' नासाच्या या पात्रतांचा गंभीरपणे विचार केलात, तर करिअरमध्ये यशस्वी भरारी घ्यायचं तुमचं स्वप्नही पुर्ण होवु शकतं. – InMarathi

नासाच्या या पात्रतांचा गंभीरपणे विचार केलात, तर करिअरमध्ये यशस्वी भरारी घ्यायचं तुमचं स्वप्नही पुर्ण होवु शकतं.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

अंतराळाची योग्य आणि अचूक माहिती नासाला असते. अंतराळामध्ये नासाने खूप यशस्वी प्रयोग केले आहेत.

अंतरीक्ष आणि ब्रम्हांडाला जवळून जाणून घेण्याची इच्छा असणारा प्रत्येक माणूस अमेरिकेची अंतरीक्ष एजन्सी नासामध्ये नोकरी करू इच्छित असतो.

नासामध्ये नोकरी मिळवणे, म्हणजे खूप मोठे यश मिळवण्यासारखे आहे. पण नासामध्ये नोकरी मिळवणे खूप कठीण आहे. नुकतीच नासामध्ये नोकरीची भर्ती चालू होती. त्यासाठी १८३०० लोकांचे प्रस्ताव आले होते, त्यापैकी १२ लोकांनाच भर्ती करून घेण्यात आले.

यावरून तुम्हाला समजले असेलच कि, नासामध्ये नोकरी मिळवणे किती कठीण आहे.

 

Nasa.marathipizza
climateprotection.org

 

नासाची योजना चंद्र आणि मंगळाच्या कितीतरी पुढे जाण्याची आहे. त्यासाठी नासाला साहजिकच मनुष्य बळाची गरज भासणार आहे. ही वेगळी गोष्ट आहे कि, येथे आपल्या सारखा राजकीय आरक्षणाचा काहीही उपयोग होत नाही.

येथे कोणत्याही माणसाला सहज घेतले जाते नाही. नासाला त्यांच्या येथे काम करण्यासाठी योग्य आणि पात्रता असलेल्या लोकांची गरज आहे आणि नासामध्ये भर्ती होण्याची प्रक्रिया देखील खूप कठीण ठेवण्यात आलेली आहे.

जर तुम्ही देखील नासामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुम्हाला या गरजेच्या गोष्टी लक्षात असणे खूप गरजेचे आहे.

तुम्ही नासामध्ये नोकरीसाठी अप्लाय कसे करू शकता  

• या नोकरीसाठी अप्लाय करणारा उमेदवार हा विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग किंवा गणितात पदवीधर असणे गरजेचे आहे.

• याव्यतिरिक्त पदव्युत्तर पदवी आणि त्याच क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. कमीत कमी १००० तास जेट उडवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.

• उमेदवाऱ्यांमध्ये लीडरशीप क्वालिटी, टीमवर्क आणि संवाद करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.

• शैक्षणिक योग्यतेच्या व्यतिरिक्त फिजिकली फिट असणे खूप गरजेचे आहे. याव्यतिरिक्त उमेदवाराची धैर्याची परीक्षा देखील घेतली जाते, आणि नक्कीच ही कोणासाठीही सहज शक्य गोष्ट नाही आहे.

 

Nasa.marathipizza1
voanews.com

 

सर्व काही पास झाल्यानंतरची ट्रेनिंग

जर तुम्ही नासाची परीक्षा पास केलीत आणि नासाच्या सर्व अटी पूर्ण केल्यात, तर तुम्हाला दोन वर्षाची ट्रेनिंग दिले जाते आणि तुमचे मूल्यमापन केले जाते. या ट्रेनिंगच्या दरम्यान खऱ्या मिशनमध्ये कामी येणारे कौशल्य शिकवले जातात.

अंतराळात जाण्याची संधी मिळते

दुसऱ्या स्तरावरील ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्पेसिफिक स्पेस ट्रेनिंग दिली जाते. ज्यामध्ये तुम्हाला सांगितले जाते कि, अंतराळात गेल्यानंतर तुम्ही काय कराल. कॉकपिटमध्ये तुम्हाला स्पेस सूट घालून जावे लागते.

अंतराळात ६ महिन्यासाठी पाठवण्याच्या आधी अॅस्ट्रोनॉटसला दोन ते तीन वर्ष अतिरिक्त ट्रेनिंग दिले जाते.

 

Nasa.marathipizza2
wikimedia.org

 

ही कामे करावी लागतात

अंतराळामध्ये गेल्यानंतर अॅस्ट्रोनॉटसला कितीतरी एक्सपेरिमेंट्स, रिसर्च आणि हार्डवेअरची दुरुस्ती यांसारखी कामे दिली जातात. अॅस्ट्रोनॉटसला वर्षाला १ कोटींहूनही अधिक वेतन दिले जाते.

याचा थोडासा अनुभव मिळाल्यानंतर वेतन एक कोटीपेक्षा जास्त होऊ शकते. एवढे कष्ट केल्यानंतर जर कोणी नासापर्यंत पोहचत असेल, तर त्याला एवढे वेतन मिळवण्याचा पूर्णपणे हक्क आहे.

मग आता आपल्याला समजलेच असेल कि, नासामध्ये नोकरी मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात आणि किती शिक्षण मिळवावे लागते. त्यामुळे तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवून योग्य प्रयत्न केलात, तर तुम्ही ही नोकरी नक्कीच मिळवू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?