पंचामृतामधील सर्वगुणसंपन्न असलेले हे दोन पदार्थ तुमच्या अनेक रोगांवर रामबाण उपाय ठरू शकतील
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मागील भागाची लिंक : एकशे अकरा वर्ष जुने ‘तुप’ : आहारावर बोलू काही – भाग ३
===
लेखिका – प्राजक्ता जोशी
—
पंचामृतील शेवटच्या दोन घटकांची माहीती आज आपण घेणार आहोत. दुध व मध यांची माहीती ही भारतातील घराघरात पोहचलेलीच नव्हे तर रूजलेली आहे. त्यामुळे संक्षेप्तच माहीती घेवुया.
दूध
दुधातील पोषकांश –
Calories – 62cal
Protein – 3.32gm Suger (lactose) -5.42gm
Fat – 3.35gm vitA – 2% Sodium – 41 mg
Carbs – 4.66gm Calcium – 12% Potassium – 147mg
दुधाचे आयुर्वेदीक महत्व
आयुर्वेदात वेगवेगळ्या प्राण्याच्या दुधाचे विविध गुण सांगितले आहेत. त्यामध्ये गायीचे दुध व आईचे दुध श्रेष्ठ सांगितले आहे.
१) गायीचे दुध मधुर रसात्मक, शीत गुणात्मक असते. यामुळे शरीरातील ओज धातुची वृद्धी होवुन सतेज कांती, ऊत्तम स्मृती व रोगप्रतिकारक्षमता वाढते.
२) म्हशीचे दुध हे पचनास जड असते, पण हे पचन संस्थेचे स्नेहन (cleansing)करते. तसेच अनिद्रे( insomnia) तही ऊपयुक्त ठरते.
३) ऊंटाचे दुध हे रूक्ष गुणात्मक असुन आध्मान (bloating), शोथ(oedema-सुज), मुळव्याध, जलोदर या व्याधीत ऊपयुक्त ठरते. वातजन्य व्याधी व कफ जन्य व्याधीत ऊपयुक्त ठरते.
४) बकरीचे दुध हे ऊत्तम शोषक (absorbent), पचनास हलकेअसते. रक्तजन्य व्याधी, ज्वरात अत्यंत उपयुक्त ठरते. डांग्याखोकला, दमा या व्याधीत देऊ नये.
५) आईचे दुध हे सर्वगुणसंपन्न व सर्वात पोषक आहे. शिशुच्या पोषणासाठी तर ते ऊत्तम आहेच, पण नेत्रशुल (डोळे दुखणे), Haemothermia यातही ते ऊपयुक्त आहे.
मध
आयुर्वेदानुसार मध 4 हे प्रकारचे असुन त्यात माक्षिका मधु (मध) उत्तम व औषधी आहे. त्याचे स्वरूप तेलाप्रमाणे सांगितले आहे.
१) मध हा लेखणिय द्रव्य आहे. हा शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतो.
२) शरीरातील पित्तदोषाचे व शरीराचे शोधन करते.
३) “योगवाहि”हा मधाचा गुण सांगितला आहे. म्हणजेच मध catalyst प्रमाणे कार्य करतो.
अशा प्रकारे पंचामृतातील प्रत्येक घटक हा लाभदायक आहे व पंचामृतात तो समप्रमाणात घेतलेला असतो. पंचामृताचे विशेष ऊपयोग पुढीलप्रमाणे :
१) त्वचा सतेज राहते.
२)बुद्धीवर्धक आहे.
३) मन प्रसन्न राहते.
४) एकाग्रता वाढते.
५) गांभीर्याने याचे नित्य सेवन केल्यास सुदृढ व बुद्धिमान संतती होते.
—
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.