इथं यशस्वी नव्हे तर अपयशी आणि जगाने नाकारलेल्या व्यक्तींचे मोल केले जाते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
करिअर हा आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. अर्थार्जनासाठी नोकरी करत असताना त्यात येणारे यश-अपयश हे सगळ्यांच्याच वाट्याला येत असते. मात्र या अपयशाने खचून न जाता खंबीरपणे उभे राहता आले पाहिजे.
‘नोकरीवरून काढून टाकले म्हणजे आपण काहीच करू शकत नाही’, असे विचार मनात येणे योग्य नाही. त्या परिस्थितीतून बाहेर पडणे आणि यशाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे.
समजा, तुमचे करिअर नुकतेच सुरू झाले आहे आणि सलग दोन कंपन्यांनी तुम्हाला कामावरून काढले आहे. अर्थातच तुम्ही निराश व्हाल. अशी निराशा येणे साहजिक आहे. मात्र त्यातून मार्ग काढता यायला हवा.
आज अशाच एका महिलेविषयी आपण जाणून घेणार आहोत, जिने करिअरच्या सुरुवातीलाच अपयशाचा अनुभव घेतला आहे.
न्यूझीलंडच्या सारा रॉब हेगन यांच्या बाबतीत असेच काहीसे घडले होते. त्यांना आधी व्हर्जिन कंपनीने सन २००० मध्ये मार्केटिंगच्या कामावरून हटवले. त्यानंतर अटारी इंटरॅक्टिव्ह कंपनीनेही दोन वर्षे नोकरीनंतर नारळ दिला.
त्या जेव्हा ऑफिसमधून बाहेर पडू लागल्या तेव्हा त्यांचे सहकारी त्यांच्याकडे पाहत होते. त्यांना ते सारे लाजिरवाणे वाटत होते. याविषयी बोलताना सारा म्हणतात की,
“ते खूपच वाईट दिवस होते. एकदा तर आता सगळे संपले आहे, असे मला वाटले. मात्र, मी मन घट्ट केले. सारे काही विसरून पुन्हा उभी राहिले आणि २००२ मध्ये नाइके कंपनीत जनरल मॅनेजर झाले.
तेथे सहा वर्षे काम केल्यानंतर २००८ मध्ये गॅटोरेड या कंपनीत अध्यक्ष, २०१२ मध्ये इक्विनॉक्स कंपनीत अध्यक्षपदी रुजू झाले.”
त्यानंतर ४३ वर्षांच्या सारा यांनी ती नोकरी सोडून स्वत:ची ‘एक्स्ट्रिम यू’ ही स्टार्टअप कंपनी लाँच करण्याचा निर्णय घेतला.
अपयशातून शिकून पुढे वाटचाल करणाऱ्यांना सारा ‘एक्स्ट्रिमर’ संबोधतात. ‘एक्स्ट्रिम यू’ हा एक कंटेंट प्लॅटफॉर्म आहे. येथे लोकांना प्रेरित करणाऱ्या व शैक्षणिक सेवा दिल्या जातात.
आयुष्यात कधी ना कधी अपयशी झालेल्यांना सारा नोकरी देत आहेत.
याविषयी त्या म्हणतात की, “मला अशा माणसाला नाेकरी द्यायची आहे ज्याला नोकरीवरून काढले गेले असेल. जो प्रामाणिकपणे सांगेल की नेमके काय आणि का घडले होते. त्या घटनेतून तो काय शिकला हेदेखील त्याने सांगणे गरजेचे आहे.”
सारा यांनी ‘एक्स्ट्रिम यू’ हे पुस्तकही लिहिले आहे. एक यशस्वी व्यक्ती होण्याचे त्यांचे लहानपणीचे स्वप्न, त्यात आलेल्या अडचणी आणि करिअरच्या सुरुवातीला आलेले अपयश या सगळ्याचाच उल्लेख त्यांनी या पुस्तकात केलेला आहे.
यासाठी त्यांनी अनेक हायप्रोफाइल व यशस्वी एक्झिक्युटिव्ह, शेफ आणि अॅथलिट्सच्या मुलाखती घेतल्या.
संशोधनादरम्यानच त्यांना वाटले की, या लोकांच्या अनुभवाचा फायदा ज्यांनी नुकतेच करिअर सुरू केले आहे त्यांना होईल. सारा म्हणतात, “आजच्या पिढीकडे जग आणखी सुखकर करण्याची विचारसरणी आहे.
परंतु ती बदल घडवण्यात अपयशी ठरतेय. तिची मानसिकता प्रमोशन मिळवण्याचीच आहे. त्यांना वाटते की काहीही न करता सर्वकाही आपोआपच मिळेल.”
सारा म्हणतात,
अपयशी लाेकांवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत. कारण, ज्यांनी प्रत्यक्ष अपयश सोसले आहे, त्यांच्यात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता असते.
–
जे कधी हरले नाहीत ते कधीच विजयासाठी प्रेरित होत नाहीत. या विश्वासाचे कारण म्हणजे मी स्वत: अपयशी ठरलेले आहे. एक नव्हे अनेकदा…
अपयश आले तरीही खचून न जाता नव्या उमेदीने उभे राहण्याची जिद्द सारा हेगेन यांच्याकडून नक्कीच मिळू शकते…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.