' जेव्हा “फ्री स्पीच सैनिक” गुरमेहर कौर काही तरुणांच्या अभिव्यक्तीचा गळा दाबते! – InMarathi

जेव्हा “फ्री स्पीच सैनिक” गुरमेहर कौर काही तरुणांच्या अभिव्यक्तीचा गळा दाबते!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

माझ्या बाबांना पाकीस्तानने नाही, तर युद्धाने मारलं.

निदर्शनं, आंदोलन, विरोध वगैरे दर्शवताना हमखास हातात दिसणाऱ्या कागदी-फलकांच्या सहाय्याने समाज माध्यमांवर वरील वाक्याचा उल्लेख असलेला व्हिडीओ टाकून रातोरात प्रसीद्धीच्या झोतात आलेल्या गुरमेहेर कौर सर्वांना आठवत असतील.

 

gurmehar-kaur-marathipizza

 

काश्मीरात अतिरेकी कारवायांचा सामना करताना हुतात्मा झालेल्या सैनिकाची मुलगी, गुरमेहेर कौर या विधानाने आणी त्यांनंतरच्या प्रकरणाने रातोरात अक्षरशः जागतीक पातळीवर पोहोचल्या.

कित्येकांनी गुरमेहेरच्या या विधानाचा खरपुस समाचार घेत, आपली मतं सोशल मिडीयांत मांडली. काही प्रतीक्रीया भडक होत्या. तर कित्येकांना तिच्या विरोधात अशी मतं मांडण पटलं नाही.

२० वर्षीय तरुणीला स्वतःची मतं मांडता येत नाहीत अस काहीसा सूर लावून कित्येक प्रसिद्ध व्यक्तींनी तिची बाजू घेत मोर्चे बांधणी केली.

 

nidhi-razdan-tweet-marathipizza
तर तिच्या विधानाशी असहमत असलेल्या व्यक्तींना कित्येकांनी ट्रोल केलं गेलं, त्यांना अपशब्द ऐकवले गेले.

 

sehwag-tweet-marathipizza

 

तिच्या विधानांशी-विचारांशी सहमत नसणे म्हणजे जणु काही गुन्हा ठरवला गेला तथाकथीत लिबरलांकडून, सोशलिस्टांकडून.

एका विधानाने-व्हिडीओमुळे भारताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चेहरा बनलेली गुरमेहेर म्हणजे भारतीय तरुणाई आणी तिच्या मतांचा अनादर, तिच्या मतांशी असहमती म्हणजे भारतीय नागरीकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला वगैरे ठरवला गेला.

एका रात्रीत तिला थोर व्यक्ती आणी फ्री स्पीच ची कैवारी ठरवलं गेलं.

कारण कदाचित तिचं डाव्या विचारांच असणं आणी केंद्रात डाव्यांना-प्रतीकूल असलेल्या सरकारचं असणं!

हा घटनाक्रम फेब्रुवारी महिन्यातील.

“एक चित्र हजार शब्दांचा परिणाम साधते” या उक्तीप्रमाणे गुरमेहेर कौर यांनी मेमे-व्हिडीओचा वापर केला होता.

शेकडो वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडीयातील शब्दशः अव्याहत वृत्तांकनामुळे गुरमेहेर कौर घराघरात पोहोचल्या
तिच्या विधानाशी असहमत असलेल्या कित्येकांना ट्रोल केलं गेलं. सिनेनट रणजित हुडा, क्रिकेटवीर सेहवाग सारख्या कित्येकांना ट्रोल केलं गेलं, त्यांच्या टाईमलाईन घाणेरड्या मेसेजसनी भरल्या गेल्या.

tweet-marathipizza

====================

हा झाला ताजा इतिहास.

नुकतीच आणखी एक घटना घडली आहे. मुख्य माध्यमांपासून दुर्लक्षित!

Squint Neon नावाचं एक फेसबूक पेज आहे. १८-२० वर्षांची काही तरुण मुल हे पेज चालवतात. या पेजवर त्यांनी मागच्या आठवड्यात दोन मिम (meme) टाकल्या. आणि अनपेक्षीत घटना घडल्या.

पहिली –

meme-marathipizza

 

दुसरी –

 

meme-marathipizza

 

पैकी एका फोटोत गुरमेहेर होत्या. त्यावर प्रत्यक्ष गुरमेहेरजींनी कडक शब्दांत आक्षेप घेतला.

 

gurmehar kaur against freespeech marathipizza

 

 

प्रत्यक्ष गुरमेहेरजींनी घेतलेला आक्षेप त्या पेजच्या चालकांनी प्रसीद्ध केला. कदाचीत त्याने फ्रि स्पीचच्या या स्वयं घोषीत तारणहारास आपणही इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहीजे याची जाणीव होईल अशी भाबडी आशा असावी. पण रातोरात उदयास आलेल्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सरदारास स्वतःवरील भाष्य पचले नसावे. गुरमेहेरजींनी एका तासाचा वेळ देते, सदरचा सर्व मजकुर काढून टाका अशी धमकी-वजा-इशारा दिला.

