' सोनिया गांधींपासून ते सचिन तेंडूलकरपर्यंत…..ही आहेत भारतातील ‘अजब’ मंदिरं! – InMarathi

सोनिया गांधींपासून ते सचिन तेंडूलकरपर्यंत…..ही आहेत भारतातील ‘अजब’ मंदिरं!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतीय लोक परंपरा आणि श्रद्धेची नेहमी जपणूक करतात. भारतात तुम्हाला ठिकठिकाणी मंदिरे पाहायला मिळतात. भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, त्यामुळे येथे विविध धर्माची धार्मिक स्थळे पाहण्यास मिळतात. मंदिरांमध्ये देवी – देवतांची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. प्रत्येक मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. देव एकच असला, तरी त्याची मंदिरे कितीतरी आपल्याला दिसून येतात. या देवतांविषयी लोकांच्या मनामध्ये एक आदराचे स्थान असते. देव आपल्याला नेहमी पाहत असतो आणि तो आपल्या अडीअडचणींच्या वेळी नेहमी पाठीशी असतो, असे लोक मानतात. पण आपल्या भारतामध्ये अशीही काही मंदिरे आहेत, जी खूप वेगळी आहेत. ही मंदिरे देवांची नाहीत, एखाद्या वस्तूची किंवा जिवंत माणसाची आहेत. चला तर मग जाणून घेऊया, ही मंदिरे कोणती आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत..

१. कुत्र्याचे मंदिर, चन्नापटना, कर्नाटक

unusual temples.marathipizza
businessinsider.in

वन इंडियानुसार, कर्नाटकातील काही लोकांच्या समूहाने विश्वासूपणाने आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी एक असामान्य मंदिर बांधले आहे. या मंदिराचे नाव ‘द डॉग’ हे आहे. चन्नापटनाच्या रामनगर भागामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. येथे फक्त मंदिरच बांधण्यात आलेले नाही, तर येथील लोक या डॉग देवाची पूजा देखील करतात.

२. अमिताभ बच्चन मंदिर, कोलकत्ता, पश्चिम बंगाल

unusual temples.marathipizza1
deepikaglobal.com

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृतानुसार, कोलकात्याच्या जवळच असलेल्या तिळजाळा येथे अमिताभ बच्चनने सरकार या चित्रपटामध्ये साकारलेल्या सुभाष नागरे या भूमिकेचा येथील लोकांवर खूप प्रभाव पडला आहे. कारागीर सुब्रत बोस यांनी बनवलेली येथील प्रतिमा पूर्णपणे अमिताभच्या ‘सरकार’ या चित्रपटाचे प्रतीक आहे. २५ किलोची ही मूर्ती बनवण्यासाठी बोसने तीन महिने घेतले. ह्या पुतळ्याची पूजा ही केली जाते हे विशेष!

३. भारतमाता मंदिर, वाराणसी

unusual temples.marathipizza2
amazonaws.com

वाराणसीच्या वेबसाईटनुसार, वाराणसीमधील भारतमातेचे मंदिर हे मदर इंडियाला समर्पित आहे. १९३६ मध्ये महात्मा गांधीनी यासाठी पुढाकार घेतला होता. भारतमातेचे हे मॉडेल संगमरवरी असून त्यामधून एकसंध भारत दाखवण्यात आलेला आहे. भारतमातेच्या या मंदिरामध्ये एक अविश्वसनीय गोष्ट म्हणजे, यामध्ये इतर देवी देवतांप्रमाणे मूर्ती नसून संपूर्ण भारत संगमरवरामध्ये कोरण्यात आलेला आहे.

४. सोनिया गांधी मंदिर, महाबूबनगर, तेलंगणा

unusual temples.marathipizza3
ndtvimg.com

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, आंध्रप्रदेशमधील समर्थकांनी सोनिया गांधी यांच्या पुतळ्याचे मंदिर बांधले आहे. तेलंगणा राज्याचे माजी मंत्री पी.शंकरराव म्हणाले कि, “यामार्फत आम्ही सोनिया गांधी यांनी धन्यवाद देत आहोत, कारण त्यांनी वेगळे तेलंगणा राज्य बनवायचे आमचे जुने स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.”

