तब्बल १०,००० खोल्या असलेल्या या हॉटेलला ७२ वर्षांपासून आहे ग्राहकांची प्रतिक्षा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगात अश्या अनेक वास्तू, ठिकाणे आहेत, ज्या अतिशय भव्य दिव्य, देखण्या आहेत, पण दुर्दैवाने काही घटनांमुळे आज त्या ओसाड आहेत, तेथे जाणे लोक टाळतात. अश्याच ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे ‘प्रोरा’ नावाचे हॉटेल.
स्थानिकांच्या मते या हॉटेलशी अनेक रहस्यमयी गोष्टी निगडीत आहेत. तर बऱ्याच जणांच्या मते त्या निव्वळ भाकडकथा आहेत, कारण त्या संबंधित कोणताही पुरावा उपलब्ध झालेला नाही. पण असे असूनही लोकांच्या मनात अजूनही या हॉटेलविषयी आकर्षण नाही.
तब्बल १०,००० खोल्या असूनही या हॉटेलमध्ये राहायला कोणीही येत नाही. जणू या हॉटेलला ओसाड असण्याचा शापच मिळाला आहे.
हे हॉटेल जर्मन आयलंड रुगेनमध्ये बाल्टीक समुद्राच्या किनारी वसलेले असून ते इतके भव्य आहे की, त्यात तब्बल १०,००० खोल्या आहेत. मुख्य गोष्ट ही की हॉटेल सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोणीच या हॉटेलमध्ये राहायला आलेले नाही. असे का? त्याचे ठोस कारण मात्र कोणाकडेही नाही.
या हॉटेलबद्दल अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे जे हॉटेल नाझींनी बनवले होते. त्यांनी १९३६ ते १९३९ दरम्यान या हॉटेलचे निर्माण केले.
नाझींनी हे हॉटेल आयुष्याचा आनंद घेण्यासोबतच आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी बनवले होते. जर्मन कर्मचार्यांनी त्यांचा रिकामा वेळ या हॉटेलमध्ये घालवावा आणि या दरम्यान नाझी विचारधारेचा त्यांच्यात प्रचार करता यावा हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे हॉटेल बनवण्यात आले होते.
या कॉम्प्लेक्समध्ये आठ वेगवेगळ्या इमारती आहेत. ज्यांची रुंदी साडेचार किलोमिटर एवढी आहे, तर समुद्राच्या बीचपासून हे हॉटेल अवघ्या १५० मीटर अंतरावर आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
==
- हॉटेलमध्ये राहताना नकळत होणारी फसवणूक टाळण्यासाठी या ७ गोष्टी फायद्याच्या
- हॉटेल, मोटेल की रेस्टॉरंट? निवड करताना भेडसावणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर नक्की वाचा
==
आठ हाऊसिंग ब्लॉकसोबतच, या हॉटेलमध्ये चित्रपट गृह, स्विमिंगपूल आणि उत्सव साजरा करण्यासाठी मोठे हॉलसुध्दा आहेत. युध्दादरम्यान हॅम्बर्गचे अनेक लोक या हॉटेलमध्ये वास्तव्यास आले होते. युध्दानंतर प्रोराचा वापर पुर्व जर्मनीच्या सैन्याने लश्कर आऊटपोस्टप्रमाणे केला.
१९९० मध्ये जर्मनीच्या एकीकरणानंतर ही इमारत खालीच आहे. या हॉटेलच्या निर्मितीला तब्बल ७० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. समुद्र किनारी वसलेल्या या हॉटेलच्या सर्वच खोल्यांमधून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.
मात्र तरीही या हॉटेलमध्ये राहाणे कोणीच पसंद केले नाही आणि आता तर हॉटेलची अवस्था इतकी खराब झाली आहे की, जो पर्यंत त्याचे नूतनीकरण होत नाही तोवर कोणी ग्राहक त्यात पाउल ठेवणे अशक्य आहे.
या हॉटेलच्या बांधकामात देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांचा सहभाग होता.
जवळपास ९ हजार कामगारांनी ही इमारत बनवण्यासाठी कष्ट घेतले आहेत. दुसर्या जागतिक महायुध्दानंतर प्रोराचे बांधकाम थांबवून सर्व कामगारांना शस्त्र बनवण्याच्या कंपन्यांमध्ये हालवण्यात आले आणि हा प्रकल्प अर्धवटच राहिला. आता या हॉटेलची अवस्था खुपच खराब झाली आहे.
सध्या हे हॉटेल कोणा खासगी रियल इस्टेट गुंतवणूकदाराला देऊन याला सुंदरशा रेसॉर्टमध्ये बदल करण्याचा विचार सुरू आहे. समुद्राकिनारी असल्याने अनेक डेव्हलपर येथे हॉलिडे अपार्टमेंट बनवण्याचा विचार करत आहेत.
काय मग… तुम्ही जाणार का या हॉटेलमध्ये??
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
- १० रुपयांच्या हव्यासापोटी हॉटेलला २ लाख दंडाचा दणका! जाणून घ्या ग्राहक हक्क…
- हॉटेलमध्ये तुम्ही वापरलेल्या साबणांचं नेमकं होतं तरी काय? जाणून घ्या!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.