' व्यवसायात नफा असो किंवा नोकरीत प्रमोशन – हे गुण असल्याशिवाय शक्य नाही! – InMarathi

व्यवसायात नफा असो किंवा नोकरीत प्रमोशन – हे गुण असल्याशिवाय शक्य नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

थांबा. वाचण्यापूर्वी एक छोटीशी activity करू या.

स्वतःला हा प्रश्न विचारा –

माझ्या आजूबाजूला, करिअरमध्ये यशस्वी असणारे लोक कोण कोण आहेत? ह्यात कुणीही असू शकेल. तुमचा बॉस, आई-वडील, भाऊ-भिन्न, नातेवाईक. कुणीही. पण हे लोक पुस्तकं-चित्रपटांत दिसणारे नकोत. तुम्ही जवळून ओळखता असे हवेत.

आणि डोळे मिटून उत्तर शोधा. छोटीशी यादी करा मनातल्या मनात.

आणि चटकन ह्या सर्वांमध्ये काही समान गुणधर्म सापडताहेत का पहा. फार विचार नका करू – पटकन, स्पष्टपणे समोर येणारे काही गुण, काही सवयी दिसताहेत का?

ह्या सर्वांमध्ये तुम्हाला पुढील १० गुण प्रामुख्याने आढळून येतील.

 

१. ते त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात सक्षम असतात :

 

obama-inmarathi

 

ते नेहमी त्यांच्या कामात कम्फर्टेबल असतात, त्यांना त्याचं काम कसं करायचं आहे हे माहिती असतं आणि त्या कामात कुणीही त्यांचा हात धरू शकत नाही.

त्यामुळे सर्वांना त्यांच्या उपस्थितीची जाणीव असते. तरी ते त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात नेहमी सक्षम असतात. म्हणून ते अहंकारी नाही तर नेहमी सकारात्मक आणि आकर्षक भासतात.

 

२. ते नेहमी शिकण्यास तत्पर असतात :

 

online learning inmarathi2

 

त्यांचा स्वभाव हा जिज्ञासू असतो आणि ते त्यांना आवडणाऱ्या गोष्टींत नेहमी interested असतात. ते नेहमी काहीतरी शिकू इच्छितात, स्वतःला आणखीन grow करण्याचा प्रयत्न करतात. ते समोर येणाऱ्या आव्हानांना स्वतःच्या कौशल्याला वाढविण्याची संधी म्हणून बघतात.

त्यांना मिळालेल्या गौरवानंतर ते शांत बसत नाहीत, जर त्यांना कामात आव्हाने मिळाली नाहीत तर ते त्या कामापासून लवकर त्यापासून कंटाळतात.

 

३. ते सकारात्मक असतात :

 

successfull-man01-marathipizza

 

ते सर्वांचे स्वागत हसत मुखाने करतात. प्रत्येक प्रकल्प उत्साहाने हाताळतात आणि प्रत्येक आव्हानालावर संभाव्य उपाय काढून ते पूर्ण करतात. ते संवेदनक्षम आहेत आणि ते सहजपणे अपयश हाताळत परत नवीन जोमाने कामाला लागतात.

ते अपयशाला यशाच्या मार्गातील एक पाऊल समजतात. ते ऑफिस गॉसिप पासून दूर असतात, ते त्यांच्या मार्गावर ठाम असतात आणि जे काही त्यांच्याकडून शक्य असेल ते करण्यात ते लक्ष केंद्रित करतात.

 

४. त्यांना वास्तविकतेचे भान असते :

 

successfull man08-marathipizza

 

ते एक योजना आखण्यास आणि ती घडवून आणण्यात सक्षम असतात. ते कुठलेही मोठे विचारक नाहीत ज्यांच्यात विचारांची अंमलबजावणी करण्याची क्षमता नसते. ते त्यांच्या धोरणात्मक कल्पना आखण्यास सक्षम असतात आणि ते हे सुनिश्चित करतात की ते कृतीत बदलले जाईल.

