पशुपालनाचा ‘साड्डा हक’ आता टॅक्सेबल…!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
टॅक्स… हा शब्द जरी उच्चारला तरी लोकांना घाम फुटायला लागतो. त्यातच आता सरकारने GST चा बॉम्ब टाकल्यावर तर कित्येक व्यापारी आणि उद्योजकांच्या नाकीनऊ आलेत. भलेही हा टॅक्स देशाच्या विकासासाठी वापरण्यात येत असला तरी देखील तो चुकविण्यासाठी लोक नाना प्रकारचे फंडे वापरत असतात. एकूणच काय तर देशाचा विकास कुणाला हवाय इथे तर सर्व आपले खिसे भरण्यात मग्न आहेत आणि त्यात हे सरकार एकावर एक टॅक्स लावत चालली आहे. नाही का? आता हेच बघा ना.. कालपरवा एक बातमी आली की आता कुत्रे, मांजरी इत्यादी पाळीव प्राणी पाळण्यावर देखील कर आकारण्यात येई.. म्हणजे असं कोण करत.. कुणी पाळीव प्राण्यांवर कर लावतो का?
इकोनॉमिक्स टाईम्सच्या बातमीनुसार पंजाब येथे सध्या पंजाब राज्यात याच विषयावरून वाद पेटलाय. काही महिन्यांआधी पंजाबच्या समाना जिल्ह्यात एका व्यक्तीला कुत्रा चावल्याचं प्रकरण समोर आलं होतं. ज्यानंतर रस्त्यावरील बेवारस कुत्र्यांच्या त्रासापायी त्याने भरपाईची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने नगर पालिकेला याला जाब विचारला. त्यासोबतच न्यायलयाने जनावरांमुळे लोकांच नुकसान झाल्यास भरपाई करिता पालिकेच्या पॉलिसी बद्दलही विचारणा केली.
या बाबत आता सरकार तर्फे नोटीस देखील जाहीर करण्यात आली आहे. पण राज्यसरकार मंत्री नवजोत सिंह सिद्धू यांनी यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, ‘सरकारतर्फे कुठलाही नवीन टॅक्स आकारण्यात येत नाहीये. तर नगर पालिका अॅक्ट १९७६ नुसार हा प्रावधान आधीपासूनच आहे की, पालिकांच्या अंतर्गत येणाऱ्या पाळीव पप्राण्यांना पाळण्याकरिता पालिकेत त्या संबंधी नोंदणी केली जावी.’
‘न्यायालयाच्या निर्णयानंतर याबाबत केवळ एक पॉलिसी तयार करण्यात आली आहे. ज्या माध्यमातून विरोधीपक्ष लोकांची सरकारप्रती दिशाभूल करत आहेत’, असेही सिद्धू यांनी सांगितले.
सरकारी नोटिफिकेशन नुसार, कुत्रे-मांजरी, डुक्कर, बकरी आणि मेंढी यांसारख्या जनावरांना पाळण्याकरिता २००-२५० रुपये नोंदणीकरण शुल्क द्यावे लागेल. तर या व्यतिरिक्त गाय-म्हैस, उंट-घोडा आणि हत्ती यांसारख्या प्राण्यांना पाळण्यासाठी ५०० रुपयांपर्यंत शुक्ल आकारल्या जाईल. यासोबतच नोंदणीला दर वर्षी रिन्यू करावे लागेल. नोंदणी झाल्यानंतर जन्वारांच्या गळ्यात एक पट्टा घालण्यात येईल, ज्यावर त्याचा नोंदणी क्रमांक लिहिलेला असेल. हा पट्टा नेहेमी जनावरांच्या गळ्यात ठेवावा लागेल. ज्यामुळे कधीही त्याच्या मालकाची ओळख पटू शकेल. याशिवाय त्यांना मायक्रोचिप देखील लावण्यात येऊ शकते.
राज्य सरकारने आतापर्यंत गाय सेस च्या नावावर कित्येक वस्तूंवर कर आकारणी केली आहे. त्यात भर म्हणून आता पशुपालणावरही कर आकारला जाईल म्हटल्यावर लोकांमध्ये पशुपालनामध्ये जी थोडीफार रुची असेल तीही संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page