एलीयन्सच्या शोधासाठी नासाला मदत करणाऱ्या एका भारतीयाची गोष्ट…..!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
आपल्या पृथ्वीला सोडून एक दुसरे विश्व देखील आहे, असे आपल्याला गोष्टींमध्ये सांगण्यात आलेले असते. खूप लोकांकडून आपण हे ऐकत असतो. बहुतेक चित्रपटांमध्ये देखील त्या जगाचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
त्यांचे जग हे आपल्या जगापेक्षा कितीतरी वेगळे आहे, असे लोक मानतात.
वैज्ञानिक देखील या जगाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या जगामधील लोकांचे राहणीमान, त्यांचे अस्तित्व आपल्या लोकांना पटवून देण्यासाठी वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञ आपल्या पातळीवर योग्य ते प्रयत्न करत आहेत.
नासाने एक असा प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये एलियन शोधण्याचे काम सुरू आहे आणि त्यामध्ये एका भारतीयाचा देखील समावेश आहे. चला तर मग जाणून या प्रकल्पामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका भारतीयाची गोष्ट आणि त्या प्रकल्पाची माहिती….
Breakthrough Listen नावाचा एक ग्लोबल एस्ट्रोनॉमिकल प्रकल्प जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांच्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. १०० मिलियन डॉलरचा हा प्रकल्प ब्रम्हांडामध्ये एलियनचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे.
यामध्ये एका उच्च क्वालिटीच्या यंत्राचा वापर करून अंतरीक्षमध्ये हाय फ्रिक्वेन्सी पाठवली जाते, जेणेकरून परजीवांद्वारे येणारे सिग्नल कॅप्चर करता येतील.
या प्रकल्पामध्ये एक भारतीय देखील सामील आहेत, त्यांचे नाव विशाल गज्जर हे आहे.
त्यांचा जन्म गुजरातमधील एक छोटे गाव बोताड येथे झाला होता. त्यांनी तिथूनच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर विशाल गज्जर यांनी भावनगरच्या लाल शांती इंजिनियरिंग महाविद्यालयामधून इलेक्ट्रोनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये आपले इंजिनियरिंग पूर्ण केले.
विशाल गज्जर यांना अॅस्ट्रोनॉमीची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पी.एचडीसाठी नॅशनल सेंटर फ़ॉर अॅस्ट्रोफ़िजिक्स जॉइन करण्याचा निर्णय घेतला आणि मार्च २०१६ पासून कॅलिफोर्नियाच्या विद्यापिठामध्ये काम करण्यास सुरुवात केली.
या प्रकल्पाद्वारे आतापर्यंत १५ फास्ट रेडीओ बर्स्ट (FRB) सिग्नल्सचा पत्ता लावण्यात आलेला आहे. या ट्रान्समिशनच्या स्रोतांना FRB १२११०२ म्हटले जाते. याला रिपीटर देखील म्हटले जाते, कारण हे सारखे-सारखे या सिग्नलना तयार करत असतात.
हेच कारण आहे की, वैज्ञानिक या सिग्नलवर खास लक्ष ठेवत आहेत, कारण हे सिग्नल फक्त एकदाच आले तर याला एखादा तारा तुटणे किंवा उल्कापिंडच्या स्फोटाशी जोडून बघितले जाते.
पण आताच या रहस्यमय सिग्नलच्या उत्पत्तीबद्दल काहीही सांगणे खूप कठीण आहे. जर हे FRB एलियन्सद्वारे तयार करण्यात आलेले असले, तरीसुद्धा अंतरामुळे या परजीवींशी संपर्क साधता येण्याची संभावना खूप कमी आहे.
Breakthrough Listen ला २०१५ मध्ये लाँच केले गेले होते. महान वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग आणि इंटरनेट इंवेस्टर यूरी मिलनर यांनी हा प्रकल्प सुरू केला होता.
असे तर प्रोफेसर हॉकिंगच या प्रकल्पाचे सूत्रधार आहेत, पण ते आज देखील हीच आशा करतात की, जमिनीवरील लोकांचे या एलियन्स बरोबर कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ नये.
हॉकिंगनुसार Extraterrestrials एक असे जीव देखील असू शकतात, जे ब्रम्हांडातील संसाधनांचा उपभोग घेण्यासाठी जगाच्या शोधात असतील आणि अशावेळी ते कितीतरी ग्रहांवर आपला ताबा मिळवतील किंवा तिथेच जीवनाच्या शोधामध्ये वसतील.
अशावेळी कमी संसाधनाच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या आपल्या जगासाठी एक मोठे संकट ठरू शकते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.