“आईचा माझ्या कर्तृत्वावर विश्वास होता”, गावस्कर यांनी सांगितलेला किस्सा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
क्रिकेट आणि क्रिकेट मधले किस्से तसेच कित्येक खेळाडूंच्या खासगी आयुष्यातले किस्से आपण सगळ्यांनीच कधी ना कधीतरी ऐकले असतील किंवा वाचले असतील!
आणि आजही ते सगळे किस्से जेंव्हा आपण पुन्हा ऐकतो तेंव्हा आपल्या चेहेऱ्यावर एक वेगळंच समाधान असतं!
भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांची जर यादी बनवायची म्हटली तर त्यात लिटील मास्टर सुनील गावसकर यांचे नाव वरच्या क्रमांकामध्ये येईल यात शंका नाही.
त्यांनी गाजवलेला काळ आजही लोकांच्या आठवणीमध्ये आहे आणि हीच गोष्ट त्यांची फलंदाजी किती उत्कृष्ट होती हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे.
त्यांची बॅटिंग टेक्निक, वेगवान गोलंदाजांसमोर कोणतंही हेल्मेट न वापरता उत्तम बॅटिंग करून चांगली कामगिरी करणं या सगळ्या गोष्टी आजही कित्येक नव्या खेळाडूंना प्रेरणा देत आहेत!
आजही नवोदित क्रिकेटर्स सचिन नंतर कोणत्या क्रिकेटपटूची पूजा करत असतील तर ते आहेत – सुनील गावसकर…
भारताच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळताना देखील त्यांनी भारतीय क्रिकेटचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजवला. अश्या या महान क्रिकेटरने एका समारंभात आपल्या सिलेक्शनचा किस्सा सांगितला. तो किस्सा नक्की काय आहे ते जाणून घेऊया!
म्हणजे जेव्हा ते फक्त एका लोकल टीममधुन खेळणारे खेळाडू होते.
त्यांना घरचे नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक सोडले तर कोणीही ओळखत नव्हते, पण सर्वांना ही गोष्ट माहित होती की, ते उत्तम क्रिकेट खेळतात आणि जर त्यांना संधी मिळाली तर ते खूप यश मिळवू शकतात. हीच गोष्ट हेरली भारतीय सिलेक्शन टीमने.
स्थानिक पातळीवर मैदान गाजवणारे सुनील गावसकर त्यांच्या नजरेत आले होते आणि म्हणूनच १९७१ च्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी दौऱ्यासाठी करण्यात येणाऱ्या सिलेक्शनमध्ये त्यांच्याही नावाची चर्चा होती.
याबद्दलचा किस्सा शेअर करताना सुनील गावसकर सांगतात,
“माझी निवड होईल की, नाही याबद्दल मला खात्री नव्हती. सिलेक्शनचे रिजल्ट डिक्लेअर होण्याचा दिवस उजाडला होता. मी दादर स्टेशनवर उभा होतो. तेवढ्यात ट्रेन आली आणि मी घरी निघालो.
एव्हाना दौऱ्यासाठी अंतिम टीमची निवड झाली होती, परंतु त्यात माझे नाव होते की नाही हे मला माहित नव्हते. ते मला घरी जाऊनच कळणार होते.
मनात धाकधूक सुरु होती. घाबरल्या मनानेच मी घरी पोचलो. आई समोर आली, तिने गेट उघडला परंतु ती काहीही बोलली नाही. मी अजूनच अस्वस्थ झालो.
पण आईकडे पाहिल्यावर एक गोष्ट माझ्या नजरेतून सुटली नाही, ती म्हणजे तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण कदाचित मुद्दामच तो आनंद ती मला दाखवू इच्छित नव्हती.
मला तिच्या चेहऱ्यावरील लपलेला आनंद कळला. मी खुश झालो. घरात शिरल्यावर विनू माकंड यांचा फोन आला आणि ते म्हणाले,
“अभिनंदन सुनील, तुझा भारतीय टीममध्ये समावेश झाला आहे. जा आणि बिनधास्त बॅटिंग कर.”
हे ऐकल्यावर माझा चेहर खुलला. मी आईकडे पाहिलं. आता मात्र तिच्या चेहऱ्यावर माझ्यापेक्षा जास्त आनंद दिसत होता.
आपल्या मुलाला मिळालेली ही जीवन बदलणारी संधी पाहून कोणत्याही आईला आभाळ ठेंगण झालं असतं. त्या दिवशी तिला माझ्याबद्दल वाटणारा अभिमान मला साफ दिसत होता.
हा किस्सा सांगताना सुनील गावसकर काहीसे भावूक झाले होते.
कोणत्याही महान व्यक्तीसाठी तो एक क्षण असतो जो त्याचे अख्खं जीवनच बदलून टाकतो आणि सुनील गावसकर यांच्याबाबतील हा तोच क्षण आहे, जो ते कधीही विसरू शकत नाहीत.
त्या दिवशी त्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात जो प्रवेश झाला, तो जणू इतिहास घडवण्यासाठीच. सचिनच्या आधी भारतीय क्रिकेटप्रेमींनी कोणाला डोक्यावर घेऊन मिरवलं असेल तर केवळ सुनील गावसकर यांनाच.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.