' ‘हे’ ५ अवाढव्य प्रकल्प साक्ष देतात चीनजवळ असणाऱ्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानाची! – InMarathi

‘हे’ ५ अवाढव्य प्रकल्प साक्ष देतात चीनजवळ असणाऱ्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानाची!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

चीनने आपल्या आर्थिक विकासाची घोडदौड सुरुच ठेवली आहे. येथे तयार होणा-या वस्तूंची जगभरात विक्री होत आहे. भारत-चीनमधील सीमा प्रश्‍न सुटलेला नाही. सार्क राष्‍ट्रांमधील आपले स्थान चीन त्यांना वेगवेगळ्या पध्‍दतीने मदत करुन बळकट करत आहे. असे होत असताना चीनच्या काही विज्ञान आणि इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स हे या देशाच्या विकासात महत्त्वाचा वाट उचलत आहेत.

आज आम्ही तुम्हाला चीनमधील पाच अशा महत्त्वाच्या सायन्स व इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्सविषयी सांगणार आहोत.

1) डाया बे रिअॅक्टर न्युट्रीनो एक्सपेरिमेण्‍ट

 

china-projects-marathipizza02
english.cas.cn

हा प्रकल्प दक्षिण चीनच्या गुआंगडांग प्रांतात आहे. डाया बे रिअॅक्टर न्युट्रीनो एक्सपेरिमेण्‍ट न्यूट्रीनो मिक्सिंगच्या अभ्‍यासासाठी प्रसिध्‍द आहे. हा न्युट्रिनो फीजिक्सचा नवीन अभ्‍यासक्षेत्र आहे.

 

2) शांघाय सिंक्रोट्रोन रेडिएशन फॅसिलिटी

 

china-projects-marathipizza04
xpforums.com

यात 1.2 बिलियन युआनची गुंतवणूक करण्‍यात आली. शांघाय सिंक्रोट्रोन रेडिएशन फॅसिलिटी (एसएसआरएफ) हा प्रकल्प  19 जून 2010  मध्‍ये कार्यान्वित झाला. एसएसआरएफ हे चीनमधील संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाचे प्लॅटफॉर्म आहे. सिंक्रोट्रोन प्रकाशाचे स्त्रोत असून ते वैज्ञानिक संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावतो.

 

3) सर्वात मोठे रेडिओ टेलिस्कोप

 

china-projects-marathipizza03
abc.net.au

चीन जगातील सर्वात मोठे रेडिओ टेलिस्कोप उभारत आहे. हा अवाढव्य बांधकाम प्रकल्प असणार आहे. याचा आकार 30 फुटबॉल पिचस मावतील. विश्‍वाचे आकलन आणि दुस-या ग्रहावरील जीवसृष्‍टी शोधण्‍यासाठी मानव जगासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. सप्टेंबर 2016 मध्‍ये त्याचा वापर सुरु होईल. यामुळे संशोधकांना अब्जावधी प्रकाश वर्ष दूरच रेडिओ लहरी डिटेक्ट करु शकतील.

 

४) नैऋत्य चीनमधील जर्मप्लाझम बँक ऑफ वाईल्ड स्पेशिज

 

china-projects-marathipizza05
i2.wp.com

डाया बे रिअॅक्टर न्युट्रीनो एक्सपेरिमेण्‍ट हे चाइनीज अॅकेडमी ऑफ सायन्सेस(कॅस) अंतर्गत कार्य करते. चीनच्या युनान प्रांतात ही संस्था आहे. ही संस्था दुर्मिळ आणि संपण्‍याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींवर संशोधन आणि जतन करण्‍याचे काम करते. याची स्थापना 2008 मध्‍ये झाली होती.

 

५) चीनचे मानवनिर्मित सन फ्युजन डिव्‍हाइस

 

china-projects-marathipizza06
3.bp.blogspot.com

सध्‍या मानवी समाज ऊर्जा संकटाला तोंड देत आहे. अशा स्थितीत शाश्‍वत स्वच्छ ऊर्जा कुठून द्यायचा हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. द अर्टिफीशयल सन प्रोजेक्ट अशा प्रश्‍नांवर उपाय सुचवण्‍यासाठी प्रकल्प विकसित केला जात आहे. हा राष्‍ट्रीय दृष्‍ट्या महत्त्वाचा प्रकल्प असून त्याला द एक्सपेरिमेण्‍टल अॅडव्हान्स्ड सुपरकण्‍डक्टींग टोकामाक(इस्ट) नाव दिले आहे. त्याला अर्टिफीशयल सन असे संबोधले आहे.

आहे की नाही भन्नाट!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

 

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?