' B.Sc, MBA करूनही चक्क टॅक्सी ड्रायव्हर! स्वप्न पूर्तीसाठी असाही धाडसी मार्ग! – InMarathi

B.Sc, MBA करूनही चक्क टॅक्सी ड्रायव्हर! स्वप्न पूर्तीसाठी असाही धाडसी मार्ग!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आयुष्यात कोणतेही स्वप्न जर पूर्ण करायचे असेल, तर त्या स्वप्नाच्या मागे धावणे तेवढेच गरजेचे आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये कोणते न कोणते स्वप्न आपल्या उराशी बाळगून असतो, पण प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण होतीलच असे नाही.

जीवनात नुसती स्वप्ने बघून काहीच होत नाही, जर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटला नाहीत तर तुमची स्वप्ने अपुरीच राहतील.

आज खूप कमी लोक असे आहेत, जे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वकाही सोडण्याची तयारी दर्शवितात.

अश्याच एका मुंबईच्या माणसाने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला कॉर्पोरेट जॉब सोडला. चला मग आज आपण जाणून घेऊया या अज्ञात माणसाबद्दल…

 

quit_your_corporate_job-inmarathi
TraderScooter.com

ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ ने एका अशाच माणसाची गोष्ट सोशल मिडीयावर शेयर केली आहे. या माणसाने सांगितले की,

‘खूप विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला की, मी आपला जॉब सोडून आपले पूर्ण लक्ष पीएचडीच्या एन्ट्रन्स परीक्षेमध्ये लावणार, पण हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते, कारण घर चालवण्यासाठी देखील पैश्यांची आवश्यकता होती. त्यामुळे मी अभ्यासासोबतच कॅब चालवण्याचा निर्णय घेतला.’

 

taxi InMarathi

 

मायक्रोबायोलॉजीमध्ये बी.एस.सी आणि मार्केटिंगमध्ये एम.बी.ए केल्यानंतर जर एखादा माणूस कॅब ड्रायवर बनायचा विचार करत असेल, तर समाज त्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणारच. असेचं काहीसे या माणसाबरोबर झाले होते.

त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना सर्व वेड्यात काढत होते.

 

indian_woman_hails_taxi_InMarathi

 

पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांचे म्हणणे आहे की-

‘ड्रायव्हिंग करताना म्हणजेच कॅब चालवतेवेळी मी वेगवेगळ्या लोकांना भेटलो. अभ्यासाच्या बरोबरच माझे घर देखील चांगल्याप्रकारे चालत आहे, त्यांना यामुळे कोणत्याही प्रकारची उणीव निर्माण झालेली नाही. लोकं मला ड्रायव्हर बोलत असत आणि ते मी आनंदाने स्वीकारत असे.’

 

humans_of_bomay_InMarathi

 

या माणसाने आपल्या कारमध्ये लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि एक चांगले वातावरण कारमध्ये निर्माण करण्यासाठी काही गरजेचे बदल केले आहेत. ज्यामध्ये ह्यांनी कारमध्ये मासिकाबरोबरच वाय-फाय आणि बिस्कीट ठेवले आहेत.

 

taxi 1 InMarathi

त्याचबरोबर आपले आवडते गाणे लावण्याची सुविधा देखील या कारमध्ये करण्यात आलेली आहे.

काम आणि अभ्यास या व्यतिरिक्त हा माणूस लोकांच्या मदतीसाठी देखील नेहमी तयार असतो.

जेव्हा मुंबईत जोरदार पाऊस पडला होता आणि मुंबईकरांचे अतोनात हाल झाले होते. त्यावेळी या माणसाने एका मुलीची मदत केली होती. ज्याला त्या मुलीने एका फेसबुक पोस्टद्वारे शेयर देखील केले होते.

 

cab driver 1 InMarathi

 

या माणसाच्या निर्णयावरून हे लक्षात येते की, आपली स्वप्ने पूर्ण होतील याची वाट पाहण्यापेक्षा, ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि ती कशी पूर्ण होतील याचा विचार केला पाहिजे.

अश्या या ध्येयवेड्या अज्ञात व्यक्तीकडून आपण नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?