' तुम्ही मोबाईलवर फुकट गेम्स खेळता आणि त्यांना तिकडं अब्जावधी रुपये मिळतात. – InMarathi

तुम्ही मोबाईलवर फुकट गेम्स खेळता आणि त्यांना तिकडं अब्जावधी रुपये मिळतात.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मोबाईल गेम्स तर आपण सर्वच खेळतो. अगदी फावल्या वेळातील टाईमपास असो, थोडासा विरंगुळा असो किंवा रीतसर काढलेला वेळ असो. मोबाईलवर गेम्स खेळणं सगळ्यांनाच आवडतं.

वेगवेगळ्या वयोगटातील मंडळी हे खेळ खेळताना दिसतात. लहानपणी आपण खेळायचो ते ल्युडो आणि सापशिडी वगैरे खेळ सुद्धा आता मोबाईलवर खेळता येतात.

 

ludo-king-inmarathi

 

पजल गेम्स, स्ट्रॅटेजी गेम्स, शूट गेम्स, स्पाेर्ट‌्स गेम्स, वॉर गेम्स, वर्ड गेम्स आणि क्विज असे अनेक प्रकारचे गेम्स उपलब्ध होतात आणि ते आपल्याला उपलब्ध देखील होतात अगदी मोफत!

पण कधी तुम्ही विचार केलाय का जर गेम फ्री मध्येच द्यायचे तर लोक गेम्स बनवतातच का? त्यातून त्यांना काय कमी होते? चला जाणून घेऊया मोबाईल गेम्स मागचं अब्जावधींचं जग!

मोबाईल गेम बनवणे अपेक्षेनुसार सोपे आणि कमी खर्चिक आहे. जर तुमचा गेम यशस्वी ठरला तर त्याद्वारे तुम्ही भरघोस कमाई करू शकता.

 

android-games-marathipizza01
lh3.googleusercontent.com

 

याचे प्रामाणिक उदाहरण फ्लॅपी बर्ड हे आहे. या साध्या गेममध्ये एक छोटा हिरव्या रंगाचा पक्षी मोठ्या पाईपमधून धक्का न लागता उडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला कुठेही आपटू न देणं हे या खेळाचं स्वरूप…

फ्लॅपी बर्डची निर्मिती हनोईच्या २८ वर्षीय डोंग नग्युयेनने २०१३ मध्ये केली होती. तो पाच कोटी लोकांकडून डाउनलोड केला गेला आहे. हा गेम जवळपास ३२ लाख रूपये प्रतिदिन कमावत होता.

पण नग्युयेनने गेम बंद केला कारण तो गेमचे यश आणि त्यामुळे आलेला कामाचा दबाव याला सामोरा जाऊ शकला नाही.

काही गेम त्यापेक्षाही अधिक यशस्वी आहेत. अॅप डाटा साइट थिंक गेमिंगच्या तत्कालीन म्हणण्यानुसार,

पजल गेम कँडी क्रश सागा सरासरी दर दिवशी पाच कोटी ९० लाख रुपये कमाई करतो. स्ट्रेटेजीक गेम क्लॅश ऑफ क्लॅन्सची कमाई प्रतिदिन नऊ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गेम बनवणारी फिनलँडची कंपनी सुपरसेलचे मुल्य ३२० अब्ज रुपयांपेक्षा अधिक आहे.

 

android-games-marathipizza02
lh3.googleusercontent.com

 

ही आकडेवारी फ्लॅपी बर्ड बंद झाला त्या काळातील, म्हणजे साधारणपणे २०१३ आणि २०१४ या वर्षांची आहे.

याशिवाय हे आकडे फक्त अॅपल स्टोरचे आहेत. गुगल प्ले, अमेजन अॅप स्टोर आणि विंडोज फोन स्टोरचे आकडे यात समाविष्ट नाहीत.  त्यानंतर आलेल्या आकडेवारीनुसार मोबाइल गेमद्वारे ग्लोबल कमाई १६०० अब्ज रुपये होती. ही २०१३ च्या तुलनेत ४२ टक्के अधिक आहे.

मोबाईल गेमची कमाई १९०० अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मोबाईल गेम्स पहिल्यांदाच कंसोल गेम एक्स बॉक्स, प्ले स्टेशनला मागे टाकण्याची शक्यता आहे.

तसे, मोबाईल गेम जुन्या पीढीच्या कंसोल गेमपेक्षा वेगळे आहेत. कॉल ऑफ ड्यूटी किंवा असेसिन्स क्रीड सारख्या धमाकेदार कंसोल गेमच्या निर्मितीचे डझनावारी लोक अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्याचे बजेट ६०० कोटी रुपयापेक्षा अधिक आहे.

मात्र, मोबाईल गेम कमी किचकट आहेत. तुम्ही त्याची निर्मिती कमी खर्चीत तुमच्या बेडरुममध्ये करू शकता. डूडल जंप हा खेळ दोघा भावांनी मिळून २००९ मध्ये तीन महिन्यात बनवला होता.

टाइनी विंग्स हा एका जर्मन प्रोग्रामरने बनवला होता. हा गेम तब्बल ८८ देशांत क्रमांकावर होता.

 

android-games-marathipizza023jpg
images-amazon.com

 

काय म्हणताय? कळलं ना लोक उगाच मोबाईल गेम्स बनवण्यात वेळ वाया घालवत नाहीत…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?