' ‘ह्या’ भारतीय शीख व्यक्तीने अवघ्या ‘कॅनडा’ सरकारला वेठीस धरले होते! – InMarathi

‘ह्या’ भारतीय शीख व्यक्तीने अवघ्या ‘कॅनडा’ सरकारला वेठीस धरले होते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

परदेशात भारतीयांची संख्या किती जास्त आहे हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची बिलकुल गरज नाही. काही आतापासूनच नाही तर १०० वर्षांच्याही आधीपासून विविध देशांत आपले भारतीय वास्तव्य करून आहेत.

काही जण कामानिमित्त, काही व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त तेथे स्थायिक झाले ते तिकडचेच झाले. तर मंडळी ह्या परदेशी भारतीयांनी देखील इतिहासामध्ये आपले नाव लिहून ठेवले आहे, परंतु आपल्याला त्याची काहीही माहिती नाही.

आज आम्ही तुम्हाला अशीच एक ऐतिहासिक घटना सांगणार आहोत ज्यात एका भारतीय शीख व्यक्तीने चक्क संपूर्ण कॅनडा सरकारला वेठीस धरले होते.

 

gurdat-singh-marathipizza02
postmediaprovince2.files.wordpress.com

१०३ वर्षांपूर्वी कॅनडाने भारतीय प्रवाशी घेऊन जाणा-या कामागाटा मारु नावाच्या जहाजला व्हँक्योव्हर किनारपट्टीवर उतरवले होते. १९१४ मध्‍ये एक भारतीय शीख उद्योगपती कॅनडात शिरण्‍यासाठी एक महिन्यापर्यंत सुमारे ३७० हून अधिक लोकांसह समुद्रात तळ ठोकून होता.

मात्र, कॅनडाने हे होऊ दिले नाही. अखेर प्रवाशांचा संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी आंदोलन सुरु केले. यात सुमारे १९ लोकांचा मृत्यू झाला होता.

 

gurdat-singh-marathipizza01
firstnighthistory.files.wordpress.com

१९०८ मध्‍ये कॅनडा सरकारने स्थलांतरितांना रोखण्‍यासाठी कौन्सिलमध्‍ये एक ऑर्डर पारित केले होते. या ऑर्डरनुसार फक्त असे लोक कॅनडात येऊ शकत होते ज्यांचा जन्म तेथेच झालेला असावा किंवा ते कॅनाडाचे नागरिक असावेत.

हा आदेश खास करुन भारतीयांना रोखण्‍यासाठी तत्कालीन कॅनडा सरकारने बनवला होता.

१९१४ मध्‍ये सिंगापूरमध्‍ये राहणारे शीख उद्योगपती गुरदीत सिंह संधू यांनी हे वैयक्तिक आव्हान म्हणून स्वीकारले. संधू एक जपानी जहाज कामागाता मारुमध्‍ये ३४० शीख, २४ मुस्लिम आणि १२ हिंदुंना घेऊन २३ मे १९१४ रोजी कॅनडाच्या व्हॅक्युअरच्या बंदरावर पोहोचले.

gurdat-singh-marathipizza03
upload.wikimedia.org

डॉकवर जहाजला घेरण्‍यात आले. प्रवाशांना उतरण्‍याची परवानगी दिली गेली नाही. फक्त २० कॅनेडियन नागरिकांना उतरवले गेले. सरकारने जहाज परत जाण्‍यास सांगितले. सोबतच खाण्‍यापिण्‍याचा पुरवठा बंद केला. तेव्हा कॅनडाने भारतीय स्थलांतरित आणि अमेरिकेने कॅनडाच्या कृतीवर विरोध दर्शवला होता. त्यांनी पैसे जमा करुन अन्न आणि पाण्‍याचा पुन्हा पुरवठा केला.

स्थलांतरि‍तांचे प्रकरण न्यायालयात पोहोचले. परंतु निकाल कॅनडा सरकारच्या बाजूने लागला. निकाल येताच सरकारने आर्मीचे एचएमसीएस रेनेबो शीप समुद्रात तैनात केले.

२३ जुलै १९१४ रोजी दोन महिन्यानंतर भारतीय असलेले ते जहाज भारतात परतले. भारतात पोहोचताच ब्रिटिश सरकारने उद्योगपती संधू आणि त्यांच्या सहका-यांना अटक केली.  यामुळे प्रवाशी संतापले व हिंसक निदर्शन करुन लागले. यात १९ प्रवाशांचा मृत्यू झाला.

gurdat-singh-marathipizza04
rabble.ca

२००८ मध्‍ये ब्रिटिश कोलंबिया आणि कॅनडा सरकारने एका कार्यक्रमात सुमारे १०० वर्ष जुन्या ह्या घटनेवर माफी मागितली होती.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?