' लग्नाच्या निर्णयामुळे एकट्या पडलेल्या इरोम शर्मिलाच्या पाठीशी रेणुका शहाणे – InMarathi

लग्नाच्या निर्णयामुळे एकट्या पडलेल्या इरोम शर्मिलाच्या पाठीशी रेणुका शहाणे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

AFSPA म्हणजेच Armed Forces (Special Powers) Act हा असा कायदा आहे जो ‘नाजूक’ प्रदेशांसाठी तयार केला गेला आहे. ज्या भागांमध्ये अनागोंदी किंवा अशांतता आहे (किंवा माजू शकते) अश्या ठिकाणी हा कायदा लागू करून तिथे सैन्याचं नियंत्रण ठेवणे व शांतता कायम ठेवणे – असा ह्या act चा हेतू आहे. १९५८ पासून मणिपूरमधे हा कायदा लागू आहे.

मणिपूरवरून ह्या कायद्याचा अंमल संपावा ह्या मागणीसाठी नोव्हेंबर २००० पासून इरोम शर्मिला उपोषणास बसल्या होत्या. तेव्हापासून सुमारे १६ वर्ष त्यांनी अन्नग्रहण गेलं नव्हतं. त्यांना अटकेत ठेऊन, बळाचा वापर करून बाहेरून जीवनावश्यक द्रव पुरवली जायची.

 

iromsharmila01 marathipizza

स्त्रोत

१६ वर्षांच्या तपश्चर्येचा काहीही लाभ होत नाहीये हे लक्षात आल्यानंतर इरोमने उपोषण सोडून संवैधानिक लढा देण्याचा निर्णय घेतलाय – निवडणुकीच्या मार्गाने!

आता इरोम मणिपूरमधील निवडणूक जिंकून, मुख्यमंत्री बनून बदल घडवून आणू इच्छितात.

गेल्या २ वर्षांपासून त्या एका Desmond Coutinho ह्या भारतात जन्मलेल्या ब्रिटीश नागरिकाच्या प्रेमात आहेत. त्यांनी लग्नाचा निर्णयदेखील घोषित केला आहे. ह्या तसंच अचानक उपोषण सोडून निवडणुकीत उतरण्याच्या निर्णयामुळे इरोमचे त्यांच्या कुटुंब आणि मानव अधिकार (Human Rights) कार्यकर्त्यांसोबतचे संबंध तणावपूर्ण झालेत. त्या एकाकी पडल्या आहेत.

ह्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे ह्यांनी इरोमला भक्कम पाठबळ दिलं आहे.

त्यांनी फेसबुकवर एक उत्कृष्ट पोस्ट टाकली आहे.

renuka shahane marathipizza 01

 

त्या म्हणतात –

All those human rights & anti AFSPA “activists” who were happy & supportive only when you had a tube attached to your nose for force-feeding or only when you were facing the wrath of the State with courage, are not worth a second thought.

गेली १६ वर्ष जेव्हा तुला नळीद्वारे अन्न पुरवलं जायचं आणि राज्यव्यवस्थेचा रोष तू नेटाने सहन करत होतीस, तेव्हापुरतंच तुझ्यासोबत असणाऱ्या मानवाधिकार आणि AFSPA विरोधी “कार्यकर्त्यांचा” विचार करण्याची (त्यांची) लायकी नाही.

 

इरोमच्या लग्नामुळे नाराज लोकांबद्दल रेणुकाजी म्हणतात :

You are still fighting against AFSPA; you are going to do that with a person whom you have chosen to love & in a manner that you & only you should choose to do.

तू अजूनही ASFPA विरुद्ध लढत आहेस, ह्यापुढे तू ही लढाई त्या व्यक्तीबरोबर लढशील ज्याला तू प्रियकर म्हणून निवडलं आहेस आणि ही (प्रियकराची) निवड फक्त आणि फक्त तूच करायला हवीस.

 

इरोमविरुद्ध निदर्शनं करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांबद्दल बोलताना त्या म्हणतात :

The image of you being sent back to the hospital bed that was your prison for 16 years but has now suddenly become your home because protesting activists, your family & friends wouldn’t allow you to live among them, just broke my heart.

गेली सोळा वर्ष जो दवाखान्यातील पलंग तुझा तुरुंग बनला होता, तोच पलंग आता तुझं घर बनतोय कारण निदर्शनं करणारे कार्यकर्ते, तुझे परिवारजन आणि मित्र तुला त्यांच्यासोबत राहू द्यायला तयार नाहीते – हे बघून मी मनोमन खूप रडले.

 

आणि म्हणून – त्यांनी इरोमला सरळ आपल्या घरी रहाण्याचं निमंत्रण दिलंय!

Irom Sharmila if you have no place that is willing to accept you please stay with me in Mumbai, it will be an honour!

इरोम शर्मिला, जर तुला आपलंसं करणारं कुणीच नसेल तर कृपया माझ्याबरोबर मुंबईत रहायला ये, तू माझ्याघरी रहाणं हा माझा सन्मान असेल!

इरोम शर्मिला, आपल्या प्रियकर – Desmond – बरोबर

स्रोत

आणखी बरंच काही बोलल्या नंतर रेणुकाजींनी अप्रतिम समारोप केलाय –

It is a sad commentary on the fascism of people who ironically are fighting for human rights! They should try being human first!

जे लोक स्वतः मानवाधिकारांबद्द्ल लढत आहेत – त्यांच्याकडून तुला असं एकटं पाडलं जाणं – हे त्यांच्या हुकुमशाहीवृत्तीवरील दुःखद भाष्य आहे. ह्या लोकांनी आधी ‘मानव’ बनायला हवं.

 

काय बोलल्याहेत रेणुका शहाणे जी!

 

हा उतारा केवळ मानवाधिकार कार्यकर्तेच नव्हे तर अनेक समाजसेवक, NGOs, राजकारणी ह्यांच्या दुटप्पीपणावर परखड भाष्य करतो.

 

त्यांचं संपूर्ण स्टेटस असं आहे :

 

====

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

 

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?