' मदर तेरेसांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराला त्याने दिली चित्रपटातून श्रद्धांजली – InMarathi

मदर तेरेसांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराला त्याने दिली चित्रपटातून श्रद्धांजली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मदर तेरेसा हे नाव आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्याबद्दल ऐकलं नाही, अशी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. त्यांनी त्यांचं जीवन अनेक गरजू मुलांसाठी खर्च केलं. अवघ्या जगाची ती आई झाली…

२६ ऑगस्ट १९१० रोजी जन्माला आलेल्या या स्त्रीचा, मदर तेरेसा होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत उत्कृष्ट होता. ती साऱ्या जगाची आई तर झालीच; शिवाय त्यांना संतपद सुद्धा बहाल करण्यात आलं आहे. त्यांचं अफाट कार्य, त्यांना मिळालेल्या या पदवीला न्याय देणारं आहे.

 

mother-teresa inmarathi
britannica.com

 

वयाच्या ४०व्या वर्षी, १९५०मध्ये त्यांनी ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ची स्थापना केली. आज अनेक देशांमध्ये, हजारोंच्या संख्येने या संस्थेत लोक कार्यरत आहेत. अनेक सिस्टर्स आज सक्रियपणे ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’मध्ये काम करत आहेत.

अगदी लहान असल्यापासूनच, मदर तेरेसा या बंगालमधील मिशनरीजच्या कामांमुळे प्रभावित झाल्या होत्या. धार्मिक कामांसाठीच स्वतःला वाहून घ्यायचं; असं वयाच्या १२व्या वर्षीच त्यांनी मनाशी पक्कं ठरवलं होतं.

ऐन तारुण्यात, वयाची विशी सुद्धा गाठलेली नसतानाच  त्या भारतात आल्या. दार्जिलिंगमध्ये त्यांनी त्यांच्या समाजकार्याची सुरुवात केली. कलकत्त्यामधील एका कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षिका ते मुख्याध्यापिका असा प्रवास पुढे त्यांनी केला. १९४४ साली त्या शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या.

मात्र या शाळेतील मुलांना शिकवत असतानाच, आजूबाजूची गरिबी आणि त्या लोकांची हलाखीची परिस्थिती पाहून त्या निराश होत असत. या गरजू समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं असं त्यांना मनापासून वाटत असे. याच भावनेतून पुढे ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ची स्थापना झाली.

आपलं हे कार्य सुरु केल्यानंतर त्यांनी पुन्हा मागं वळून पाहिलं नाही. त्या सातत्याने समाजासाठी झटत राहिल्या.

अनेकांना त्यांनी प्रेमानं जवळ केलं. अनेक मुलांचा सांभाळ करून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्याची हिम्मत आणि पत मिळवून दिली. त्यांच्या या मातृप्रेमाचे अनेक किस्से सर्वश्रुत आहेत.

त्यांच्या या असंख्य बालकांपैकीच एक होता गौतम लेविस…

हावडा मधल्या एका ठिकाणी या असहाय्य बालकाला मदर तेरेसांनी आपल्या उराशी कवटाळलं आणि त्याचं जीवन बदलून गेलं.

पोलियोच्या विकाराने ग्रस्त असणारा हा मुलगा आज सर्व कठीण प्रसंगावर मात करीत स्वत:चे कर्तुत्व सिद्ध करत आहे.

पोलियोमुळे पाय गमावून सुद्धा त्याने जिद्द सोडली नाही. मदर तेरेसांनी त्याला आपल्या कोलकाता इथल्या अनाथाश्रमात आसरा दिला. त्या स्वत: जातीने त्याच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष द्यायच्या. पोटाच्या पोराप्रमाणे त्यांनी त्याची काळजी घेतली.

 

gautam lewis marathipizza

 

पुढे गौतमला एका ब्रिटीश अणु शास्त्रज्ञाने दत्तक घेतलं आणि तो UK ला राहायला गेला. तिथेच त्याचं अत्यंत प्रसिद्ध अश्या Bedales Prep School ह्या शाळेत शिक्षण झालं.

पुढे गौतमने संगीत क्षेत्रात, मोठाल्या brands सोबत काम केलं. नंतर त्याने आपला मोर्चा “हवाई” क्षेत्राकडे वळवला!

 

kolkata_2983605g

 

आपण चालू शकत नाही, मात्र उडू तर शकतो – या विचाराने त्याला विमानाचा छंद जडला आणि त्याचेच फलित म्हणून की काय एक ‘तज्ञ फ्लाईंग इंस्ट्रक्टर’ म्हणूनही त्याची ओळख आहे…!

 

gautam_ade_adepitan

 

४३ वर्षीय गौतम हा आज उत्तम स्थितीतलं जीवन जगतोय. पण अजूनही त्याला त्याच्या प्रारंभिक जीवनाचा विसर पडलेला नाही.

मदर तेरेसांना आज अख्ख जग मानतं. पण आणखी एक पाऊल पुढे जाऊन त्याच्या विचारांचा प्रसार चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा विचार काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.

 

gautam-lewis inmarathi

 

आणि त्यातूनच निर्मिती झाली… मदर तेरेसांसोबत त्याने घालवलेल्या अमुल्य क्षणांच्या आठवणपटाची…! २०१६ साली ‘मदर तेरेसा अँड मी’ नावाची ही डोकमेन्ट्री त्याने तयार केली. आपल्या आयुष्यातील मदर तेरेसा यांचं स्थान त्यात त्यानं अधोरेखित केलं.

कोणताही स्वार्थ मनात नं ठेवता केवळ माणुसकीच्या नात्याने लोकांना आसरा देणाऱ्या ‘मदर’ला एका मानसपुत्राने वाहिलेली श्रद्धांजली नक्कीच कौतुकास्पद आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?