 

५. ते परस्पर संबंध जोपासतात :

 

people chatting inmarathi

 

‘जीवन तेच आहे जे तुम्हाला माहित आहे’, ते नेहमी या बोधवाक्यावर विश्वास ठेतात. मित्र, लीडर्स, कर्मचारी आणि संघटनेबाहेरील विचारवंत यांच्यासोबत प्रस्थापित केलेल्या संबंधांचे महत्व त्यांना माहित असते.

ते समजतात की एखादे घट्ट नाते तेव्हाच बनते ज्यावेळी ते वेळोवेळी त्यांच्या परस्पर संबंधांना रिफ्रेश करत असतात.

 

हे ही वाचा –

===

 

६. ते ब्रँडला सर्वात जास्त महत्व देतात :

 

successfull man07-marathipizza

 

ते स्वतः बद्दल स्पष्ट असतात. त्यांना माहिती असते की ते कोण आहेत. कुठली गोष्ट त्यांना त्यांच्या मित्रांपासून दूर करू शकते, कुठली गोष्ट त्यांना जवळ आणते आणि कुठल्या गोष्टीने ते decision makers म्हणजेच निर्णय घेणाऱ्यांना स्वतःकडे आकर्षित करू शकतात.

त्यासाठी ते त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक ईमेल वर, त्यांनी घेतलेल्या प्रत्येक मिटिंगमध्ये आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये त्यांच्या ब्रँडचा उल्लेख करतात.

 

७. ते लोकांचे प्रेरणास्त्रोत असतात :

 

successfull man02-marathipizza

 

जरी त्यांच्याकडे खूप अनुभव नसेल किंवा ते त्यांच्या संघटनेचे सर्वात सिनिअर नसेल तरी ते एक विश्वासू सहकारी असतात ज्यांचे काम बघण्यासाठी नेहमीच लोकं उत्सुक असतात.

 

८. ते उदारमतवादी असतात :

 

successfull man03-marathipizza

 

ते इतरांची मदत करतात आणि त्यांच्याकडे देखील लक्ष देतात. यश हे इतरांना प्रोत्साहन देऊन, मदत करून मिळत असते. एखाद्याला कमी लेखून नाही हे असं ते समजतात.

उदारता ही कधीतरीच दाखवायची नसते हे त्यांना माहित असते. हेच जीवनाचे सूत्र आहे. ते सहजपणे, नियमितपणे आणि सार्वजनिकरित्या प्रशंसा करतात, इतरांना ओळखण्याची आणि त्यांना स्वीकारण्याची वृत्ती ठेवतात.

 

९. ते एक ध्येय ठेऊन चालतात :

 

walking lunges inmarathi

 

ते जबाबदारीने आणि resilience ने आपले ध्येय गाठतात. ते स्वतःचे लक्ष विचलित होऊ देत नाहीत. ते नेहमी त्यांच्या ध्येयाकडे लक्ष ठेऊन असतात मग ते पर्सनली असो वा प्रोफेशनली.

जरी ते आपल्या ध्येयाकडेलक्ष केंद्रीत करून असतील तरी तुम्ही त्यांना बांधून ठेऊ शकत नाही, ते त्यांना मिळालेल्या संधी कधीच चुकवत नाहीत. ते नेहमी त्यांच्या ध्येयाबद्दल विचार करत असतात आणि त्यात वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार हवे ते बदल घडवून आणतात.

 

१०. ते विचार व्यक्त करण्यास वेळ घेतात :

 

 

ते त्यांचे विचार लगेच कोणाला सांगत नाहीत, ते त्यांचे विचार कुणासमोर मांडण्यासाठी वेळ घेतात. ते त्यावर नीट विचार करतात,  त्याच्या सर्व बाजू तपासतात. जर त्यांना तो विचार ती कल्पना पटतेय तरच ते समोरच्याजवळ व्यक्त करतात.

 

हे ही वाचा –

===

 

====

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?