' मोबाईल सगळेच वापरतात, मात्र त्याच्या आकारामागील ही खास बहुतेकांना ठाऊक नसते – InMarathi

मोबाईल सगळेच वापरतात, मात्र त्याच्या आकारामागील ही खास बहुतेकांना ठाऊक नसते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मोबाईल फोन… आपल्या सर्वांची अन्न, वस्त्र आणि निवारा याहीपेक्षा गरजेची आणि तेवढीच आवडीची वस्तू. एकदाच जेवण मिळालं नाही तरी चालेल पण फोन हवा, अशी आत्ताची परिस्थिती झालीये. काही जणांसाठी तर त्यांचा फोन म्हणजे जीव की प्राण असतो, एका सेकंदासाठीही ते फोनला स्वतःपासून दूर होऊ देत नाही…

काही तर इतके मोबाईल वेडे असतात की त्यांना फोनच्या सिस्टीम पासून तर त्याच्या प्रत्येक फंक्शन बद्दल माहिती असते… मला माहित आहे तुमच्यापैकी बरेच जण असे असतील किंवा तुमच्या परिचयाचे असतील… पण त्यात वाईट काय आहे… आज आपली महत्वाची सर्व कामे हा फोन करतो.

 

vivo_y50_InMarathi

 

आपलं मनोरंजनाचं, विरंगुळ्याचं साधन म्हणजे हा फोन. मग त्याला तेवढं महत्व तर द्यायलाच हवं ना… असो, पण तुम्ही या मोबाईल फोनच्या आकाराकडे कधी लक्ष दिलंय का…?

या फोनच्या आतलं तर आपल्याला सर्व माहित असत पण तुमच्या डोक्यात कधी हा प्रश्न आलाय की आपला हा प्रिय मोबाईल फोन हा Rectangular म्हणजेच आयताकृती अकराचाच का असतो… तो वर्तुळाकार, त्रिकोणी किंवा इतर कुठल्या आकाराचा का नसतो… कधी विचार केलाय याचा… नाही म्हणताय… मग चला आज आम्ही तुम्हाला तुमचा फोन हा आयाताकृतीच का असतो यामागील लॉजिक सांगतो…

 

mobail InMarathi

सुरवातीला आपण जुन्या फोन्स बद्दल जाणून घेऊ, सर्वात जुने सेल फोन नैसर्गिकरित्या आयताकृती आकाराचे असायचे कारण त्यातल कीपॅड, डिस्प्ले, मायक्रोफोन, ऍन्टेना आणि स्पीकरला यासर्वांचे स्थान बघितले तर ते आयताकृती आकारातच नीट बसतात, म्हणून ते आयताकृती असायचे. पण आत्ताच्या स्मार्टफोनचं आयताकृती असण्यामागे वेगळं लॉजिक आहे. ते काय आहे हे जाणून घेऊ…

त्रिकोणी किंवा वर्तुळाकार आकाराच्या तुलनेत आयताकृती आकाराची वस्तू हाताळण्यास सोपी असते. तेच तुम्ही एखादी गोलाकार वस्तू हाताळण्याची कल्पना करा जसे की सीडी… कल्पना करा जर आपले फोन गोलाकार किंवा त्रिकोणी आकाराचे असते तर त्यावर टाईप करताना कस वाटल असत… ते कम्फर्टेबल असते…?

काय ते आपल्या पॉकेटमध्ये नीट ठेवता आले असते…? थोडं विचित्र आणि डिफिकल्ट वाटत ना… म्हणूनच तर आपले मोबाईल फोन्स हे आयताकृती असतात कारण ते हाताळण्यास सोपे आणि वापरण्यास फेक्सिबल असतात.

mobile phone shape03-marathipizza
gigaom.com

कदाचित आपण कधी आपल्या फोनच्या पैलूंकडे लक्ष दिल नसेल… पण याचा एक aspects ratio असतो, ज्यामुळे युजर मोबाईल हाताळत असताना त्याला स्क्रीन क्लॅरिटी आणि पिक्चर क्वालिटी मिळते. याचा उत्तम आणि स्टॅंडर्ड aspects ratio हा 16:9 आहे.

mobile phone shape01-marathipizza
i.ytimg.com

इतर आकारांपेक्षा अक्षरांची आणि वर्णांची सिमेट्री आयताकृती आकारांत जास्त चांगली बसते. तसेच यात स्क्वेअर पिक्सल्स व्यवस्थित बसतात ज्यामुळे कुठल्याही प्रकारची गॅप राहत नाही. पण जर आपण इतर आकारांचा विचार केला तर त्यात विनाकारण जागा वाया जाईल तसेच त्यात एकत्र पिक्सेल्स बसणार नाहीत आणि बसले तरी ते खूप विचत्र दिसतील. इतर आकारांत अक्षर तसेच वर्ण यांना प्रॉपर जागा नसल्याने १०० टक्के जागेचा वापर देखील होणार नाही.

mobile phone shape02-marathipizza
qph.ec.quoracdn.net

जर तुम्ही गणिताचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला परिमिती (perimeter) हा शब्द माहीतच असेल. गणितानुसार आयातीची परिमिती ही वर्तुळ किंवा त्रिकोणापेक्षा जास्त असते. ( Perimeter of a rectangle > Perimeter of a circle or a triangle).

  • आयत = २ (लांबी + रूंदी) [Rectangle : 2(length+breadth)]
  • वर्तुळ = २*पाय*त्रिज्या [Circle : 2*pie*radius]

वरील समीकरणांवरून हे दिसून येत की आयत हे वर्तुळापेक्षा जास्त जागा व्यापते.

mobile phone shape06-marathipizza
iywlovelove.blogspot.in

मोबाईल फोन्स हे आपल्याला हाताळण्यासाठी  सोपे असावे म्हणून वरील सर्व बाबींचा विचार करून त्यांना हा आयताकृती आकार देण्यात आला असावा…

काय मग आता कळालं ना की  आपले मोबाईल हे आयताकृती असतात ते…

जर तुमचेही कोणी मोबाईल वेडे मित्र/मैत्रिणी असतील तर त्यांना हा प्रश्न नक्की विचारा आणि त्यांच्यासोबत ही पोस्ट शेअर करा…!

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?