दिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो? तसं नाहीये! वाचा जगभरातील दिवाळीबद्दल…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
दिवाळी हा सण म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. दिवाळीच्या दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशात संपूर्ण देश उजळून निघतो. जमिनीवर दिव्यांची आरास तर आकाशात रंगीबिरंगी रोषणाई असे काहीसे दिवाळीचे चित्र असते. संपूर्ण देश त्या रोषणाईखाली एकवटला जातो.
दिवाळी हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.
पण हा सण केवळ आपल्याच देशात आनंदाचा प्रकाश पसरवतो असं नाही, तर तो भारताव्यतिरिक्त कितीतरी देशांत साजरा केला जातो. आणि नुसताच साजरा केला जात नाही तर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
ज्या देशात भारतीयांची संख्या जास्त आहे अश्या देशांत तर दिवाळीला सरकारी सुट्टी दिली जाते. आज आपण अश्याच देशांबद्दल जाणून घेणार आहोत.
१) सिंगापूर :
सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंची संख्या आहे. या देशात १८ हिंदू मंदिरं आहेत. येथे सेरंगू नावाचा रस्ता हा दिवाळीसाठी खूप प्रसिद्ध आहे. या भागाला लिटील इंडिया म्हणून देखील ओळखले जाते.
या ठिकाणी सर्व भारतीय मिळून दिवाळी साजरी करतात. विशेष म्हणजे ते दिवाळी साजरी करण्यासाठी फाटाक्यांचा वापर करत नाही. हा सण साजरा करत असताना जेवढा आनंद भारतीयांना होत असत तेवढीच या सणाची मजा सिंगापूरवासी देखील लुटतात.
२) थायलंड :
थायलंड एक असा देश आहे, जिथे केवळ दिवाळीच नाही तर जगातील कित्येक सण साजरे केले जातात. थायलंडमध्ये दिवाळी हा सण ‘लम क्रीयओंघ’ या नावाने साजरा केला जातो.
येथे दिवाळीला केळ्याच्या पानांचा दिवा बनवून त्यात एकशिक्का आणि मेणबत्ती ठेवण्याची परंपरा आहे. त्यानंतर त्या दिव्याला नदीत सोडल्या जात. मग लोकं एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि सोबत जेवण करतात.
३) जपान :
जपान येथे देखील दिवाळी हा सण साजरा केला जातो. पण येथे हा सण साजरा करण्याची पद्धत ही भारतीयांच्या अगदी विरुद्ध आहे.
हे लोकं त्यांच्या बगीच्यात कंदील आणि कागदी पारडे लटकवतात. तसेच ते आकाशात उडणारे कंदील सोडतात.
या दिवशी जपानचे आकाश हे या कांदिलांनी पूर्णपणे भरून जाते, हा देखावा खरोखरच मन मोहून टाकणारा असतो. दिवाळीच्या रात्री इथले लोकं मिळून गाणे गातात आणि नाचतात, याप्रकारे उत्साहाने ते दिवाळीचा हा सण साजरा करतात.
४) श्रीलंका :
श्रीलंका हा देश केवळ आपला शेजारी देश नसून त्याचे भारताच्या धार्मिक इतिहासाच्या दृष्टीने फार मोठे महत्व आहे. आपल्या पुराणांतील ‘रामायण’ या पुराणाशी श्रीलंकेचा संबंध तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच श्रीलंकेतील नागरिकांसाठी या दिवसाचे फार महत्व आहे.
येथे दिवाळीच्या दिवशी लोकं आपल्या घरांना चीनीमातीच्या दिव्यांनी सजवतात. आपण जेवढ्या उत्साहात हा सण साजरा करतो तेवढ्या उत्साहात श्रीलंका निवासी करत नाहीत, तरीदेखील ते एकमेकांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देतात.
५) म्यानमार :
म्यानमार हा देश भारताच्या पूर्व सीमेला लागून आहे. म्यानमार येथे देखील भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तिथेही दिवाळीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दिवाळीच्या दिवशी येथील भारतीय लोकं देवी-देवतांची मनोभावे पूजा-अर्चना करतात. त्या दिवशी स्वादिष्ट भोजन आणि निरनिराळी मिठाई बनविण्यात येते. त्यासोबतच ते आपली सांस्कृतिक गाणी व नृत्याचे प्रदर्शन देखील करतात.
६) गुयाना :
दक्षिण अमेरिकेच्या पूर्वोत्तर तटावर स्थित गुयाना हा देश. या देशात हिंदू धर्माचे लोकं मोठ्या प्रमाणात आहेत.
१८५३ सालापासून गुयाना येथे दिवाळी हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो आहे. तसेच या दिवशी राष्ट्रीय सुट्टी देखील देण्यात येते.
७) मॉरीशस :
मॉरिशसचा रामायणासंदर्भात स्वतःच एक संस्करण आहे, ज्यायोगे ते हा उत्सव साजरा करतात. मॉरीशसवासीयांच्या मते या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला होता. ६३ टक्के भारतीय आणि ८० टक्के हिंदू असलेल्या या देशात दिवाळी खूप उत्साहात साजरी केली जाते.
८) इंडोनेशिया :
इंडोनेशियात देखील दिवाळी साजरी केली जाते. या देशात भारता प्रमाणेच दिवाळी साजरी करतात. बाली आयलंड मध्ये भारतीयांची संख्या जास्त असल्या कारणाने येथे दिवाळीची धूम पाहायला मिळते. इथल्या रामलीला वेळी लोकं इंडोनेशिअन संस्कृतीनुसार तयार होऊन रामलीला सादर करतात.
९) नेपाळ :
जगातील एकमेव हिंदू साम्राज्य असलेल्या नेपाळ या देशात दिवाळी ’तिहाड’ म्हणून साजरी केली जाते.
हा उत्सव पूर्ण पाच दिवस चालतो. याच्या पहिल्या दिवशी हे लोकं गायीची पूजा करतात , दुसर्या दिवशी कुत्र्याची पूजा करतात आणि त्यांना भोजन करवितात.
तिसऱ्या दिवशी भारता प्रमाणेच दिवाळी साजरी होते. या दिवशी गोड-धोड बनविले जाते, देवी-देवतांची पूजा केली जाते आणि घराला सजविले जाते. चवथ्या दिवशी यमाची पूजा केली जाते. तर पाचव्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते.
१०) मलेशिया :
मलेशियात फटक्यांवर निर्बंध आहेत. म्हणूनच येथे दिवाळीत फटाक्यांचा वापर केला जात नाही. येथे दिवाळीला ‘हरि दिवाळी’ म्हणून साजरे करतात.
मलेशियामध्ये दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तेल आणि पाण्याने अंघोळ करण्याची परंपरा आहे. त्यानंतर देवी-देवतांची पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी मलेशियात अनेक ठिकाणी मेळावे देखील भरतात.
दिवाळी हा एक भारतीय हिंदू सण असून देखील जगातील अनेक राष्ट्रांत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ज्यात भारतीयांसोबतच अभारतीय देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात. यावरून हेच दिसून येत की कुठल्याही सणाला किंवा उत्सवाला जात अथवा धर्माचे बंधन नसते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.