' “पत्नी पिडीत पुरुषांचा आश्रम” – इथे चक्क कावळ्याची पूजा होते ! – InMarathi

“पत्नी पिडीत पुरुषांचा आश्रम” – इथे चक्क कावळ्याची पूजा होते !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पती पत्नींवरचे जोक्स आपण वाचतो. त्यामध्ये महिला आपल्या नवऱ्यांना कशा वठणीवर आणतात, नवरे कसे आपल्या बायकांना घाबरून असतात अशा अनेक गोष्टी जोक्सच्या माध्यमांतून सांगितलेल्या असतात, पण कधी जर प्रसंग गंभीर असेल तर? तर पत्नीला सॉफ्ट कॉर्नर मिळतो. जोक्सपण तसेच असतात.

कदाचित त्यामुळे लोकांचा असा समज असेल, पती पत्नीमधील भांडण टोकाला गेलं तर निकाल काही लागो. पण अनेकदा पुरुषही घाबरल्याचे समोर येते. म्हणूनच पत्नी पिडीत पतींसाठी लढणाऱ्या काही संस्था भारतात नव्याने पाय रोवत आहेत.

हल्ली दोघेजण काम करत असल्याने संवाद खुंटला असून डिव्होर्सचे प्रमाण जास्त होत असल्याचेही म्हटले जात आहे.

ज्यावेळी घरचं भांडण कोर्टात जातं, त्यावेळी पुरुषांना आपण नेमकं काय करावं हे कळत नाही. बऱ्याचदा पुरुषांवर गंभीर आरोप असतात. ते खरे खोटे हे ठरवण्याचे काम कोर्ट करतं. पण पुरुषांना कायदेशीर सल्ला आणि धीर देण्यासाठी कुणीतरी हवं असतं.

आता पुरुषांच्याही संघटना तयार झाल्या असून त्यातील एका हटके संघटनेची माहिती आम्ही वाचकांसमोर मांडत आहोत.

 

Ashram for Men Victim in Family Matters - InMarathi 4

 

महाराष्ट्रात औरंगाबाद येथे पत्नी पिडितांसाठी आश्रम आहे. या आश्रमाची महती छत्तीसगढ, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश इथपर्यंत पोहोचली असून पत्नी पिडीत पुरुष तिथून औरंगाबादेतील या आश्रमात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी येतात. औरंगाबादमध्ये शिरडी – मुंबई हायवेवर हा आश्रम असून इथे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

आत्तापर्यंत या आश्रमात पाचशेहून अधिक लोक आले आहेत. इथे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पिडितांना समुपदेशन केले जाते.

 

Ashram for Men Victim in Family Matters - InMarathi 5

 

गमतीशीर गोष्ट म्हणजे – इथे कावळ्याची पूजा केली जाते.

या १२०० स्क्वेअर फुट असलेल्या आश्रमात पहिल्याच खोलीत कायदेशीर सल्लामसलत केली जाते. त्याच ठिकाणी थर्माकोलचा एक मोठा कावळा ठेवण्यात आला आहे. इथे त्याची पूजा केली जाते. ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. इथे कावळ्याची पुजा केली जाते. त्याला कारणही तसं आहे.

कावळी अंडी देऊन निघून जाते. पण कावळा त्या अंड्यातल्या पिलांचे पालण पोषण करतो. म्हणून इथे कावळ्याची पूजा केली जाते.

 

Ashram for Men Victim in Family Matters - InMarathi 7

 

या आश्रमाचे संस्थापक भारत फुलारे यांनी या आश्रमाची सुरवात केली. फुलारे हे स्वतः “पत्नी पिडित” असून ज्यावेळी त्यांचा पत्नीसोबतचा वाद कोर्टात होता त्यावेळी त्यांना सहकार्य करणारे कोणी नव्हते. तसंच त्यांना त्यांचं शहर सोडून बाहेर रहावं लागलं. त्यांचे नातेवाईकही त्यांना भेटायला येत नसत.

दरम्यानच्या काळात तुषार वखरे व इतर तीन समदुःखी लोक येऊन फुलारे यांना भेटले व त्यांनी एकमेकांना मदत केली. तसंच १९ नोव्हेंबर २०१६ रोजी म्हणजेच “पुरुष अधिकार” दिवशी त्यांनी हे आश्रम स्थापन केले. या आश्रमात सध्या सात जण राहतात.

या आश्रमातील पिडीत पुरुष हे  कोणते ना कोणते कौशल्य असलेले आहेत. कुणी टेलर आहे, तर कुणी मॅकॅनिक. हे सर्वजण आपल्या कौशल्याचा वापर करून पैसे कमवतात आणि आश्रम चालवतात.

आश्रमात राहणारे पुरुष स्वतःच स्वयंपाक करतात. तसंच इथे नव्याने येणाऱ्या पिडीत व्यक्तीला खिचडी खाऊ घालतात.

पिडितांची वर्गवारी 

 

wife-troubled-husband-ashram-patni-pidit-inmarathi

 

इथे अनेक लोक आपले गाऱ्हाणे घेऊन येतात. त्यांच्या प्रकरणानुसार त्यांना ए, बी, सी अशा कॅटॅगरीत विभागले जाते. पत्नीच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता उघड भुमिका घेणाऱ्या पुरुषांना ए कॅटॅगरीत वर्ग केले जाते.  तर बी कॅटॅगरीमध्ये ज्या लोकांना पत्नीपासून त्रास आहे, पण समाजाची भिती आहे अशा लोकांना वर्ग केले जाते. तर सी कॅटॅगरीत जे लोक पत्नी व तिच्या माहेरच्यांना घाबरतात त्यांना वर्ग केले जाते.

आश्रमाच्या अटी

तुम्हाला जर या आश्रमात यायचं असेल तर तुमच्या पत्नीने किमान २० केसेस तुमच्यावर दाखल केल्या पाहिजेत.

पोटगी चुकल्यामुळे ज्यांना तुरुंगात जावं लागलं ते इथे प्रवेश घेऊ शकतात.

तसंच पत्नीने केलेल्या तक्रारीमुळे ज्यांची नोकरी गेली त्यांनाही इथे प्रवेश दिला जातो.

आश्रमात प्रवेश घेतल्यावर आपल्या कौशल्यानुसार पैसे कमवणं आवश्य आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे –

दुसऱ्या लग्नाचा विचारही मनात न आणणाऱ्यांनाच इथे प्रवेश दिला जातो…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?