ब्रिज खालचं उद्यान : माटुंगाकरांचा नवा अर्बन जुगाड!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
====
मुंबई – राज्याची आर्थिक राजधानी जी कधीच थांबत नाही, जिथल्या झोपडीला सुद्धा ‘भाव’ आहे. अश्या गजबजलेल्या मुंबईत पूल म्हणलं की अतिक्रमण ठरलेलंच – मग तिथं झोपडी असो की फेरीवाल्यांचे टेबलावर थाटलेले दुकान.
मोकळा श्वास घेण्यासाठी जागेच्या शोधात असतांना, अतिक्रमणाला कंटाळून माटुंगा करांनी केला एक अर्बन जुगाड. तुळपुळे पुलाखाली बनवलं एक उद्यान. जवळजवळ ६०० मी लांब उद्यान – ज्यात काही हिरवे गालिचे, आकर्षक रोषणाई तर काही कारंजी आहेत.
आधी तर इथे एक साधा पूल होता, त्याखाली नेहमीसारखीच झोपडपट्टी तयार होती. नागरिकांनी पुलाखाली होत असलेल्या अतिक्रमणाबद्दल लक्षात येताच हा मुद्दा महानगरपालिकेत मांडून सभोवताली जाळी बसवून घेतली. त्यानंतर नागरिकांनी एका Private Security कंपनीला देखभालीच काम दिलं. महानगरपालिकेचे १०-१२ कर्मचारीसुद्धा इथे कचराकुंडी होणार नाही ह्याची काळजी घेतच होते.
दोन वर्ष असंच चाललं, मग २०११ मध्ये नागरिकांनी सरकारी यंत्रणेचा ‘उद्याना’च्या संकल्पनेसाठी पाठपुरावा केला. शेवटी जुन २०१५ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने ह्या जागेवर कामाला सुरुवात केली.
माटुंगा येथील तुळपुळे पुलाखालच्या ह्या उद्यानचं नाव आहे ‘नानालाल डी. मेहता गार्डन’. लोकसहभागातून हे उद्यान प्रत्यक्षात आलंय. एक संघटना – One Matunga तयार झाली जिने पुढाकार घेऊन माटुंगा ला हे उद्यान दिलंय.
उद्यान नर्मदा नदीसारखं बनवलंय – Engineers आणि Architects ह्यांनी नर्मदा नदीचा प्रवाह अभ्यासून त्यात उद्यान बनवलंय. नदीचा प्रवाह म्हणजे उद्यानातील रस्ता आणि आजूबाजूला नदीच्या मार्गावरील गोष्टी – जसे मंदिर, डोंगर, इ. दाखवले आहेत. जागोजागी ग्रेनाईट च्या दगडांवर प्रत्येक जागेचे वर्णन केलेले बोर्ड्स लावले आहेत. लोकांना बसण्यासाठीच्या जागेला ‘नर्मदा घाटा’चं रूप दिलंय. त्याचे काही फोटो..
सर्फ फोटोजचा स्रोत : One Matunga
उत्तम रंगसंगतीने नटलेलं हे उद्यान सध्या मुंबईकरांच आकर्षणाच स्थान बनलंय…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.