राजधानी एक्स्प्रेस पेक्षा जलद ट्रेनची चाचणी यशस्वी!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
====
भारतामध्ये राजधानी आणि तत्सम ट्रेन्स ह्या सगळ्यात जलद धावणाऱ्या trains आहेत. परंतु लवकरच ह्या ट्रेन्सचा “सर्वात जलद ट्रेन” हा नावलौकिक संपुष्टात येईल. ज्यांच्या बरोबर गतीची competition करण्यासाठी स्पेन मधून मागवलेली “Talgo” येत आहे.
प्रायोगिक तत्वावर मागवलेल्या Talgo train च्या बऱ्याचश्या चाचण्यांपैकी एक महत्वाची चाचणी नुकतीच. ही चाचणी होती मुंबई-दिल्ली प्रवासाची.
नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल चं 1384 कि.मी. अंतर Talgo ने फक्त ११तास ४८ मिनिटांमध्ये पूर्ण केलं , वेग होता १५० कि.मी. प्रति तास !
Indian Railways च्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार Talgo १७ सप्टेंबरला नवी दिल्लीहून दुपारी २:४५ वाजता निघाली आणि १८ तारखेस, पहाटे २:३३ ला मुंबई सेंट्रलला पोहोचली.
या पूर्वीही ह्याच route वर Talgo च्या ४-५ चाचण्या झाल्या होत्या परंतु त्या १३०-१४० कि.मी. प्रति तासांच्या गतीने झाल्या होत्या.
Talgo चे coaches (डब्बे) हे खूप कमी वजनाचे बनवलेले असल्यामुळे engine ला ते ओढण्यास जास्त शक्ती लागत नाही. म्हणूनच ही ट्रेन फास्ट धावू शकते.
Talgo चे coaches नुसतेच हलके नसून ते वळणावरती अगदी सहजरित्या वाकतात ह्या technology मुळे वळ्णावरच्या route वर सुद्धा स्पीड maintain ठेवली जाऊ शकते जी सध्याच्या trains मध्ये शक्य नाही.
ह्या आणि अश्या अनेक features ने उद्युक्त Talgo आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेली असून त्यामध्ये बर्याचश्या facilities आहेत.
Indian Railways ला नवीन गोष्टी try करण्यासाठी खरंच सलाम!
त्यांचे वेगवेगळे प्रयत्न बघता “भारतीय रेल्वे” चे खूप “चांगले दिवस” येतील ह्यात शंका नाही!
Source:ViralSection
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.