तृतीयपंथीयांसाठी रेल्वे ने स्वतःत घडवून आणलाय एक मोठा बदल
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
ट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथी यांना आपल्या देशात काही न काही कारणांमुळे नेहमीच डिवचले जाते. अगदी पूर्वीपासूनच आपल्या सामाजाने यांना कधीही मानाने जगण्याचा अधिकार दिलेला नाही. तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही. लोकांची निंदा सहन करून देखील त्यांनी यश प्राप्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वीच एक तृतीयपंथी न्यायाधीश बनली, तिचे नाव जोयिता मंडल आहे. ही पहिलीच तृतीयपंथी न्यायाधीश आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म नेहमीच भरतो, त्यात लिंगामध्ये सहसा मेल आणि फिमेल हे दोनच पर्याय असतात. रेल्वेच्या आरक्षण फॉर्ममध्ये देखील दोनच पर्याय असतात.
पण रेल्वेने आता एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, हा ऐतिहासिक निर्णय असा की, रेल्वे तिकीट आरक्षणाच्या फॉर्मवर आता तृतीयपंथीना देखील स्थान देण्यात येणार आहे. रेल्वे तिकीट आरक्षण आणि तिकीट रद्द करणाऱ्या फॉर्मवर स्त्री आणि पुरुष यांच्या बरोबरच तिसरा पर्याय देखील असणार आहे. रेल्वे बोर्डाने आदेश दिल्यानंतर नवीन फॉर्ममध्ये तिसऱ्या पर्यायाच्या रूपाने तृतीयपंथीना जागा देण्यात आलेली आहे.
रेल्वे बोर्ड डायरेक्टर (पॅसेंजर मार्केटिंग) विक्रम सिंग यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये सांगितले आहे की, लवकरच या फॉर्मवर या तिसऱ्या पर्यायाला नमूद करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘T’ या अक्षराचा वापर करण्यात येणार आहे. तृतीयपंथी ‘T’ ह्या अक्षरासमोर टिक करू शकतात. रेल्वेचे आरक्षण करणारा प्रवासी हा स्त्री आहे की पुरुष हे समजण्यासाठी, स्त्रियांसाठी ‘F’ आणि पुरुषांसाठी ‘M’ हा पर्याय देण्यात आलेला असतो. त्यामध्येच हा तिसरा ‘T’ हा पर्याय असणार आहे. या आदेशामध्ये रेल्वेसाठी आयटीचे काम करणारी कंपनी क्रिस हिला सांगितले आहे की, ते ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्थेमध्ये देखील मेल, फिमेलच्या बरोबरच ट्रान्सजेंडरचा पर्याय ठेवावा, जेणेकरून कोणी तृतीयपंथी असल्यास या पर्यायावर टिक करू शकेल.
रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की,
वास्तविकतेमध्ये तृतीयपंथींशी जोडलेल्या या प्रकरणामध्ये सामाजिक अधिकार मंत्रालयाच्या वतीने संसदेमध्ये सादर करण्यात आलेल्या बिल आणि इतर न्यायालयीन आदेशांना पाहता या प्रकरणाचे पुनरावलोकन करण्यात आले होते. त्यानंतर निर्णय घेण्यात आला की, तृतीयपंथीना देखील तिसऱ्या लिंगाच्या पर्यायामध्ये घेतले पाहिजे.
या कारणामुळे आता रेल्वे आपल्या फॉर्ममध्ये मेल, फिमेल म्हणजेच स्त्री, पुरुष यांचासाठी दर्शवण्यात आलेले M आणि F यांच्या बरोबरच तृतीयपंथींसाठी फॉर्मवर T चा पर्याय देणार आहे. हा तृतीयपंथीसाठी खूपच योग्य निर्णय आहे, कारण त्यांना त्यांच्यासाठी वेगळा पर्याय असणे गरजेचे होते.
पहिले रेल्वेच्या आरक्षण फॉर्मवर हा पर्याय नव्हता, त्यामुळे तृतीयपंथी यांना आरक्षण मिळवणे थोडे कठीण जात असे, पण आता त्यांना योग्य पर्याय निवडून हक्काने रेल्वेमधून प्रवास करता येणार आहे. या रेल्वेच्या निर्णयामुळे तृतीयपंथी लोकांना काही प्रमाणात देशाच्या एका वाहतूक सेवेमध्ये आपली वेगळी ओळख दाखवण्याची चांगली संधी मिळणार आहे.
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.