' कोहिनूरच नाही भारतामधून चोरलेल्या या ८ मौल्यवान वस्तू परकीयांच्याच ताब्यात आहेत! – InMarathi

कोहिनूरच नाही भारतामधून चोरलेल्या या ८ मौल्यवान वस्तू परकीयांच्याच ताब्यात आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगातील सर्वात मोठा हिरा म्हणून ज्याचा लौकिक होता किंवा आहे तो म्हणजे ‘कोहिनूर’…

आज कोहिनूर हिरा भारतात परत आणण्‍याच्या मुद्द्यावरून भारतात वारंवार मागणी होत असते. केंद्र सरकारने कोहिनूर हिरा मायदेशात परत आणण्यासाठी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. मात्र अद्याप यश आलेले नाही.

मात्र, कोहिनूरबाबतही काही देशांनी दावा केल्याने तो एक वेगळाच वादाचा विषय ठरत आहे. कोहिनूरवर भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणने दावा केला आहे.

पण तुम्हाला माहीत आहे काय? कोहिनूर हिर्‍यासह धारच्या सरस्वतीच्या मूर्तीसह अनेक अमूल्य वस्तू आजही विदेशात आहेत. त्या भारतात परत आणण्यावर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे.

त्या अमूल्य गोष्टींबद्दल आज जाणून घेऊयात.

 

१) १५०० वर्षे पुरातन बुद्ध मूर्ती 

 

antics-marathipizza01

 

सुल्तानगंज येथील ५०० किलोची बुद्ध मूर्ति बर्मिंघममधील एका म्युझियममध्ये आहे. पितळ धातूची ही मूर्ती जवळपास १५०० वर्ष पुरातन आहे. १८६१ मध्ये बिहार ते भागलपूर जिल्ह्यात सुल्तानगंज भागात रेल्वे रुळ टाकताना एका ब्रिटिश अधिकार्‍याला ती सापडली होती.

 

२) रिजेंट हिरा

 

antics-marathipizza02

 

मद्रासचे गव्हर्नर थॉमस पिट यांनी एका व्यापार्‍याकडून हा हीरा घेतला. त्यानंतर त्यांनी तो फ्रान्सला पाठवला. १७१७ मध्ये फ्रान्सचे सम्राट लुई (१४ वे) यांनी ऑर्लिंनमध्ये फ्रान्सचे प्रतिनिधि ड्यूक फिलिप (द्वितीय) यांच्याकडून खरेदी केला.

लुई यांनी १७२२ मध्ये हा हीरा आपल्या मुकुटात मढवला होता.

हे ही वाचा – या लुटारूने भारतात लुटलेली संपत्ती मोजणं केवळ अशक्य!

 

३) ओर्लोव्ह हिरा

 

antics-marathipizza03

 

ओर्लोव्ह हीरा दुसर्‍या शतकात श्रीरंगपट्टम (तमिळनाडु) मध्ये कावेरी नदीच्या काठावरील श्री रंगनाथस्वामी मंदिरात भगवान विष्णुच्या मूर्तीच्या डोळ्याच्या रुपात होता.

एका फ्रान्सीसी जवानाने हा हीरा मूर्तीतून काढून नेला होता. अनेक वर्षे त्याने हीरा आपल्याजवळ ठेवला. फ्रांसीसीने १७५० च्या दशकात हीरा मद्रासमध्ये आणला व ब्रिटीश अधिकार्‍याला विकला.

 

४) टीपू सुल्तानची तलवार

 

antics-marathipizza04

 

श्रीरंगपट्‌टनमच्या युद्धात टीपू सुल्तानचे निधन झाले होते. त्यानंतर ब्रिटनच्या सैन्याने टीपू सुल्तानची तलवार व अंगठी आपल्या ताब्यात घेतली होती. टीपू सुल्तानची ही तलावार भारतीय उद्योगपती विजय माल्या यांनी खरेदी केली होती.

 

५) दरिया-ए-नूर हिरा

 

antics-marathipizza05

 

नादिर शाह यांनी कोहिनूरसह १८५ कॅरेटचा दरिया-ए-नूर हिरा दिल्लीतून इराणला नेला होता. महाराज रणजीत सिंहने इराणहून अफगाणिस्तानात जाताना तो मिळवला.

नंतर तो ब्रिटिशांच्या हाती लागला. एका प्रदर्शनात ढाकाच्या नवाबने तो खरेदी केला होता. सध्या हा हीरा ढाका येथील सोनाली बॅँकेच्या तिजोरीत आहे.

हे ही वाचा – भारतामध्ये दडलेल्या या मौल्यवान खजिन्यांचा शोध आजही अविरत सुरु आहे!

 

६) छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार

 

antics-marathipizza06

 

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ब्रिटनचे राजकुमार एडवर्ड (सातवा) यांना भारत दौर्‍यावर भेट देण्यात आली होती. सध्या ही तलवार महाराणी एलिजाबेथ यांच्या महालात आहे.

 

७) अमरावती संगमरमरी नक्षी

 

antics-marathipizza07

 

या कलाकृतींनी दक्षिण-पूर्वी भारतात अमरावती स्तूपचा मुहाना सजवले जात होते. १८४५ मध्ये एका अधिकारी सर वॉल्टर इलियटच्या देखरेखीत स्तूपचे उत्खनन झाले होते. १८८० मध्ये जवळपास १२० नक्षीच्या कलाकृती ब्रिटिश म्यूझियममध्ये नेण्यात आल्या होत्या.

 

८) मध्यभारतातील सरस्वतीची मूर्ती

 

antics-marathipizza08

 

लंडनच्या म्यूझियममध्ये देवी सरस्वतीची एक मूर्ती आहे. ती मध्यभारतातील भोजशाळे म‍ंदिरातील आहे. इतिहासकारांच्या मते १८८६ मध्ये ही मूर्ती ब्रिटिशांनी म्यूझियमध्ये ठेवली.

तर असा हा आपल्या इतिहासातील अमुल्य ठेवा परकियांच्या हातात कैद आहे.

हे ही वाचा – सुरतहून महाराजांनी आणलेल्या या खजिन्याचा अर्धा भाग आजही अज्ञात आहे

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?