' पर्यटकांचं आकर्षण असलेल्या ‘दुबई’बद्दलच्या या १० गोष्टी तुम्हाला अचंबित करतीलच..! – InMarathi

पर्यटकांचं आकर्षण असलेल्या ‘दुबई’बद्दलच्या या १० गोष्टी तुम्हाला अचंबित करतीलच..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

दुबई म्हणजे ड्रीम सिटी म्हणता येईल. येथील गगनचुंबी इमारती, येथे येणारे हजारो परदेशी नागरिक आणि येथील झगमगीत नाईट लाईफ यामुळे दुबई नेहमीच चर्चेत असते. येथील हॉटेल्सची तर निराळीच शान…!

१९६० च्या  उत्तरार्धात येथे फक्त वाळूचा ढीग होता. त्यावेळी येथे फक्त एकच इमारत होती आणि जमिनीवर फक्त डझनभर गाड्या होत्या, परंतु गेल्या ५० वर्षात दुबईने खूप प्रगती केली आहे.

विविध देशांमधून कामगार येथे कामासाठी येतात, पर्यटकांची तर वर्षभर रीघ असते. आज आपण याच संपन्न दुबई बद्द्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊ!

१. दुबईमध्ये गुन्ह्यांचा दर ० % आहे.

 

dubai-facts-marathipizza-01
cnn.com

 

शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतौम याच्या कठोर शासन कायद्यामुळे दुबईमध्ये गुन्ह्यांचा दर ० % आहे. या शहरामध्ये बाहेरून आलेल्या पर्यटकांना सुद्धा सर्व कायदे लागू असतात. जर पर्यटकांनी काही गुन्हा केला, तर त्यांना सुद्धा कारवाईला सामोरे जावे लागते.

शेख यांचे दुबई पोलीसदल या कामात अभिमानास्पद कामगिरी बजावतात. दुबईमधील प्रत्येक पोलीस कारला अमेरिकेतील एका व्यक्तीस महाविद्यालयामध्ये पाठवण्याइतपत खर्च येतो. दुबई पोलिसांच्या गाड्या देखील बड्या बड्या श्रीमंतांना लाजवतील अश्या आहेत.

पोलीस कारच्या विविध मॉडेल्समध्ये  ५.००,००० डॉलर किंमतीच्या फेरारी, ४,००,००० डॉलर किंमतीच्या लॅंबोरगिनि आणि १.७ मिलियन डॉलर किंमतीच्या अॅस्टन मार्टिन यांचा समावेश आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा 

२. दुबईची ८३ % लोकसंख्या स्थलांतरित आहे.

 

dubai-facts-marathipizza-02
cultureshocktherapy.com

 

बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या देशांमधून शेकडो लोक  दुबईमध्ये स्थलांतर करतात. परिमाणी, शहरातील ५० % लोक स्थलांतरित आहेत आणि केवळ १७ % लोक हे स्थानिक आहेत आणि उर्वरित दुबईला भेट देणारे पर्यटक आहेत.

पण येथील स्थलांतरित कामगारांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे, त्याचे कारण म्हणजे दुबई हे शहर प्रगत असल्यामुळे तेथील भाडे, विजेचे बिल आणि शिक्षण त्यांना परवडत नाही. पण जे उच्च पदावर कामाला आहेत, त्यांना मात्र खूपच चांगले वेतन दिले जाते. जगभरातील विविध मानवाधिकार संघटना येथील ब्लू-कॉलर कामगारांना ज्या पद्धतीने वागवले जाते, त्यात बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

३. दुबईमध्ये कोणीही कर्जदार नाही.

 

dubai-facts-marathipizza-03
aljazeera.com

 

दुबईमध्ये कोणीही कर्ज घेतले तर ते वेळच्या वेळेत पूर्ण द्यावे असा जणू नियमच आहे. जर तुम्ही क्रेडीट कार्डसाठी डिफॉल्टरच्या यादीमध्ये आलात किंवा तुम्ही एखाद्याचे पैसे बुडवलेत तर तुम्हाला थेट तुरुंगाची हवा खावी लागते.

कधी कधी तर थेट देशातून हद्दपार केले जाते. दुबईमध्ये पगारावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही.

 

४. मानवनिर्मिती उपायांनी दुबई ‘थंड’ ठेवण्यात आली आहे.

 

dubai-facts-marathipizza-04
venturesonsite.com

 

दुबईमध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनामधून काही बदल करण्यात आलेले आहेत. दुबई हा वाळवंटी प्रदेश आहे. त्यामुळे येथे कधीही वादळ येण्याची चिंता लोकांना भासत असते. दुबईमध्ये अंगाची लाहीलाही करणारे तापमान असते.

जर या शहरामध्ये सर्व वातानुकूलीत इमारती नसत्या तर या इमारतींच्या काचा देखील तडकून गेल्या असत्या. यावर उपाय म्हणून अभियंत्यांनी इमारती थंड ठेवण्यासाठी काही पाईप खालपासून वरपर्यंत जोडलेले आहेत आणि त्यांमध्ये सतत पाणी खेळते ठेवले जाते.

 

५. दुबई हे पृथ्वीवरील सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे.