५. करणी माता मंदिर, देशणोक, राजस्थान

unusual temples.marathipizza4
templesofindia.net

राजस्थान डायरेक्टच्या रिपोर्टनुसार, याला उंदरांचे मंदिर असे देखील म्हटले जाते. करणी माता हे जवळपास २०००० पवित्र उंदरांचे निवास्थान आहे. हे मंदिर राजस्थानमधील देशणोक येथे वसलेले आहे. येथे असे मानले जाते कि, करणी माता ही एक प्रेमी स्त्री होती. हे मंदिर पूर्णपणे तिच्यावर सोपवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे, जोधपुर आणि बिकानेरच्या राजघराण्यांची करणीमाता ही कुल देवता देखील आहे.

६. ओम बन्ना मंदिर, जोधपुर, राजस्थान

unusual temples.marathipizza5.
ytimg.com

राजस्थानच्या पाली – जोधपुर रस्त्यावर दररोज अनेक प्रवासी ३५० सीसीवाल्या बुलेट बाबाचे दर्शन घेण्यासाठी थांबतात. प्रवास सुखाचा होण्यासाठी या ईश्वराला विनंती केली जाते.
इंडियन एक्स्प्रेसनुसार, यामागे १९९१ च्या सुमारास घडलेली एक घटना आहे. जवळच्या शहरामध्ये राहणाऱ्या ओम सिंग राठोड यांचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यांची ही बुलेट पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली, परंतु ही बुलेट नेहमी गायब होत असे आणि अपघाताच्या ठिकाणी मिळत असे. त्यामुळे यावर लोकांची श्रद्धा जडली आणि त्यांनी या बुलेटबाबाचे मंदिर स्थापित केले.

७. सचिन तेंडूलकर मंदिर, बिहार

unusual temples.marathipizza6
telegraphindia.com

भारताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि भारतरत्न पटकावलेल्या सचिन तेंडूलकरला क्रिकेटचा देव म्हणून संबोधले जाते. त्यामुळे या देवाची सेवा करण्यासाठी बिहारच्या दक्षिण – पश्चिम भागातील एका गावामध्ये त्याचा पुतळा उभारण्यात आला आहे आणि त्याची पूजा देखील केली जाते. हिंदुस्थान टाइम्सनुसार, भोजपुरी अभिनेता आणि गायक मनोज तिवारी आणि कैमूर जिल्हा दंडाधिकारी अरविंद कुमार सिंग यांनी राजधानी दिल्लीपासून सुमारे १७० किलोमीटर असलेल्या कैमूर जिल्ह्यातील अटारवालिया या मनोज तिवारी यांच्या गावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची ५.५ फुटाची मूर्ती उभारण्यात आलेली आहे.

८. विमान गुरुद्वारा, जालंधर, पंजाब

unusual temples.marathipizza7
dainikbhaskar.com

‘हवाई जहाज’ गुरुद्वारा म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर पंजाबमधील जालंधर येथे आहे. येथे विमानांची खूप लघुरूपे पाहायला मिळतात आहेत. जे लोक परदेशात प्रवास करू इच्छित आहेत, ते शहीद बाबा निहाल सिंह गुरुद्वारा येथे विमानाचे लघुरूप दान करतात. बिजनेस इनसाइडरनुसार, हे गुरुद्वारा म्हणजे परदेशात जाण्याचे तिकीट मानले जाते, खासकरून अमेरिकामध्ये जाण्यासाठी येथे जातात.

अशी ही मंदिरे आपल्याला माहित असलेल्या मंदिरापेक्षा वेगळी आहेत. चला मग वाट कसली बघताय, एकदा तरी ह्या स्थळांना नक्कीच भेट द्या.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?