' बॉलिवुडलाही भुरळ घालणा-या, शूटिंगच्या सर्वात सुंदर १० जागा! – InMarathi

बॉलिवुडलाही भुरळ घालणा-या, शूटिंगच्या सर्वात सुंदर १० जागा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलीवूड म्हणजेच हिंदी सिनेसृष्टी, भारतातील दोन गोष्टी खूप चालतात यातील पाहिलं म्हणजे क्रिकेट आणि दुसर म्हणजे बॉलीवूड आणि चालायला पण का नको, तीन तासांसाठीच का होई ना पण ते पडद्यावरील कलाकार मन भारूब आपलं मनोरंजन करतात, तेवढ्या वेळासाठीच खरे पण आपण इतर सर्व चिंता विसरून समोर सुरु असणाऱ्या चित्रपटाशी समरस होतो.

पण या चित्रपटांमध्ये केवळ अभिनेता किंवा अभिनेत्रीच महत्वाची नसते तर ज्या ठिकाणी त्या चित्रपटाचे शुटींग झाले आहे ते ठिकाणही अत्यंत महत्वाचे असतात. कधी कधी तर आपण ती ठिकाणे पाहून अगदी भारावून जातो.

 

natural seen InMarathi

 

कधी ना कधी तुमची देखील अशी इच्छा झाली असेल की, या चित्रपटांत दाखविण्यात येणाऱ्या ठिकाणांची तुम्ही देखील मज्जा लुटावी. कारण ती ठिकाण असतातच एवढी रम्य की तिथे जाऊन ती बघण्याची इच्छा होणारच..

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अश्या ठिकाणांची माहिती सांगणार आहोत ज्याचं सौंदर्य आणि तेथील निसर्ग बघून बॉलीवूड देखील थक्क झाले आणि त्या ठिकाणांना चित्रपटात महत्वाचे स्थान दिले…

चला तर मग जाणून घेऊ या काही अश्या ठिकाणांबद्दल ज्यांच्या मोहात पडण्यापासून बॉलीवूड स्वतःला वाचवू शकले नाही…

१. ‘दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके’… परदेसचं हे गाण आजही तेवढच सुंदर वाटत जेव्हा ते पहिल्यांदा ऐकल्यावर वाटायचं आणि या गाण्याची सुंदरता आणखीच वाढते जेव्हा शाहरुख फतेहपुर सिक्रीमध्ये हातात गिटार घेऊन हे गाण म्हणतो.

आग्रा येथील फतेहपुर सिक्री ही ‘बॉलीवूड्स स्पेशल’ या कॅटेगरीत येते. परदेस ते जोधा अकबर हे गाजलेले चित्रपट याच इंडो-इस्लामिक वास्तुकलेच्या उत्कृष्ट नमुन्याने जगाला दिले.

 

Fatehphur-Sikri-Agra-InMarathi

 

२. ‘ये जवानी है दिवानी’, या रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या  चित्रपटामध्ये दाखविले गेलेले मनाली येथील हिडींबा देवीचे मंदिर हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. या मंदिराच्या चहू बाजूंना गर्द वनराई आणि हिरवळ आहे.

 

hidimba devi temple InMarathi

 

३. ‘दिल चाहता है’ या चित्रपटातील एका दृश्यामध्ये समुद्रकिनारी असलेल्या एका किल्ल्याच्या तटबंदीवर बसलेले तिघे मित्र दाखविले आहेत. हा किल्ला गोव्यामधील बार्देझ येथील चापोरा फोर्ट असून, या चित्रपटामध्ये दिसल्यानंतर इतर ही अनेक चित्रपटांमधील काही दृश्यांचे चित्रीकरण येथे करण्यात आले.

 

chapora-fort-goa-dil chahta hai InMarathi

 

४. ‘’जब वी मेट’ या चित्रपटातील ‘ये इश्क हाये’ हे अत्यंत लोकप्रिय झालेले गाण रोहतांग पास येथे चित्रित करण्यात आले होते. प्रेक्षकांना या गीताबरोबरच या गाण्याचे लोकेशनही विशेष पसंत पडले.

 

rohtang pass jab we met InMarathi

 

५. ‘थ्री इडीयट्स’ या चित्रपटातील आमीर खान आणि करीना कपूर यांच्या भेटीचे शेवटचे दृश्य लडाख येथील पँगोन्ग लेक येथे चित्रित करण्यात आले होते. ह्या लेकच्या निळ्याशार पाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पडली होती.

चित्रपटामध्ये दाखविलेला पँगोन्ग लेक बघून अनके पर्यटकांनी लेह-लडाख चा फेरफटका मारला.

 

Pangong-lake Inmarathi

 

६. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ मधील ‘कश्मीर मैं, तू कन्याकुमारी’ ह्या गाण्याचे चित्रीकरण मुन्नार येथील चहाच्या बागांमध्ये झाले आहे. मुन्नार दक्षिण भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.

‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटामध्ये देखील काही दृश्यांमध्ये डोंगरातून जाणारी ट्रेन आणि त्याच्या जोडीने डोंगरातून कोसळणारे धबधबे दाखविण्यात आले आहेत. ही दृश्ये दुधसागर फॉल्स जवळील रेल्वे लाईन वर चित्रित करण्यात आली आहेत.

 

munnar-hillstation-InMarathi

 

७. ‘शोले’ हा चित्रपट त्या काळात प्रसिद्धीचे विक्रम मोडणारा ठरला. यामध्ये गब्बर राहात असलेल्या डोंगरी भागाचे चित्रीकरण कर्नाटक राज्यातील रामनगर भागामध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटातील अनेक दृश्ये रामनगर भागातच चित्रित करण्यात आली आहेत.

 

ramnagar InMarathi

 

८. ‘बोल बच्चन’ या चित्रपटामध्ये अजय देवगणचे निवासस्थान म्हणून दर्शविली गेलेली वास्तू राजस्थान मधील चोमू या ठिकाणचे ‘चोमू पॅलेस’ आहे. ही वास्तू अतिशय भव्य, देखणी आहे. ‘भूल भूलैया’ या चित्रपटाचे चित्रीकरण देखील याच ठिकाणी झाले होते.

 

chomu palace InMarathi

 

९. ‘रावण’ ह्या अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चनच्या चित्रपतातील काही दृश्यांमध्ये प्रचंड धबधबे पहावयास मिळतात. हे धबधबे केरळ राज्यामधील ‘अथिरापिल्ली फॉल्स’ आहेत.

 

athirappilly water falls InMarathi

 

१०. ‘रंग दे बसंती’चा तो सीन आठवतो जेव्हा ते सर्व मित्र धावतात आणि भारतीय वायुसेनेच्या जेटकडे बघत उडी मारतात. खूप छान सीन होता तो आणि अगदी मस्तपणे टिपण्यात देखील आला होता.

पण तुम्ही त्या सीन मधील ठिकाण बघितलंय. ते ठिकाण म्हणजे दोहारा किल्ला. जो त्या सीन नंतर RDB म्हणून ओळखला जातो.

 

doraha fort InMarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?