' भारतीय वैज्ञानिकांनी बनवली अनोखी चहायुक्त दारू अर्थात ‘टी वाइन’ – InMarathi

भारतीय वैज्ञानिकांनी बनवली अनोखी चहायुक्त दारू अर्थात ‘टी वाइन’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

चहा… एक असं पेय ज्याने लहानमोठ्या सगळ्यांनाच वेड लावलंय. चहाप्रेमींची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात आढळते.

 

 

सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळ पर्यंत आपल्या दिवसात जर सर्वात जास्त कशाला महत्व असेल तर ते चहा आहे. झोपेतून उठल्यावर आणखी काही नको बस एक कप गरमागरम चहा हवा.

मग ऑफिसला गेल्यावर चहा हवा, आळस येतोय म्हणून चहा हवा, संध्याकाळचा चहा हवा, ऑफिसमधून आल्यावर चहा हवा.

चहा प्यायल्याने ताजेतवाने वाटतं, घरी पाहुणे आले की आपण त्यांना एक कप चहा नक्की पाजतो, टपरीवर मित्रांसोबत गप्पा करत चहाचा आस्वाद घेतो. एवढचं काय तर आपल्या राजकारणातही चहाला महत्त्व देतात, ‘चाय पे चर्चा’ हे त्यातलच एक.

आपल्या भारतीयांसाठी तर चहाचे एक वेगळेच महत्व आहे.

 

tea-marathipizza
drinkpreneur.com

 

चहाचा वापर हा पेय म्हणून केला जातोच, मात्र त्यासह त्याच्या इतर अनेक गुणांकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही.

वाफाळणा-या चहाचे घुटके घेतले जातात, मात्र त्यासह चहापावडरीचा वापरही वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो.

अर्थात चहाचेही वेगवेगळे प्रकार चाखले जातात. लेमन टी, ग्रीन टी, विदाऊट शुगर, आईस टी, जिंजर टी या आणि यांसारख्या अनेक प्रकारांना कायमच मागणी असते.

हल्ली घरातही ग्रीन टी, लेमन टी सारखे प्रकार तयार करण्यावर भर दिला जातो. डाएटप्रेमींसाठी तर ग्रीन टी हा चांगला पर्याय मानला जातो.

 

baltana

 

मात्र चहापासून वाईन तयार करण्याचं धाडस भारतातील काही संशोधकांनी केलं आहे.

आश्चर्य वाटतंय ना?

अहो खरंच, चहापासून वाईन बनविण्याचा त्यांनी केवळ प्रयत्नचं नाही केला, तर तो यशस्वी करत अनेकांना ही वाईन आवडली देखील.

याची सुरुवात झाली ती संशोधनापासून.

भारतातील चहाचं प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे, लहान मोठ्या प्रत्येकाला चहा आवडतो, हे संशोधकांना समजलं.

 

Tea Manish Dhane Flickr InMarathi
Manish Dhane Flickr

 

ते स्वतःही भारतीय असल्याने त्यांनाही चहा आवडतचं होता.

चहावरील आपल्या याच प्रेमापायी काही वैज्ञानिकांनी मिळून या चहाला एक वेगळे स्वरूप प्राप्त करवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

५ वैज्ञानिकांच्या एका टीमने मिळून या चहापासून चक्क वाइन बनविली आहे.

आजही आपल्याकडे दारु पिण्याला वाईट सवय मानली जाते, हल्ली पार्ट्यांमध्ये हाती ग्लास घेत चिअर्स करण्याची प्रथा वाढली असली तरिही दारुला विरोध करणा-यांची संख्या जास्त आहे.

मात्र आसामच्या वैज्ञानिकांनी असा काही चमत्कार केला, की चहाप्रेमींनाही वाईनची भुरळ प़डली.

आसाम म्हणजे चहाच्या मळ्यांचं शहर. येथिल हिरवाई पाहिली की डोळे निवतात.

 

northeast now

 

त्यामुळे आसामवासीयांना चहा काही नवा नाही.

आसामची राजधानी जोरहाट येथे असणाऱ्या टोकलाई चहा अनुसंधान संस्थानाच्या या वैज्ञानिकांनी खूप दिवसांच्या संशोधनातून ‘Tea Wine’ म्हणजेच चहा पासून बनणारी वाइन तयार केली.

 

tea wine-marathipizza
glenstubbephotography.com

 

या संस्थांनच्या माईकोलॉजी आणि माइक्रो-बायोलॉजी विभागाच्या या वैज्ञानिकांनी टी वाइन च्या तीन व्हारयटी तयार केल्या आहेत.

ज्यात सीटीसी वाइन, ऑर्थोडॉक्स वाइन आणि ग्रीन टी वाइन यांचा समावेश आहे.

हे युनिक फ्लेवर्स ऑरगैनिक, पेस्टिसाइड फ्री ग्रीन टी यांपासून बनविण्यात आले आहेत.

 

wine-marathipizza
corkbuzz.com

 

आरोग्यासाठीही लाभदायक

वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, चहाने बनलेली ही वाइन ब्लड प्रेशर, हृदया संबंधीचे आजार, डायबेटीस असलेल्या रुग्णांसाठी खूप गुणकारी आहे.

सोबतच सर्दी, खोकला, शरीरात रक्ताची कमतरता, डोळे, दात इत्यादी आरोग्यासंबंधित रोगांवर देखील ही वाइन उपायकारक असेल.

या शोधात समाविष्ट असलेल्या एका वैज्ञानिकाने सांगितले की, इतर वाइनमुळे लिवरला हानी होवु शकते. पण या वाइनला प्यायल्याने लिवरवर कुठल्याही प्रकारच नुकसान होत नाही. कारण यात अल्कोहोल ची मात्र खूप कमी ठेवण्यात आली आहे.

 

tea wine01-marathipizza
punchdrink.com

 

आज जगभर टि वाईन प्यायली जाते.

परदेशात ही वाईन घरी बनविण्याचीही पद्धत आहे. त्यासाठी चहाची पावडर, गरम पाणी, लिंबु आदी साहित्यांचा वापर केला जातो.

ही वाईन बनवून काही काळासाठी साठवली जाते, आणि जुनी झाल्यावर वापरली जाते.

अर्थात त्याचे वैविध्यपुर्ण  प्रकार या संशोधकांनी शोधले आहेत.

 

aajkikhabar.com

 

संशोधकांकडून वेगवेगळ्या पातळीवर अनेक प्रयोग केले जातात.

मात्र त्यांना पुरेशी प्रसिद्धी मिळणंही तितकंच गरजेचं आहे. अनेकदा हे संशोधन आपल्यासाठी हितकारकही असतं,

भारतात केवळ संशोधकचं नव्हे तर अनेक विद्यार्थीही अशा प्रकारचे प्रयोग करतात, मात्र त्यांनाही प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे.

जर तुम्हालाही वाइन आवडत असेल तर या स्वदेशी टी वाइनचे फ्लेवर्स नक्की ट्राय करा…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?