' आठवी नापास, पण तो आज आहे करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक! – InMarathi

आठवी नापास, पण तो आज आहे करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

शिक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.  म्हणूनच तर आपल्या मुलांना बालपणापासून उत्तम शाळेत शिकविण्यासाठी पालकांची खटपट सुरु असते.

मुलांच्या परिक्षा, त्यांचे मार्क्स याकडे पालकांचे लक्ष असते, ते यासाठीच.

पण आपण समाजात अश्या कितीतरी व्यक्ती बघतो, ज्या कमी शिकून सुद्धा आपल्या कलागुणांच्या जोरावर खूप मोठ्या झाल्या आहेत.

शिक्षण तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान देते, परंतु जीवनात मोठे होण्यासाठी आणि सक्षम होण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीमत्तेची गरज भासते. याच गोष्टीचा प्रयत्य देणारा एक मुलगा म्हणजे त्रिश्नीत अरोरा!

 

 

hacker-trishneet-arora-marathipizza01

 

त्रिश्नीतचे शिक्षण फक्त इयत्ता आठवीपर्यंतच झाले आहे.

त्रिश्नीत अरोराचे वय फक्त २१ वर्ष होते ज्यावेळी त्याने मल्टी – मिलियन डॉलरचा व्यवसाय सुरु केला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एवढ्या कमी वयामध्येच तो रिलायन्स, अमूल, एव्हॉन सायकल आणि इतर अनेक मोठमोठ्या कंपन्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम करतो.

सायबर जगतातील इंडियाचा मार्क झुकर्बर्ग म्हणून त्याची ओळख आहे. त्रिश्नीत टीएसी (TAC) सिक्युरिटीज या कंपनीचा प्रमुख आहे, ही सायबर सुरक्षा देणाऱ्या क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी आहे.

लुधियानामधील मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या आणि तेथेच लहानाचा मोठा झालेल्या त्रिश्नीतला लहानापासूनच कॉम्प्यूटरची भयंकर आवड होती.

वडिलांनी कॉम्प्यूटर विकत घेऊन दिल्यापासून सायबर विश्वाचे त्याला जे वेड लागले ते कायमचे!

पहिल्यांदा केवळ साध्या साध्या गोष्टींमध्ये रमणाऱ्या त्याच्या मनाला कॉम्प्यूटर सिक्युरिटी आणि हॅकिंने मोहात पाडले. विविध वेबसाईटस  तसेच युट्युबवरून त्याने जमेल तसे ज्ञान प्राप्त केलं.

निव्वळ हॅकिंगविषयी अधिक ज्ञान आणि भरपूर माहिती गोळा करण्यामध्ये त्याचा संपूर्ण वेळ तो घालवत असे आणि त्यात तो इतका रमून जात असे की त्याला अभ्यासाचे भानच राहत नव्हते, त्यामुळे तो आठवीमध्ये नापास झाला.

जेव्हा रिझल्ट समोर आला तेव्हा त्याच्यावर त्याचे मित्र हसू लागले, तसेच त्याच्या घरचे सुद्धा त्याच्यावर खूप रागावले.

पण त्रिश्नीत रडत बसला नाही, त्याला त्याचा मार्ग स्पष्टपणे दिसत होता.

त्याने ठरवले की, तो शाळा सोडून पूर्णवेळ आपल्या आवडीला म्हणजेच हॅकिंगला प्राधान्य देणार होता. त्याचबरोबर बाहेरून कोर्स करण्यासाठी त्याने प्रवेश देखील घेतला.

hacker-trishneet-arora-marathipizza02

 

त्रिश्नीतच्या मेहनतीला हॅकिंगच्या जगतामध्ये कोणीही गांभीर्याने घेते नव्हते. एकदा त्याच्या निदर्शनास आले की, बड्या प्रसिद्ध कंपनींचा डेटा चोरी होत आहे किंवा त्याचा गैरवापर होत आहे.

जेव्हा त्याने स्वतःच्या कौशल्याचा वापर करून हे बड्या कंपन्यांच्या निदर्शास आणून दिले, तेव्हा त्याला लोक गांभीर्याने घेऊ लागले आणि हॅकिंगच्या जगामध्ये त्रिश्नीत अरोरा हा ब्रँड तयार झाला.

वयाच्या फक्त २२ व्या वर्षी त्याने टीएसी (TAC) सिक्युरिटीची स्थापना केली, कारण त्याच्या हॅकिंगच्या कौशल्यामुळे त्याला रिलायन्स, सीबीआय, पंजाब पोलीस, अमूल, एव्हॉन सायकल, गुजरात पोलीस यांसारखे क्लायंट्स मिळाले.

एवढेच नाही तर त्रिश्नीतने हॅकिंग विषयी तीन पुस्तके सुद्धा लिहिली आहेत.

त्या पुस्तकांची नावे आहेत- हॅकिंग टॉक्स विथ त्रिश्नीत अरोरा, द हॅकिंग एरा आणि हॅकिंग विथ स्मार्ट फोन्स!

या पुस्तकांनी हॅकिंग शिकू इच्छिणाऱ्या  तरुण वर्गामध्ये धुमाकूळ घातला. त्याच्या पुस्तकांना केवळ भारतातच नाही तर जगभरात देखील मागणी आहे.

 

hacker-trishneet-arora-marathipizza03

हे खूप दुर्मिळ असे यश आहे. कारण ज्या व्यक्तीकडे केवळ ८ वी पर्यंतचे शिक्षण आहे, त्याच्यावर आज ५०० पेक्षा जास्त मोठ मोठे क्लायंट्स डोळे झाकून विश्वास ठेवतात.

त्याच्या आजवरच्या मेहनतीचे फळ म्हणजे त्रिश्नीतने थेट दुबई आणि युनायटेड किंगडमला आपले कार्यालय सुरु केले आहे. त्रिश्नीतच्या कंपनीचा सध्याचा टर्नओवर (उलाढाल) कोट्यावधी रुपयांचा आहे.

एखादा व्यक्ती जेव्हा आपले शिक्षण पूर्ण करून काम करण्यास सुरुवात करतो, त्या वयामध्ये त्रिश्नीतने बहु-दशलक्ष कंपनी निर्माण केली आणि जागतिक स्तरावर स्वत:चे नाव उंचावले. स्वत:ला अपयशी आणि निरुपयोगी समजणाऱ्या व्यक्तींसाठी त्रिश्नीत अरोरा म्हणजे बहुमुल्य आदर्श आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?