लष्कराला मिळणार modern शिरस्त्राण?
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आता एक अजून नवीन ठोस अश्या निर्णयाचा अपवाद बनवण्याची संधी सरकारकडे आली आहे. ती म्हणजे जवानांचं बेसिक प्रोटेक्शन – हेल्मेट्स ची खरेदी.
गेल्या दोन दशकांपासून भारतीय लष्करातून वजनाने हलक्या पण मजबूत अशा ballistic हेल्मेट ची मागणी होत होती. ह्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करासाठी सरकारकडून एक नवीन deal sign होण्याच्या मार्गावर आहे. नवीन, अधिक चांगल्या हेल्मेट ची.
आर्मीचे अधिकारी सांगतात – डोक्याला होणारी दुखापत ही सर्वात मोठी समस्या आमच्या समोर आहे. छोट्या चकमकी, धाड टाकतांना डोक्याला होणाऱ्या दुखापतींमुळे जवान दगावतात. त्यात जुने हेल्मेट्स हे वजनाने जड, मोठे आणि कमी मजबूत आहेत. किरकोळ फटका, दगड ह्यांपासून बचाव होतो. आम्हाला 9 मिलीमीटर गोळीपासून मीटर अंतरावर बचाव करणारे हेल्मेट हवे असून, त्याबाबत सरकार विचार करत आहे.
भारतीय उत्पादक असलेल्या MKU शी 170 कोटींमध्ये हा व्यवहार होणार असून, ह्यात 1,58,279 हेल्मेट्स ची order देण्यात येणार आहे.
ह्या हेल्मेट मध्ये 13 mm चं सुरक्षाकवच असेल आणि कमांडर साठीच्या हेल्मेट मध्ये अद्ययावत संपर्क सुविधा असेल.
अत्यंत आवश्यक अश्या हेलिकॉप्टर आणि आणखी हवाई दलाच्या मागण्या कधी पूर्ण व्हायच्यात ते होतील पण ही हेल्मेट ची DEAL लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवी.
ह्या नवीन हेल्मेट्स च्या निर्णयाने, जुन्या जड हेल्मेट मध्ये ‘काम चालवून’ घेणाऱ्या जवानांना नवी उभारी आणि प्रोत्साहन मिळणार आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.