' दैनंदिन जीवनात ‘या’ गोष्टी करत नसाल तर यशस्वी होणं अवघड होऊन बसेल! – InMarathi

दैनंदिन जीवनात ‘या’ गोष्टी करत नसाल तर यशस्वी होणं अवघड होऊन बसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याला काही चांगल्या तर काही वाईट सवयी असतात. या सवयी आपण सहसा बदलत नाही किंवा त्या बदलणे आपल्याला जमत नाही. पण कधी कधी या सवयींचा आपल्या जीवनावर चांगला – वाईट परिणाम घडत असतो.

पण आज आम्ही तुम्हाला काहीश्या त्रासदायक परंतु महत्त्वपूर्ण दैनंदिन गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुमचे जीवन यशस्वी करण्यासाठी उपयोगी ठरतील.

१. लवकर उठणे

 

yoga inmarathi

 

तुम्ही सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, हलका पण भरपेट नाश्ता करा आणि कामासाठी जा. असे केल्यास दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहता आणि तुम्हाला तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी वेळ मिळतो.

२. लिफ्टच्याऐवजी पायऱ्यांचा वापर करणे.

 

walk-on-stairs-marathipizza

 

जे व्यायाम करायला वेळ मिळत नाही, अशी तक्रार करतात. त्यांनी व्यायामाची कमी भरून काढण्यासाठी लिफ्टच्याऐवजी पायऱ्यांचा वापर करावा. डेस्क – बाउंड जॉबमध्ये जे व्यस्त असतात, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

३. योग्य वेळापत्रक पाळा.

जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणतेही वेळापत्रक पाळत नसाल, तर तुमचे जीवन हे तणावयुक्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे वेळापत्रक पाळणे गरजेचे आहे.

 

Life.marathipizza

 

४. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे.

सार्वजनिक वाहतूक स्वस्त आहे, ती वेळ देखील वाचवते. तसेच, आपल्या शहराला जवळून जाणून घेण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. याशिवाय, जे लोक स्वप्नामध्ये जगतात, त्यांना खऱ्या आयुष्याची अनुभूती केवळ सार्वजनिक वाहतुकीद्वारे मिळू शकते.

 

pmt InMarathi

 

५. दरदिवशी किमान २० मिनटे पुस्तके वाचा.

पुस्तकांमध्ये तुम्हाला दुसऱ्याच जगात नेण्याची शक्ती आहे. वाचन हे केवळ तुमच्या कामातील अडथळा आहे, असे समजू नका. तुम्ही जर दररोज पुस्तकं वाचलीत, तर तुम्हाला झोप देखील चांगली लागेल.

 

reding book InMarathi

 

६. सकस आहार घ्या!

तुम्ही जे पदार्थ खातात, ते तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मनावर परिणाम करतात. जर तुम्ही चांगले आणि निरोगी पदार्थ खाल्लेत, तर तुमचे शरीर आणि मन देखील निरोगी राहील.

७. वारंवार प्रश्न विचारा.

जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल शंका असेल, तर तेव्हा ती विचारायला लाजू नका. बरेच वर्ष गोंधळामध्ये राहण्यापेक्षा आपल्या शंका स्पष्ट करणे कधीही चांगले असते.

८. मोबाईलचं ‘व्यसन’ टाळा – सारखा आपला मोबाईल तपासू नका.

 

surfing on mobile inmarathi

 

इंस्टाग्राम, फेसबुक यांच्यावर आपला वेळ खर्च करणे थोडे कमी करा. कारण याच्यामुळे तुमच्या कामावरील लक्ष कमी होईल.

जर तुम्ही सारखा आपला मोबाईल तपासात असाल, तर तुम्हाला त्याचे व्यसन लागेल आणि त्यात तुम्हाला कळणार नाही एवढा वेळ तुम्ही गमावत रहाल. शिवाय सतत मोबाईल तपासत राहिल्यामुळे हातातील कुठल्याही कामात लक्ष केंद्रित करणे अशक्य होऊन बसेल.

९. प्रत्येकवेळी सॉरी आणि थँक्यू बोलायला शिका.

हे दोन शब्द तुम्हाला जीवनात पुढे नेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या दोन शब्दांनी तुम्ही लोकांची माने जिंकू शकता. तुम्ही बनवलेल्या २५ स्लाइडच्या प्रेझेंटेशनपेक्षा यांचे महत्त्व जास्त आहे.

१०. पब्लिक स्पिकिंग

 

 

गर्दीला सामोरे जाणे, पहिल्यांदा खूप घाबरवणारे असते. परंतु स्वत:मधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी लोकांसमोर जाऊन बोलणे, हाच उत्तम पर्याय आहे.

११. धुम्रपान करू नका.

धुम्रपान हे तुमच्या आरोग्यासाठी गंभीरपणे हानिकारक आहे आणि तुम्ही धुम्रपान करताना शानदार दिसता, हा निव्वळ तुमचा गैरसमज आहे.

 

no-smoking-InMarathi

 

१२. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचा.

जर तुम्ही तुमच्या कामाचा आणि कामाच्या जागेचा आदर केलात, तरच तुम्हाला त्यामधून योग्य तो लाभ मिळेल.

 

१३. दर महिन्याला एका ठरलेल्या रकमेची बचत करा.

जेव्हा तुम्हाला पैशांची खूप गरज असेल असेल, तेव्हा ही बचत केलेली रक्कम तुमच्या उपयोगाला येईल.

 

saving money InMarathi

 

१४. बेसिक कोडींग समजून घ्या.

या डिजिटल युगामध्ये, बेसिक कोडींगविषयी ज्ञान घेतल्यास आपल्याला आपल्या कामामध्ये अजून उच्च स्तरावर जाता येईल.

 

coding inmarathi

 

१५. स्वतःच स्वतःची प्रशंसा करायला शिका.

तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कधीही स्वतःच स्वतःची प्रशंसा करण्यापासून मागे फिरू नका, कारण तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

आणि सगळ्यात शेवटी – जगात कुठेही सत्य असणारा…एक क्रूर परंतु अत्यंत लॉजिकल नियम –

१६. मेहनतीला पर्याय नाही…!

 

sucess-marathipizza00

 

तेव्हा – आळस झटका…आणि…कामाला लागा…!

ह्या सवयी जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणल्यात, तर तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि तुम्ही तुमची स्वप्ने नक्कीच साध्य करू शकता.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?