‘ताजमहल’ व्यतिरिक्त जगातील ‘या’ वास्तू प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखल्या जातात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
प्रेम ही एक अशी भावना आहे जी व्यक्त करण्याची गरज नसते असे म्हटले जाते. पण तरीही जगभरात विविध प्रकारे आपले प्रेम व्यक्त केले जाते. अगदी प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.
अनेकदा तर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी असे काही करण्याचा प्रयत्न असतो जे अगदी सहजासहजी शक्य होणार नाही. शहाजहाननेही आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ताजमहाल सारखी अप्रतिम अशी वास्तू उभारली.
आज जगभरात प्रेमाचे प्रतिक म्हणून ती ओळखली जाते. पण जगात प्रेमाचे प्रतिक असणारी ही एकच वास्तू नाही.
अनेक देशांमध्ये अशा काही वास्तू आहेत, ज्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जातात. अशाच काही निवडक वास्तूंबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
मिस्ट्री कॅसल – फिनिक्स, अरिझोना
हे एका पित्याचे आपल्या मुलीसाठी असलेल्या प्रेमाचे प्रतिक आहे. बॉइस गुली यांना जेव्हा टीबी असल्याचे निदान झाले तेव्हा ते सीटल येथील घर सोडून गेली.
बायको आणि मुलीने आपला मृत्यू होताना पाहू नये अशी त्यांची भावना होती. त्याच्याकडे असलेल्या वैयक्तिक संपत्तीतून त्याने एक खाण विकत घेतली.
त्यानंतर पुढील १६ वर्षांमध्ये त्याने नैसर्गिक साहित्याचा वापर करून मुलीसाठी हा अलिशान किल्ला बांधला.
विंचेस्टर मिस्ट्री हाऊस – सॅन जोस, कॅलिफोर्निया
स्वतःच्या प्रेमापोटी ही वास्तू बांधण्यात आली होती. सारा विंचेस्टर ही बंदुकींचा उद्योगपती विल्यम विंचेस्टर याची पत्नी होती.
विंचेस्टर यांनी तयार केलेल्या बंदुकींनी जे लोक मेले त्यांच्या भुतांची बाधा आपल्याला झाली असे साराला वाटत होते. ती सलग ३८ वर्षे ती किल्ला बांधत होती.
यात राहिल्यास भुते आपल्याला काही करणार नाही असा तिचा समज होता. घराची रचना विचित्र होती.
अनेक ठिकाणी भुलभुलैय्या, धोक्याची वळणे होती. भुतांना रस्ता शोधायला त्रास व्हावा म्हणून अशी रचना करण्यात आली होती.
डोब्रॉयड कॅसल – टॉडमॉर्डन, इंग्लंड
श्रीमंत उद्योगपती पित्याचा मुलगा असलेला जॉन फिल्डन, रुथ स्टॅनफिल्ड हिच्या प्रेमात पडला होता. रूथ एका स्थानिक विणकाम करणाऱ्याची मुलगी होती.
जेव्हा जॉनने तिला मागणी घातली तेव्हा रूथने त्याचा प्रस्ताव मान्य केला पण त्यासाठी एक अट घातली.
टेकडीवर एक कॅसल (वाडा) बांधायचा अशी तिची अट होती. त्यासाठी जॉनने हे भव्य कॅसल उभारले.
यामध्ये ६६ लक्झरियस खोल्या, घोड्यांचा तबेला यासह अनेक सोयीसुविधा आहेत.
केलीज कॅसल – बटू गजाह, मलेशिया
मलेशियामधील ही सर्वात जुनी वास्तू म्हणून ओळखली जाते. याचे बांधकाम १९१५ मध्ये सुरू झाले होते.
स्कॉटिश शेतकरी विल्यम केली स्मिथ याने त्याची पत्नी अग्नीज स्मिथ हित्यासाठी हे कॅसल उभारले होते, पण केली स्मिथचा निमोनियाने मृत्यू झाला त्यामुळे याचे काम पूर्ण होऊ शकले नाही.
स्वॅलोज नेस्ट – क्रिमिया, यूक्रेन
या वास्तूच्या कामाची नेमकी सुरुवात केव्हा झाली याबाबत माहिती उपलब्ध नाही.
काही लोकांच्या मते, ही वास्तू प्रेमाचे प्रतिक नसून ती लव्ह मेकिंगसाठी तयार करण्यात आली होती. पण १९१२ च्या सुमारास बांधलेली ही वास्तू एक अत्यंत रोमँटिक ठिकाण आहे.
प्रसात हिन फिमई – फिमर्ई, थायलंड
युवराज पजित आणि सौंदर्यवती ओरापिमा यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता.
एक दिवस जंगलामध्ये फिरत असताना एका लाकूडतोड्याने कु-हाडीने पजितची हत्या केली आणि ओरापिमाला घेऊन गेला.
पण ती रडत बसणाऱ्या मुलींपैकी नव्हती. तिने त्या लाकूडतोड्याची हत्या करून बदला घेतला. त्यानंतर गावी परत येऊन तिने हे स्मारक बांधले.
त्यामध्ये तिने तिच्याच जीवनातील काही प्रसंगांचे पेंटिंग लावले. त्यात प्रजित असलेल्या क्षणांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यानंतर तीने प्रजितच्या पुनर्जन्मासाठी प्रार्थना केली.
एक दिवस एक तरुण आला. तो तिच्या हस्तकौशल्याने भारावून गेला. त्याच्या शरिरात प्रजितचा आत्मा असल्याचे मानत ती आयुष्यभर त्याच्याबरोबर राहिली.
बोल्ट कॅसल – हर्ट आयलंड, न्यूयॉर्क
जॉर्ज बोल्ट याने त्याच्या पत्नीला प्रेमाची आठवण म्हणून ११ इमारती असलेले हे कॉम्पलेक्स भेट केले होते.
१९०५ साली व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर त्याने पत्नीला हे गिफ्ट दिले होते.
स्टार्टफोर्ड कॅसल – डर्बन, दक्षिण आफ्रिका
या कॅसलच्या पायाभरणीच्या दगडारव कोरलेले सर वॉल्टर रेलेघ यांचे शब्द हे प्रेमाची शक्ती स्पष्ट करणारे आणि प्रेरणादायी आहेत.
ते शब्द पुढीलप्रमाणे आहेत, खरे प्रेम हे मनातील कायम धगधगत्या आगीप्रमाणे असते, ते कधीही जुने होत नाही, संपत नाही.
कोरल कॅसल – होमस्टेड, फ्लोरिडा
यामागे एक दुःखद घटना आहे. १९२० च्या सुरुवातीच्या काळात ही घटना घडली. एड लीड्सकल्नीन याची होणारी पत्नी त्याला लग्नाच्या एक दिवस आधी सोडून गेली.
तिच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्याने हा मोठ्ठा वाडा बांधला. त्यासाठी त्याने २८ वर्षे खर्ची घातली. पैशाचा तर हिशोबच नाही.
विशेष म्हणजे लीड्सकल्नीन याने स्वतः केवळ रात्रीच्या वेळी काम करत हा भव्य वाडा बांधला.
अशी आहे ही जगभरातील प्रेमाची स्मारके, ज्यांना एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी….!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.