CFL बल्ब्स वापरावे की LED? पैश्याची अणि विजेची बचत करायची असेल तर नक्की वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
घरातील सर्वात महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक वस्तू म्हणजे बल्ब!
बल्ब खराब झाला की आपण गाठतो दुकान, मग दुकानदार विचारतो कोणता बल्ब देऊ – एलईडी की सीएफएल? झालं…
हा प्रश्न आला की काय उत्तर द्यावं हे कळतंच नाही.
मग जो बल्ब स्वस्तात मिळेल तो आपण निवडतो. हे या यामुळे होतं कारण अजूनही जनसामन्यांना एलईडी आणि सीएफएल बल्ब यामधील फरकच माहिती नाहीये.
मात्र कुठला बल्ब वापरणं आपल्या फायद्याचं आहे याचा विचार व्हायला हवा. ‘बल्बची किंमत’ या एकाच गोष्टीवर हा फायदा अवलंबून नसतो.
या दोन्ही प्रकारांबद्दल अधिक माहिती असणे गरजेचे आहे.
चला तर आज आपण हाच फरक जाणून घेऊया, मग तुमची निवड जरा सोप्पी होईल!
एलईडी बल्ब म्हणजे काय?
एलईडी म्हणजे ‘लाइट एमिटिंग डायोड’ होय. आजवरच्या सर्वोत्तम शोधांपैकी एक म्हणून याची गणना केली जाते. एलईडी इतर कोणत्याही बल्बपेक्षा जास्त उर्जा आणि प्रकाश देतात.
साहजिकपणे अधिक कल एलईडीकडे असणं फायदेशीर आहे.
याच कारणामुळे विविध उद्योग क्षेत्रांमध्ये एलईडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. परंतु यामध्ये लेड (lead) आणि निकेल (Nickel) सारखे हानिकारक घटक देखील असतात.
एलईडी बद्दल सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की एलईडी रिसायकल करता येतात. जवळपास ९५ टक्के एलईडी हे रिसायकल होऊ शकतात.
याशिवाय, एलईडी रिसायकल करायला दिल्यास त्याबदल्यात अर्थी फायदा सुद्धा होऊ शकतो.
सीएफएल बल्ब म्हणजे काय?
सीएफएल म्हणणे ‘कॉम्पैक्ट फ्लोरोसेंट लाइट’ होय. हे बल्ब इतर अनेक प्रकारच्या बल्बपेक्षा जास्त उर्जा देतात. पण एलईडीपेक्षा कमी उर्जा देतात. सीएफएल बल्बमध्ये अरगॉन या वायूचा वापर करण्यात येतो.
त्यात काही प्रमाणात पाऱ्याची मात्रा देखील कमी असते.
ऑफिसात, दुकानात वा घरांमध्ये जे बल्ब पाहायला मिळतात, ते बऱ्याचदा सीएफएल असतात.
काय आहे एलईडी आणि सीएफएल बल्ब मधील फरक?
एलईडी बल्ब हा सीएफएल बल्बच्या तुलनेत कमी वीज वापरतो, सीएफएल बल्ब एका वर्षाला सरासरी ८० % उर्जेचा वापर करतो.
एका एलईडी बल्बचे आयुष्य हे साधारणत: ५०,००० तास किंवा त्यापेक्षा जास्त असते. तर दुसऱ्या बाजूला सीएफएल बल्बचे आयुष्य हे ८,००० तासांपुरतेच मर्यादित असते.
एलईडी बल्ब हे सीएफएल बल्बपेक्षा जास्त महाग असतात.
सीएफएलपेक्षा एलईडी बल्ब जास्त टिकाऊ आणि अधिक काळ वापरता येणारे असतात.
एलईडी बल्बचा आकार सीएफएल बल्बपेक्षा लहान असतो.
सीएफएल बल्बचा बाह्य भाग हा काचेचा असतो. तो फुटला तर सीएफएल बल्ब बदलावा लागतो. ही त्रुटी एलईडीमध्ये पाहायला मिळत नाही.
एलईडी बल्बचे सर्व घटक त्याच्या आतच असतात. त्याचा बाह्य भाग प्लास्टीक कोटिंगचा असल्याने सहसा फुटत नाही. मुख्य गोष्ट म्हणजे जरी हा भाग फुटला तरी एलईडी बल्ब वाया जात नाही. तो त्यानंतर सुद्धा वापरता येऊ शकतो.
सीएफएल बल्बमध्ये तुम्हाला ६ महिने ते २ वर्षापर्यंतची वॉरंटी मिळते. पण एलईडी बल्बमध्ये मात्र २ वर्षे ते ३ वर्षे इतकी वॉरंटी मिळते.
सीएफएल बल्ब लवकर गरम होतो. याउलट एलईडी बल्ब सहसा गरम होत नाही.
सीएफएल बल्बपेक्षा एलईडी बल्ब वजनात हलके असतात.
भारत सरकारतर्फे एलईडी बल्ब वापरासंदर्भात एक योजना आहे. ज्या अंतर्गत वीज कार्यालयामध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे जमा करून तुम्ही ८५० रुपयांमध्ये उजाला कंपनीचे विविध वॉटचे १० बल्ब खरेदी करू शकता. ज्यासाठी तुम्हाला प्रत्येक बल्बमागे २ वर्षांची वॉरंटी मिळते.
सीएफएल बल्बसाठी अशी कोणतीही योजना नाही. त्यामुळे एलईडी अधिक महाग असण्याची चिंता कमी झाली आहे.
या कारणांमुळेच ग्राहकांचा कल एलईडी वापराकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.