मोसाद आणि रॉ ने हातमिळवणी करून पाकिस्तानी न्यूक्लिअर रिऍक्टर पर्यंत धडक मारली होती!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्या भारताची रॉ नावाची स्वतःची गुप्तचर यंत्रणा आहे. ही गुप्तचर यंत्रणा जागतिक स्तरावर काम करते. रॉ या गुप्तचर संघटनेचे सदस्य कधी आणि कुठे आपले मिशन सुरू ठेवतील, याचा काही नेम नसतो. रॉमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची ओळख गुप्त ठेवलेली असते.
त्यांचा काम करण्याचा अंदाज सर्वांपेक्षा वेगळा असतो. १९७७ मध्ये रॉद्वारे एक मिशन सुरू करण्यात आले होते.
या मिशनचा हेतू पाकिस्तानने गुप्त ठेवलेल्या शस्त्रांच्या जागा शोधून काढणे आणि त्यांच्याकडे अशी किती गुप्त शस्त्रे आहेत, हे शोधून काढणे हा होता. असे म्हटले जाते की, इस्राईलची गुप्तचर संस्था, मोसाद यांनी रॉ ला या मोहिमेत मदत केली होती.
त्यानंतर या जबरदस्त मिशनमध्ये, रॉ च्या एजंट्सनी कहुतामधील नाव्ह्याच्या दुकानातील केसांचे नमुने चोरले. याच नाव्ह्याच्या दुकानामध्ये पाकिस्तानचे अणु शास्त्रज्ञ केस कापण्यासाठी आले होते.
रॉ एजंट या नाव्ह्याच्या दुकानामध्ये गेले आणि त्यांनी केस कापताना लावण्यात येणाऱ्या कपड्यावर पडलेले व खाली पडलेल्या त्या शास्त्रज्ञांच्या केसांचे नमुने चोरले.
या केसांच्या नमुन्यांच्या विकिरण चाचणीनंतर समजले की, कहुतामधील प्लांट हा प्लूटोनियम रिफायनिंग प्लांट होता आणि त्यातून अणू बॉम्ब विकसित करण्यात येणार होते.
आता भारताला ही पुष्टी झाली होती की, पाकिस्तानने खरोखरच आण्विक शस्त्रे बनवायला सुरुवात केली आहे. इस्राईल हा कहुता प्लांटवर सरळ बॉम्ब टाकू इच्छित होता, पण भारताने त्यांना पाठिंबा दिला नाही.
इस्राईलचे मोसाद देखील पाकिस्तानी उभारत असलेल्या अणु शस्त्रांमुळे स्वतःला असुरक्षित मानत होता.
पाकिस्तानमधील अणुप्रकल्पाबद्दल सर्वकाही जाणून घेण्याचे रॉ ने ठरवले. इस्राईलच्या मोसादला याची चिंता भेडसावत होती, कारण पाकिस्तानी अणु प्रोग्रामांचा जनक ए. क्यू. खान याने प्योंगयांगला या उत्तर कोरियाच्या राजधानीला भेट दिली होती.
उत्तर कोरियाकडे खूप नवीन असे अणु शस्त्र होती. त्यामुळे ए. क्यू. खान अणु बॉम्बविषयी काही रहस्य समजले होते.
फ्रान्सने देखील पाकिस्तानच्या हेतूबद्दल चिंता व्यक्त केली. प्लुटोनियम रीप्रोसेसिंग प्लांट तयार करण्याविषयी दिलेला पाठपुरावा फ्रान्सने मागे घेतला. अमेरिकेच्या दबावामुळे फ्रेंच सरकारने सर्व समर्थन काढून घेतले. अमेरिका पाकिस्तानचे उघडपणे समर्थन करत नव्हते.
फ्रेंचचा सपोर्ट गेल्यामुळे पाकिस्तान जरा चिंताग्रस्त झाला होता, पण त्यानंतर त्याने आपले सर्व लक्ष कहुता प्लांट विकसित करण्यासाठी लावले, तसेच मनुष्यबळ आणि संसाधने तिकडे केंद्रित केली.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या सर्व गोष्टींविषयी जनरल झिया-उल- हक यांच्याशी फोनवर संभाषण केले आणि पाकिस्तानच्या सिक्रेट प्लॅनविषयी जाणून घेतले.
पण ही गुप्त माहिती बाहेर पडली आणि पाकिस्तानला समजली. पाकिस्तानने तातडीने रॉ चे सर्व नेटवर्क डाऊन केले आणि त्यांनी इस्राईलकडून होणाऱ्या बॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी अमेरिकेशी करार केला.
आपल्या भारताचे सरकार देखील जागतिक स्तरावर इंटलिजन्स एजन्सी वाढवण्यासाठी उत्साही नव्हती, मोरारजी देसाई यांनी तर रॉ च्या बजेटमध्ये देखील कपात केली आणि त्यांचे मिशन्स देखील कमी केले.
पण भारताच्या या महान मोहिमेनंतर पाकिस्तान नेहमीच अणु रहस्य गुप्त ठेवण्यास बॅकफूटवरच राहिला. रॉच्या इतिहासतील हे एक सर्वात हुशार ऑपरेशनपैकी एक ऑपरेशन होते. जर त्यावेळी हे भारताला समजले नसते, तर पाकिस्तानने भारतावर कधीही हल्ला केला असता.
त्यामुळे या धाडसी मिशनसाठी आपल्याला रॉ चे मनापासून आभार मानले पाहिजेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.