 

dubai-facts-marathipizza-05
dailymail.co.uk

 

संपूर्ण जगात जेवढे बांधकाम होते त्यापैकी तब्बल २०% बांधकाम हे एकट्या दुबईमध्ये होते. हे शहर अतिशय जलद गतीने वाढत चालले आहे. काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, येथील इमारती वा इतर बांधकाम कोसळण्याची खूप शक्यता आहे.

२००९ मध्ये दुबईमध्ये सुरु करण्यात आलेले ४२ मेट्रो स्थानकांचे बांधकाम अवघ्या १८ महिन्यांमध्ये पूर्ण झाले. हेच बांधकाम इतर देशांमध्ये पूर्ण व्हायला किती वेळ लागला असता याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही.

दुबईमध्ये डिस्नी वर्ल्डच्या मनोरंजन पार्कपेक्षा दुप्पट मोठे असे एक पार्क बनवण्यात आले आहे. या मनोरंजन पार्कला रोज २,००,००० पेक्षा जास्त पर्यटक भेट देण्यासाठी येतात.

 

६. दुबईमध्ये ‘पत्ता यंत्रणा’ नाही. 

 

dubai-facts-marathipizza-06
akademifantasia.org

 

वर सांगितल्याप्रमाणे या शहराची झपाट्याने होणारी वाढ पाहता, येथील लोक आपला पत्ता सांगताना एखाद्या नकाश्याप्रमाणे कागदावर आपल्या घराचा नकाशा काढून स्वतःच्या घराचा पत्ता सांगतात, कारण तोंडाने पत्ता सांगणे या शहराच्या बाबतीत खूप किचकट गोष्ट आहे.

७. दुबईमध्ये रोबोट-उंट शर्यत ठेवली जाते. 

 

dubai-facts-marathipizza-07
1.blogger.com

 

उंटाची शर्यत हा या शहरामध्ये खूप लोकप्रिय खेळ आहे. अमेरिकेमध्ये जसा फुटबॉल खेळ प्रसिद्ध आहे तसाच येथे हा खेळ प्रसिद्ध आहे. पूर्वी या खेळामध्ये लहान मुलांचा समावेश होत असे, पण लहान मुलांना या खेळामध्ये खूप दुखापत होण्याची संभावना असायची, तसेच त्यांच्या जीवावर देखील बेतण्याची संभावना होती, म्हणून आता लहान मुलांना या खेळापासून दूर ठेवण्यात येते.

त्याऐवजी उंटावर लहान मुलांसारखे  रोबोट ठेवून या शर्यती सुरु ठेवण्यात आल्या आहेत. या उंटाच्या शर्यतीमध्ये लोक ३०० ते १०,००० डॉलर इतका खर्च करतात.

 

८.  दुबईत शहरामध्येच उभे राहत आहे अजून एक शहर

 

dubai-facts-marathipizza-81
kxcdn.com

 

नेहमी जगाला आश्चर्यचकित करून सोडणाऱ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध असललेल्या दुबईने आता दुबईमध्येच एक असे शहर बनवण्याचे काम सुरु केले आहे जेथील तापमान नियंत्रित करणे मनुष्याच्या हातात असेल. या शहराचे नाव अजूनही जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र येथे सुख सोयींची काहीही कमतरता नसेल एवढे मात्र नक्की…!

 

९. जगात सर्वोत्तम म्हणून आपला नावलौकिक व्हावा अशी दुबईची इच्छा

 

dubai-facts-marathipizza-09
247holiday.com

 

दुबई सर्वच गोष्टींमध्ये सर्वोत्तम होऊ इच्छित आहे आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल देखील सुरु आहे. दुबईमध्ये खूप मोठमोठे आरामदायी सप्त तारांकित हॉटेल्स आहेत, ज्यामध्ये लोकांना परमसुख प्राप्त होते.

दुबईमध्ये जगातील सर्वात मोठी बुर्ज खलिफा ही इमारत आहे. बुर्ज अल-अरब हे जगातील सर्वात ऐशोआरामी हॉटेल दुबईमध्ये आहे, जेथे कोणत्याही व्यक्तीला बुकिंग केल्याशिवाय आत घेतले जात नाही. या शहरामध्ये जगातील सर्वात मोठा मॉल आहे, सर्वात मोठे मत्सालय आहे आणि सर्वात मोठे इनडोअर स्की-पार्क सुद्धा आहे.

 

१०. दुबईमध्ये लग्नाआधी शरीर संबंध ठेवण्यास मनाई आहे.

 

dubai-facts-marathipizza-10
wikihow.com

 

दुबईमध्ये लग्नाआधी शरीर संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे बेकायदेशीर कृत्य केल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागतो किंवा तुम्हाला देशातून निर्वासित केले जाऊ शकते. असे नियम बहुतेक मुस्लिम देशांमध्ये आहेत. दुबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचा हात धरण्यास सुद्धा मनाई आहे.

तुम्ही बंद दरवाज्यामागे काय करता याच्याशी प्रशासनाला काहीही देणेघेणे नाही, मात्र सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही अनैतिक कार्य करताना आढळलात तर, तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

या आणि अशा अनेक कायद्यांसाठी दुबई प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे जाताना येथील कायद्याचा थोडाफार अभ्यास केलेला बरा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?