आहारात हे सोपे बदल करा आणि मिळवा तल्लख, तरतरीत बुद्धीमत्ता, वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या कोणतं क्षेत्र स्पर्धेविना आहे का असं विचारलं तर बहुतांशी उत्तर नाही असंच येईल.
म्हणजे अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सगळ्यांनाच स्पर्धेचा सामना करावा लागतो.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, प्रत्येकाला प्रत्येक क्षण आपल्या मेंदुचा वापर करावा लागतो.
घरातली कामं, ऑफिसमधल्या जबाबदा-या या सगळ्यांसाठी आपली बुद्धी तल्लख असावी लागते.
अनेकदा आपण एखादी गोष्ट वारंवार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करोत, मात्र त्यानंतर नेमक्या वेळेला तीच गोष्ट आपण विसरतो, असं तुमच्याबाबत कधी झालंय का?
विस्मरणाची तक्रार घेऊन डॉक्टर किंवा कौन्सिलरकडे जाणा-यांची संख्याही पुष्कळ आहे.
==
हे ही वाचा : कॉम्प्युटरप्रमाणेच झटपट गणिते सोडविणाऱ्या शकुंतला देवींची कहाणी वाचायलाच हवी!
==
मात्र आजार झाल्यानंतर त्यावर उपाय शोधण्यापेक्षा तो आजार होवु नये यासाठी प्रयत्न करणं केंव्हाही चांगलंच.
चला तर मग, या लेखात जाणून घेऊ की तुमच्या रोजच्या आहारातून स्मरणशक्ती कशी वाढवुयात.
स्मरणशक्ती वाढवायचीये? सकस आहार ठेवायचाय?
एक्सपर्ट्सच्या मते, पुढील गोष्टी तुमच्या आहारात नेहेमी असायला हव्या.
मासे
मांसाहारी खवैय्यांसाठी मासे म्हणजे पर्वणीच.
ताजे मासे, मग ते फ्राय केलेले असो वा मसालेदार, माशांची चव कायमच त्यांच्या जीभेवर रेंगाळते.
पण हे मासे तुमच्या स्मरणशक्तीसाठीही उपयुक्त आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का?
हेल्थ एक्स्पर्ट म्हणतात की पेडवे, रावस, बांगडा ह्या माश्यांमध्ये omega-3 fatty acids भरपूर प्रमाणात असतं. ह्या acids मुळे मेंदू तल्लख राहतो.
आठवड्यातून दोनदा हे मासे खाल्ल्याने अनेक मेंदूचे विकार दूर रहातात, शिवाय स्मरणशक्ती अधिक सुधारते.
त्यामुळे आता यापुढे मासे खाणार असाल, तर चवीसह त्याच्या या उपयोगांचाही विचार करा.
हिरव्या भाज्या
ताज्या भाज्या नेहमी खाव्यात असा सल्ला थोरामोठ्यांप्रमाणे डॉक्टरही देतात.
त्यातच पालेभाज्या खाणं महत्वाचं.
पण असे अनेकजण आहेत जे पालभाज्या पाहिल्या की नाक मुरडतात. पालेभाज्यांना नकार देतात.
पण जेंव्हा तुम्हाला पालेभाजीचा हा आणखी एक नवा गुणधर्म समजेल तेंव्हा तुम्ही पालेभाज्या नक्की खाल.
पालक, मेथी, अळु या आणि यासारख्या अनेक पालेभाज्या, ज्या तुमच्यापैकी अनेकांना आवडत नाहीत, त्या तुमच्या मेंदुसाठी अत्यंत गुणकारी आहे.
हिरव्या भाज्या संपूर्ण शरीराच्याच आरोग्याला अत्यंत हितकारी आहेत. पण त्यांचा मेंदूवर विशेष परिणाम होतो.
विशेषतः पालक आणि ब्रोकोली भरपूर खा – त्यातील antioxidants, folate, beta-carotene आणि vitamin C मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवेल.
==
हे ही वाचा : “चतुर बिरबल” या पलीकडे फार माहिती नसलेल्या बिरबलाच्या या गोष्टी प्रत्येकाने वाचायलाच हव्यात!
==
संडे हो या मंडे – !!!
संडे हो या मंडे असं म्हणताच, डोळ्यांसमोर अंड आपोआप येतं.
मात्र तुमच्या दररोजच्या आहारातल्या या अंड्याची उपयुक्तता तुम्हाला ठाऊक आहे का.
अंड्याचं बलक मेंदूसाठी गुणकारी आहे.
त्यातील विटामिन्स आणि मिनरल्स मेंदू तल्लख ठेवतात.
शिवाय भरपूर प्रमाणातील आयर्नमुळे लाल रक्तपपेशी तयार होतात, ज्याने मेंदूला ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होतो. अंड्यातील विटामिन B12 आणि आयोडीनमुळेसुद्धा मेंदू तल्लख रहातो.
ग्रीन टी
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिणा-यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
जर तुम्ही ग्रीन टी पित असाल, तर मग त्याचा आणखी एक चांगला गुण तुम्हाला माहित असायलाच हवा.
आपला मेंदू ७०% पाण्याने बनलाय!!! आश्चर्य वाटलं ना! ह्यावरूनच पाण्याचं महत्व लक्षात येतं.
पण सारखं सारखं किती पाणी पिणार ना? म्हणून ग्रीन टी प्या. त्यातल्या antioxidantsमुळे मेंदू शांत, स्थिर होण्यास मदत होते, anxiety कमी होते.
डार्क चॉकलेट
चॉकलेट न आवडणारी व्यक्ती तशी दुर्मिळच.
लहान मुलांना अनेकदा चॉकलेट खाण्यावरून अनेकदा पालकांची बोलणी खावी लागतात.
मात्र आता याच चॉकलेटचा स्मरणशक्तीला होणारा फायदा वाचल्यानंतर ठराविक प्रमाणात चॉकलेट खायला हरकत नाही असं तुम्ही नक्कीच म्हणाल.
डार्क चॉकलेटमधल्या flavonoids मुळे मानसिक कौशल्य वाढीस लागतं.
Flavonoids मुळे नवीन न्युरॉन्स तयार व्हायला मदत होते ज्याने नवनवीन गोष्टी लक्षात ठेवण्याची मेंदूची क्षमता वाढते. ह्याशिवाय, flavonoids मुळे मेंदूतील रक्तप्रवाह सुधारण्याचासुद्धा फायदा होतो.
==
हे ही वाचा : मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय ? मग या गोष्टी कधीच करु नका …
===
महत्वाच्या ऐतिहासिक व वर्तमान घडामोडींची माहिती : inmarathi.com
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.