दिवसातून केवळ २ तासांसाठी खुला होतो हा ‘अजब रस्ता’ !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी अतिशय अजब आहेत. म्हणजे तिथे असं काही विचित्र घडतं असतं की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. अश्याच अजब ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे फ्रान्समध्ये, चला पाहूया एवढं काय खास आणि अजब आहे ह्या ठिकाणामध्ये!
फोटोत तुम्ही जो रस्ता पाहत आहात हा रस्ता केवळ एक किंवा दोन तासांसाठीच दिसतो. इतर वेळी हा रस्ता समुद्राच्या भरतीमुळे पाण्याखाली असतो. सगळीकडे पाणीच पाणी असते. हा रस्ता मेनलँडला नोयरमौटियर आइलँडला जोडला जातो. तो फ्रान्सच्या अटलांटिक कोस्टवर आहे.
रस्त्याची लांबी ४.५ किमी आहे. फ्रान्समध्ये हा रस्ता ‘पॅसेज डू गोइस’ (Passage du Gois) नावाने ओळखला जातो. तर फ्रेंचमध्ये ‘गोइस’चा अर्थ ‘बूट ओले करून रस्ता पार करणे’ असा होतो. १७०१ साली सर्वप्रथम हा रस्ता नकाशावर दाखवण्यात आला.
हा रस्ता पार करणे अत्यंत धोकादायक समजले जाते. एक ते दोन तासांसाठी मोकळा झालेला हा रस्ता अचानक दोन्ही किनाऱ्यांवरून पाणी येऊ लागल्याने पाण्याखाली जातो. त्याची खोली जवळपास ४ मीटरपर्यंत जाते. एका रिपोर्टनुसार या रस्त्यावर दरवर्षी अनेक लोकांचे अपघात होतात.
एकेकाळी याठिकाणी प्रवास करण्यासाठी केवळ बोट हे एकच वाहतुकीचे साधन होते. पण काही वर्षांनंतर बॉरनेउफच्या खाडीमध्ये गाळ जमा होऊ लागला. त्यानंतर याठिकाणी एक पक्का रस्ता तयार करण्यात आला. एका रिपोर्टनुसार १८४० मध्ये येथे कार आणि घोड्यांच्या माध्यमातून लोकांनी येणे जाणे सुरू केले होते.
1987 पासून येथे एक अजब रेस आयोजित करण्यात येते. ही रेस पाण्याची पातळी वाढण्याआधी संपवावी लागते. १९९९ मध्ये या रस्त्याचा वापर ‘टूर दी फ्रान्स’ (फ्रान्सची प्रसिद्ध सायकल रेस) साठीही करण्यात आला होता.
अश्या ह्या अजब ठिकाणाला एकदा भेट द्यायलाच हवी…हो ना?
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.