्या 50, 200, 500 आणि 2000 नोटांवर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आहे. यासोबतच या अभियानाचे घोषवाक्य ‘एक कदम स्वच्छा की ओर’ देखील लिहिण्यात आले आहे.
२.नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो कुठनं घेतल्या गेली
नोटांवर महात्मा गांधीची जी फोटो वापरली जाते, ती ९४६ साली राष्ट्रपती भवनात फ्रेडरिक विलियम पेथिक लॉरेंस यांच्यासोबत घेतलेली आहे. जुन्या नोटांवर या फोटोच्या मिरर-इमेजचा वापर करण्यात आला होता जेव्हा की नवीन नोटांवर वास्तविक फोटो वापरण्यात आला आहे.
३. देवनागरी लिपीत लिहिले आहे आकडे
नवीन नोटांवरील आकडे हे देवनागरी लिपीत लिहिण्यात आले आहे, जेव्हा की जुन्या नोटांवर असे नव्हते.
४. २००० च्या नोटेवर मंगळयान आहे.
२००० च्या नोटेवर मागच्या बाजूला मंगळयान/ मंगळ ऑर्बिटर मिशनची प्रतिमा दाखविण्यात आली आहे. हे भारताच्या पहिल्या इंटर प्लॅनेटरी मिशनचं प्रतिनिधित्व करते. तर १००० चे जुने नोट भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करत होते.
५. ५००च्या नोटेवर लाल किल्ला
५०० च्या नव्या नोटेवर देशाची ऐतिहासिक इमारत लाल किल्ला याची फोटो आहे. सोबतच भारताचा झेंडा देखील आहे. तर जुन्या ५०० च्या नोटेवर दांडीमार्चचं चित्र होतं.
६. २०० च्या नोटवर सांची स्तूप
२०० च्या नव्या नोटमागे सांची स्तूप ची आकृती बनविण्यात आली आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन दगड रचनांपैकी एक आहे. भोपाळ जवळ असलेले सांची तेथील स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे.
७. ५० च्या नोटेवर हम्पी
५० रुपयाच्या नव्या नोटमागे रथासोबत हम्पीचे चित्र आहे. कर्नाटक येथील हम्पीला युनेस्कोने त्यांच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे. जुन्या ५० च्या नोटेवर भारतीय संसदेची आकृती होती. सध्या जुने-नवीन दोन्ही नोट चलनात आहेत.
८. अशोक स्तंभची स्थिती, ग्यारंटी खंड, आरबीआय प्रतिक, महात्मा गांधींच्या चित्राच्या स्थितीत बदल
नव्या नोटांमध्ये अनेक चित्रांचे आणि शब्दांचे स्थान बदलण्यात आले आहे.
• अशोक स्तंभाला उजवीकडे हलविण्यात आले आहे.
• ग्यारंटी खंड, प्रॉमिस क्लॉज आणि गवर्नरच्या स्वाक्षरीला देखील उजवीकडे स्थान देण्यात आले आहे.
• आरबीआयचे प्रतिक हे ग्यारंटी खंडाच्या ओळीत ठेवण्यात आले आहे.
• महात्मा गांधींच्या चित्राची दिशा आणि स्थितीत बदल करण्यात आला आहे.
• दुसऱ्या बाजूवरील भाषेच्या पॅनलला देखील मध्यभागी स्थान देण्यात आले आहे.
९. अंकीय नंबर पॅनलची संख्या वाढविण्यात आली
वरून उजव्या बाजूने आणि खालून डाव्या बाजूने पॅनलची संख्या वाढविण्यात आली आहे.
१०. दृष्टिहीन लोकांसाठी केलेले बदल
जुन्या तसेच नवीन नोटांमध्ये देखील दृष्टिहीन लोकांना नोट ओळखता यावी याकरिता काही सुविधा देण्यात आल्या आहेत. नवीन नोटेमध्ये अशोक स्तंभ आणि महात्मा गांधींच्या चित्राला उठाव देण्यात आला आहे. ओळख चिन्ह आणि ब्लीड लाईन्सच्या मदतीने देखील दृष्टिहीन नोट ओळखू शकतात. नव्या २००० च्या नोटेवर ७ ब्लीड लाईन्स, ५०० च्या नोटेवर ५ ब्लीड लाईन्स तर २०० च्या नोटेवर ४ ब्लीड लाईन्स आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.