' मंगळ ग्रहाभोवती शनीसारख्या rings तयार होणार? – InMarathi

मंगळ ग्रहाभोवती शनीसारख्या rings तयार होणार?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

होय! येत्या 2 ते 4 कोटी वर्षांनंतर आपल्या मंगळ ग्रहाभोवती शनी ग्रहासारख्याच कडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

रिंग्ज असलेला मंगळ काहीसा असा दिसेल –

Mars with rings

Image source: sciencedaily

शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार मंगळ ग्रहाचा चंद्र ( सर्वात मोठा चंद्र) फोबोस (Phobos ) सध्या एका विचित्र परिस्थिती मधून जात आहे. जशी आपल्या चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वी वरच्या समुद्रावरील भारती आणि ओहोटी ला कारणीभूत आहे त्याच प्रमाणे मंगळ आणि फोबोस या दोघांमध्ये पण एक प्रकारची गुरुत्वाकर्षण शक्ती कार्यरत आहे. फोबोस त्याच्या orbit मधल्या बदलांमुळे मंगल ग्रहाच्या खूप जवळ जात आहे आणि मंगळाची गुरुत्वाकर्षण शक्ती त्याच्यावर प्रभाव पाडत आहे.

फोबोसचा फोटो:

Phobos

Image source: universetoday

 

फोबोस, आधीच बराचसा fractured अवस्थेत आहे. मंगळाच्या gravityच्या परिणामाची प्रक्रिया अहोरात्र चालू असल्या कारणाने शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की पुढील 20 ते 40 million वर्षांनी ( एक मिलियन म्हणजे दहा लाख) फोबोस फुटून मंगळाच्या आजुबाजूला रिंग्ज तयार होतील. आणि – ह्यामुळे मंगळ अगदी शनी सारखा दिसायला लागेल!

Unfortunately हे बघायला आपण नसू.

ह्या तयार झालेल्या रिंग्ज तिथून पुढील जवळपास १०० वर्षांपर्यंत राहतील आणि नंतर हळू हळू त्या मंगळाच्या बाहेरील वातावरणा मध्ये mix होऊन लुप्त होतील.

अवकाश किंवा अंतराळ खूप गमतीदार आणि अतर्क्य आहे, right?

 

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 24 posts and counting.See all posts by abhijit

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?