 

gurmehar-kaur-marathipizza03

 

एक तासाची सवलत देण्याइतपत न-थांबता गुरमेहेरजींनी आडमार्गाने त्यांना धमकावले कि तुम्ही वयाने माझ्या बहिणीपेक्षाही लहान आहात. तुमचे महावीद्यालयीन प्रवेश, करिअर संदर्भातले बायो-डेटा एखाद्या पोलीसी कारवाईने अडचणीचे ठरू शकतात. तुमचं करिअर धोक्यात येऊ ( आणू ) शकते.

 

gurmehar kaur against freespeech threatening youngsters marathipizza

 

 

Squint Neon पेज चालवणाऱ्या १८/१९ वर्षांच्या मुलांना गुरमेहेर कौर यांच्या क्षमता, त्यांचे विविध संघटनांशी संपर्क, डाव्या पक्षांशी असलेली ठळक जवळीक, मुख्य प्रवाहातील माध्यमांचा-माध्यम कर्मींचा त्यांना असलेला पाठींबा, प्रचंड आणी अगदी जागतीक पातळीचे असलेले fan following माहीत होते.

काही महिन्यांपूर्वी प्रसिद्धी झोतात आलेल्या फ्री स्पिचच्या, फेमिनीझमच्या या स्वयंघोषीत कैवाऱ्याकडून आलेल्या पोलीसी कारवाईच्या धमकीला घाबरत त्यांनी ते वादग्रस्त मेमे त्यांच्या पेज वरून काढून टाकले. आणि पुढील पोस्ट लिहिली :

 

gurmehar-kaur-marathipizza05

 

ही पोस्ट त्यांनी त्यांच्या पेजवर “पिन्ड पोस्ट” म्हणून ठेवली, जेणेकरून अधिकाधिक लोकांना वस्तुस्थिती कळावी. पण ती पोस्ट फेसबुकने डिलीट केली!

नवी पोस्ट – https://www.facebook.com/squintneon/posts/1555489364516538

हे सर्व होत असताना ज्या-ज्या लोकांनी मागे गुरमेहेर कौरजींची पाठराखण केली होती पैकी एकानेही या मुलांच्या बाजूने गुरमेहेरजींना समजावले नाही किंवा त्या मुलांच्या फ्रि स्पिचचा सन्मान राखला गेला पाहीजे असं म्हटलं नाही.

या प्रकरणांत डाव्या विचारांच्या असलेल्या गुरमेहेरजींच वागण त्या ज्या फ्री स्पिचच्या झेंडावाहक वगैरे बनल्या होत्या त्याच्या अगदी विपरीत होतं. सुप्रीम कोर्टात वकिली करणाऱ्या एका वकिलाने गुरमेहेरजींना मुलांनी बनवलेले मेमे कदाचीत कायद्याच्या दृष्टीने गैर ठरणार नाहीत, पण आपण दिलेल्या धमकी-वजा-इशारे भारतीय कायद्यांनुसार कारवाईस पात्र ठरतील असं लिहीलं. मुलांनाही त्यांना हवी असल्यास कायदेशीर मदत करण्याचं आश्वासन दिलंय.

 

gurmehar-kaur-marathipizza06

 

मुख्य प्रवाहातील माध्यमं, त्यांचे स्वयं घोषीत सम्राट, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे तथाकथीत कैवारी, कार्यकर्ते, कित्येक नेते, आणि गुरमेहेरजींचा जगभरातील fan following वर्ग याचा विचार करता त्या मुलांनी पाऊल मागे घेतलंय.

 

gurmehar kaur against freespeech manash sharmah marathipizza

 

हे सदर मुलाचं वैयक्तीक ट्वीटर हँडल सध्या ईन ऍक्टीव्ह झालयं. त्याने स्वतः केलयं कि ट्वीटरने कारवाई केलीये माहीत नाही.

माननीय पंतप्रधानांचा चेहरा गाढवाच्या चेहऱ्याच्या जागी वापरणं, खुन झालेल्या व्यक्तीचा चेहऱ्याचा जागी माननीय पंतप्रधानांचा चेहरा वापरणं…. फ्रि स्पिचच्या नावाखाली अशा कित्येक गोष्टींचा अव्याहत मारा सुरु असताना,  आठ महिन्यांपूर्वीच फ्रि स्पिच नावाखाली प्रसिद्धी मिळवणाऱ्या व्यक्तीला इतरांच अभिव्यक्ती स्वातंत्र्य इतकं बोचावं हे त्या व्यक्तीच्या वैचारीक विचारधारेचा पराभव नाही ?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?