' रस्त्यांवर दिसणारे, विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात? – InMarathi

रस्त्यांवर दिसणारे, विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

जितकी धम्माल रेल्वेने प्रवास करताना येते त्यापेक्षा काहीशी जास्त मज्जा रस्त्याने प्रवास करता येते, या मताशी कदाचित तुम्ही देखील सहमत व्हाल, बस असो, कार असो वा आपली लाईफ पार्टनर असलेली बाईक असो.

कश्यानेही प्रवास करा, रस्त्यावरचा तो प्रवास संपूच नये असं वाटतं. तर मंडळी अश्या या अविस्मरणीय प्रवासादरम्यान तुम्ही देखील कितीतरी रस्ते पालथे घातले असतील.

या रस्त्यांवरून कितीतरी डोंगर, वृक्ष, गावे आणि मुख्य म्हणजे दगडांनी तुम्हाला सोबत दिली असेल. अहो दचकू नका, रस्त्यावर पडलेल्या दगडांबद्दल नाही तर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या अंतर दर्शवणाऱ्या दगडांची गोष्ट करतोय. ज्यांना आपण मैलाचे दगड म्हणूनही संबोधतो.

 

milestones-marathipizza01
nikhilmachcha.files.wordpress.com

बरं तर या दगडांबद्दल एक गोष्ट तुम्ही हेरली आहे का, या दगडांचा रंग वेगवेगळ्या रस्त्यांवर बदललेला आढळतो. कधी तुम्हाला पिवळ्या रंगाच्या पट्टीचे दगड दिसतात, तर कधी हिरव्या रंगाचे दगड दिसतात. चला जाणून घेऊया काय आहे या मागचे कारण!

पिवळ्या रंगाची पट्टी असलेले मैलाचे दगड:

milestones-marathipizza02
panoramio.com

हे दगड दर्शवतात की तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) प्रवास करत आहात. या रंगाचे मैलाचे दगड केवळ राष्ट्रीय महामार्गावरच आढळून येतात.

 

हिरव्या रंगाची पट्टी असलेले मैलाचे दगड:

 

milestones-marathipizza03
ak2.picdn.net

हे दगड दर्शवतात की तुम्ही राज्य महामार्गावरून (State Highway) प्रवास करत आहात. हे महामार्ग राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.

 

निळ्या किंवा काळ्या रंगाची पट्टी असलेले मैलाचे दगड: 

 

milestones-marathipizza04
nikhilmachcha.files.wordpress.com

तुम्ही ज्या रस्त्यावरून जात आहात आणि तेथे तुम्हाला निळ्या किंवा काळ्या रंगाची पट्टी असलेले मैलाचे दगड दिसले की समजून जायचं आपण एखाद्या शहराच्या किंवा जिल्ह्याच्या दिशेने जात आहोत. हे रस्ते जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत येतात.

 

नारंगी रंगाची पट्टी असलेले मैलाचे दगड:

 

milestones-marathipizza05
masterbuilder.co.in

जो रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात आला आहे त्यावर असे नारंगी रंगाची पट्टी असलेले मैलाचे दगड आढळून येतात.

तुम्हाला ही माहिती रंजक वाटली तर नक्कीच शेअर करा आणि इतरांनाही सांगा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?