द ग्रेट खली ला “सैराट” चं वेड लावणाऱ्या मराठी मुलाची गोष्ट !
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
दलीप सिंग राणा अर्थात द ग्रेट खली ह्याचा ‘सैराट’ ची प्रशंसा करणारा व्हिडियो मध्यंतरी नेटवर व्हायरल झाला होता. ह्यात खली ‘सैराट’ चं संगीत आवडल्याचं सांगतो आणि लोकांनासुद्धा एन्जॉय करण्याचं आवाहन करतो.
मात्र, ज्या माणसामुळे हा सगळा योगायोग घडून आला त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
जाणून घ्यायचंय त्याच्याबद्दल?
व्हीडीयोत खली कुणा ‘बारूद’चा उल्लेख करतोय. व्हीडीयोत खलीच्या मागे दिसणारा हा ‘बारूद’ म्हणजे दुसरा तिसरा कुणीही नसून अस्सल मराठमोळा गडी, पुण्याचा संदीप तिकोणे हा आहे. बारूद हे त्याचं ‘ring name’ आहे.
The Longest Yard, Get Smart, MacGruber सारख्या हॉलीवूडपटांमध्ये भूमिका केलेला खली एका कार्यक्रमासाठी पुण्यात आला असताना संदीपने त्याला मराठी चित्रपट, त्यांचं वेगळेपण ह्याबद्दल सांगीतलं आणि सध्या महाराष्ट्रात सगळीकडे चर्चेत असणार्या ‘सैराट’चं ट्रेलर दाखवलं तसंच चित्रपटातली काही गाणीसुद्धा ऐकवली.
भाषा समजत नसूनही खलीलासुद्धा ते आवडलं आणि तेच तो व्हीडीयोत सांगतोय. ह्यावेळी संदीपला त्याचा मित्र आणि दिग्दर्शक मयूर हांडे ह्यानेदेखील मदत केली.
पहिला मराठी Prowrestler
महाराष्ट्राला कुस्ती, मल्ल विद्या ह्यांची फार जुनी परंपरा असली तरी Prowrestling हा प्रकार आपल्याकडे अजून फारसा रूजलेला नाही. (अजूनही बरेच लोक ह्याचा उल्लेख WWE/WWF असाच करतात.) अश्या वातावरणात एक मराठमोळा तरुण परदेशात जाऊन हे शिक्षण घेऊन येतो हे खरंच कौतुकास्पद आहे.
आंतरराष्ट्रीय करिअर
संदीपने ह्याआधी WWE खालोखाल दुसरा क्रमांक असणार्या Total Nonstop Action (TNA) आणि द. आफ्रिकेच्या World Wrestling Professionals (WWP) ह्या आंतरराष्ट्रीय prowrestling प्रमोशन्स सोबतसुद्धा काम केलंय.
WWP च्या ‘100% De Dana Dan’ ह्या कार्यक्रमात संदीपचं ‘गण्या झोकर’ हे Ring name होतं. TNA च्या ‘रिंग का किंग’ मध्ये संदीपचा ‘बारूद’ ह्या नावाने सहभाग होता. ह्यावेळी त्याला Monster Abyss, Chavo Gurrero, Sonjay Dutt, Nick ‘Eugene’ Dinsmore अश्या अनेक आंतरराष्ट्रीय सुपरस्टार्स सोबत काम करण्याची संधी मिळाली.
आपल्याला माहित नसलेला असा हा अस्सल मराठी हिरा: संदीप तिकोणे!
आणि हो – खली चा “सैराट” व्हिडीयो बघायचा असेल तर…हा इथे बघा :
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi