' झोपताना उशी डोक्याशी घेणे चांगले का वाईट, वाचा यामागची १० शास्त्रीय कारणं! – InMarathi

झोपताना उशी डोक्याशी घेणे चांगले का वाईट, वाचा यामागची १० शास्त्रीय कारणं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वप्न पूर्ण होण्यासाठी झोपेतून उठणं आवश्यक असतं तसंच चांगलं स्वप्न बघायला सुद्धा चांगली झोप लागणे आवश्यक असतं! झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी तेवढीच महत्वाची आहे जेवढे आरोग्यदायी इतर घटक. पुरेपूर झोप न मिळाल्यास आपल्याला मनस्ताप होतो.

एका दिवसामध्ये किमान ६ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे असे अनेक आरोग्यतज्ञ सांगतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

झोपताना आपल्यातील बहुतेक लोक उशी घेऊन झोपत असतील. उशी घेऊन झोपल्याने झोप चांगली लागते, असे काही जणांचे म्हणणे असते. मग उशी घेऊन झोपणे हे चांगले की वाईट, याबद्दल संशोधन काय सांगत ते आज आपण जाणून घेणार आहोत!

 

pillows Inmarathi

 

प्राचीन काळात झोपलेले असताना किडे नाका, कानात किंवा तोंडामध्ये जाऊ नये म्हणून दगड, लाकूड यांचा वापर उशीप्रमाणे केला जात होता.

त्यानंतर पडद्याच्या आवृत्यांमधील जेड, बांबू यांचा वापर उशी म्हणून करण्यात आला. पण आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उश्या बाजारात पाहायला मिळतात.

सध्याच्या काळामध्ये आपल्याला या उशांचा विविध प्रकारे फायदा मिळतो.

उशीचा पहिला प्रकार : पातळ उशी

जे लोक पाठ टेकून झोपतात, त्यांच्यासाठी या प्रकारची उशी खूप फायद्याची असते. या प्रकारची उशी तुमचे डोके एका जागी स्थिर ठेवण्यासाठी मदत करते.

sleeping flat on back inmarathi

हे ही वाचा – शांत झोप मिळवणं आहे सोपं! झोपण्यापूर्वी हा व्यायाम करणं नक्कीच ठरेल फायदेशीर…

उशीचा दुसरा प्रकार : टणक आणि जड उशी

कुशीवर झोपणाऱ्या लोकांनी या उशीचा वापर केला पाहिजे. कारण विशेषतः खांदा आणि कान यांच्यामधील अंतर भरून काढण्यासाठी खासकरून या उशीला डिझाईन केलेले असते.

 

 

उशीचा तिसरा प्रकार : पातळ आणि सरळ उशी

जे लोक पोटावर झोपतात, त्यांच्यासाठी ही उशी उपयोगी असते.

काही पोटावर झोपणारे लोक उशी त्यांच्या डोक्याखाली न घेता पोटाखाली घेतात. त्यामुळे असे झोपणाऱ्या लोकांसाठी ही उशी चांगली आहे, कारण ही उशी त्यांच्या पाठीला आराम देते.

उशीचा चौथा प्रकार : मानेची उशी

या प्रकारची उशी तुमच्या मानेला आधार देण्यास मदत करते.

 

child sleeping Inmarathi

 

तसेच, उशी न घेता झोपण्याचे देखील असेचं काही फायदे आहेत.

१. काही लोकांचा असा समज आहे की, उशी न घेता झोपल्यास चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. तसेच इतरही अनेक चेहऱ्याचे फायदे उशी न घेतल्याने होतात.

२. झोपताना उशी न घेतल्यास तुम्ही एकदम सरळ रेषेमध्ये झोपता आणि त्यामुळे तुमचा पाठीचा कणा स्थिर राहतो आणि त्यामुळे तुम्ही झोपेत असताना देखील तुमच्या पाठीचा काणा विस्थापित करू शकता.

 

sleeping with no pilow InMarathi

हे ही वाचा – गाढ झोपेतून खडबडून जाग येते का? मग त्यामागील वैज्ञानिक कारण समजून घ्या…

३. मान आणि खांद्याच्या साधारण वेदना कमी करण्यासाठी आणि त्यांची सारखी होणारी दुखणे टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे उशी न घेता झोपणे.

sleeping time in back problam inmarathi

 

४. असे मानले जाते की, उशी न घेता झोपल्यास हाडांची रचना सरळ आणि सामान्य बनण्यास मदत होते. तसेच, उशी न घेता झोपल्यास कुबड येणे या विषयी काही समस्या असल्यास कमी होते.

५. उशी न घेतल्याने आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्ट्रेस किंवा तणाव येणे कमी होते!

६. आपली स्मरणशक्ती ही आपली सर्वात महत्वाची गोष्ट असते, जेंव्हा आपण शांत झोपतो तेंव्हा आपली स्मरणशक्ती आणि क्रिएटिव्हिटी आणखीन चांगली काम करते पण हेच जर आपण उशी डोक्याखाली घेऊन अवघडलेल्या किंवा चुकीच्या पद्धतीने झोपलो तर त्याचा आपल्या स्मरणशक्तीवर सुद्धा परिणाम होतो!

७. तुमचे लहान बाळ जर कायम उशी घेऊन नीट झोपत असेल तर त्याला ‘flat head syndrome’  होण्याची शक्यता आहे, याचा अर्थ बाळाने डोक्याच्या एकाच बाजूला उशी घेतल्याने त्याच्या डोक्याचा तो भाग चपटा होऊ शकतो, आणि हे टाळण्यासाठी तुमच्या लहान बाळांना उशी न घेता झोपपण्याची सवय लावावी!

 

flat head syndrome inmarathi

 

८. काही लोकांना निद्रानाश चा त्रास असतो, ज्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही,आणि ती लोकं झोपेतून उठून बसतात, चालतात वगैरे वगैरे, पण जर तुम्ही उशीचा वापर न करता झोपलात तर तुम्हाला निद्रानाश चा त्रास कधीच होऊ शकणार नाही!

sleeping-with-vertigo-InMarathi

 

९. कायम उशी घेऊन झोपल्याने तुम्हाला एकाच पद्धतीने किंवा एकाच पोझिशन मध्ये झोपायची सवय लागते जी अतिशय घातक असते.. उशी न घेत तुम्ही कोणत्याही पोझिशन मध्ये झोपायला तुम्हाला त्रास होणार नाही!

 

sleeppositions-1 InMarathi

 

१०. तसेच काही तज्ञांच्या अभ्यासानुसार, झोपताना उशी न घेतल्याने कॅन्सर आणि तत्सम गंभीर आजार व्हायचे प्रमाण कमी होऊ शकते!

अश्या या उशीचे काही फायदे देखील आहेत आणि तोटे देखील आहेत. आता तुम्हीच ठरवा की, झोपताना उशी घ्यायची की नाही ते…

===

हे ही वाचा – औषधांविना शांत झोप लागावी असं वाटत असेल तर हे ५ पदार्थ तुम्हाला हमखास मदत करतील

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?