रशियाने समुद्रात लपवलेल्या ‘या’ महाकाय राक्षसाने अमेरिकेची झोप उडवली होती!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगावर आपले वर्चस्व असावे ही रशियाची प्रबळ इच्छा कधीही लपून राहिलेली नाही आणि त्यासाठी जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने कुरघोडी करण्याचे प्रयत्न रशियाकडून आजही सुरु आहे.
रशियाला ठाऊक आहे की जगावर सत्ता गाजवायची असेल तर आपले संरक्षण खाते मजबूत हवे, जर ते मजबूत असेल तर कोणत्याही राष्ट्राची आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. अमेरिकेने देखील तेच केले होते.
आज जगातील सर्वोत्तम संरक्षण खाते त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच जागतिक महासत्तेचा ताज त्यांच्या डोक्यावर आहे.
त्यांच्याकडे इतकी प्रगत शस्त्रे आहेत की ज्यांचा मुकाबला ह्या घडीला तरी कोणतेही राष्ट्र करू शकत नाही. रशियाला ह्याची जाणीव आहे की, अमेरिकेच्या जागी पोहोचायचे असेल तर त्यांच्यापेक्षा प्रगत अस्त्रे आपल्या भात्यात असलीच पाहिजे आणि त्याच दृष्टीने गेली कित्येक वर्षे रशियाचे प्रयत्न सुरु आहेत.
सोव्हियेत युनियनचा भाग असल्यापासून नवनवीन शस्त्रांचा भरणा करून ते आपण कसे प्रगत होत आहोत याचे दाखले देत असतात.
असेच एक कल्पनेपलीकडील अस्त्र सोव्हिएत युनियनने निर्माण केले होते. त्या अस्त्राचे नाव होते कॅस्पियन सी- मॉन्स्टर! ही एक महाकाय युद्धनौका होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
- झार बॉम्ब : जाणून घ्या रशियाच्या सर्वात मोठ्या आणि विध्वंसक अणुबॉम्बविषयी!
- सुमारे सदतीस वर्षांपूर्वी अंतराळात हरवलेलं रशियाचं यान अखेर नासाला असं सापडलं होतं..
जोवर १९८० साली अमेरिकेने आपल्या गुप्त सॅटेलाईटच्या माध्यमातून या अजस्त्र राक्षसाचा छडा लावला नाही, तोवर रशिया आपल्याकडे असे काही लपवून आहे याची जगाला माहिती देखील नव्हती.
१९८० मध्ये रशिया जेव्हा सोवियत यूनियनचा भाग होता तेव्हा अमेरिका, ब्रिटनसह नाटो देशांना धडा शिकविण्यासाठी रशियाने समुद्रात आपला सी- मॉन्स्टर (समुद्री राक्षस) उतरवला होता. त्याची ताकत आणि स्पीड पाहून नाटोची घबराट उडाली आणि त्यांनी त्याला ‘सी-मॉन्स्टर’ असे नाव दिले.
२० व्या शतकात समुद्रात तरंगणाऱ्या या वॉरशिपचा वेग प्रती तासाला २०० ते २५० किमी इतका होता.त्याची लांबी १०० मीटर आणि वजन ५४४ टन इतके होते.
मुख्य म्हणजे ह्याचे डिझाईन असे काही होते की हे महाकाय अस्त्र समुद्रात कधीच बुडू शकत नव्हते.
सोवियत यूनियनने याची निर्मिती १९७५ मध्येच केली होती. सुमारे २ वर्षे त्याची टेस्टिंग आणि तांत्रिक बदल सुरू होते. यानंतर १९८० मध्ये ही मशिन्स सोव्हीयतने मरीन विभागाला दिली.
पुढे हे देखील उघडकीस आले की सोव्हीयत यूनियनने अशा आणखी तीन ते चार शिपची निर्मिती केली होती. याशिवाय लहान लहान वॉरशिप सुद्धा बनवली होती. ज्यांचा स्पीड या वॉरशिपपेक्षा जास्त होता.
तब्बल ३ वर्षापर्यंत कॅस्पियन समुद्रात तरंगणाऱ्या या युद्धनौकेबाबत जगाला काहीही माहिती नव्हती. सुमारे ३ वर्षानंतर प्रथमच अमेरिकेच्या गुप्त सॅटेलाईटने याचा शोध लावला. तेव्हा अमेरिकेला देखील धक्का बसला.
यानंतर या युद्ध नौकेची माहिती सार्वजनिक झाली आणि नंतर लक्षात आले की, याच्या वेगामुळे रडार सिस्टम त्याला सहज कॅप्चर करू शकत नव्हते. अण्वस्त्राने सज्ज या वॉरशिपमुळे समुद्रात उभ्या असलेल्या युद्धनौकेपर्यंत आवश्यक मदत पोहचवता येत होती.
यावर लावलेली न्यूक्लियर मिसाईलची रेंज ३०० किमीपेक्षा जास्त होती. म्हणजेच ही युद्धनौका शत्रूला काही सेकंदात नामोहराम करू शकत होती.
१९९१ साली सोवियत यूनियनच्या फाळणीनंतर ही युद्ध नौका रशियाच्या वाट्याला आली. आता ही युद्ध नौका एक आधुनिक वॉरशिप म्हणून जगभरात ओळखली जाते.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
- हा “बिहारी बाबू” थेट रशियातून, अन तेही पुतीनच्या पार्टीतून निवडून आला!
- ‘ह्या’ शस्त्रांच्या जोरावर उत्तर कोरिया कोणत्याही बलाढ्य देशाला देऊ शकतो आव्हान!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.