फुकटात मिळणाऱ्या जिओच्या 4G फोन बद्दल जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेल्या सर्व गोष्टी!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
भारतीय इतिहासातील या २१ व्या शतकातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे जिओचा जन्म होय! मुकेश अंबानींच्या हातून साकार झालेल्या या क्रांतीने समस्त भारतीयांचे जवान बदलून टाकले. फुकट कॉलिंग, फुकट मेसेजिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुकट इंटरनेट. अगदी २-४ वर्षांपूर्वी फुकट इंटरनेट मिळणे ही गोष्ट साममान्य माणसाला स्वप्नवत वाटायची. फुकट इंटरनेट थोडी न कोण देणार? असं म्हणून आपण ज्या गोष्टीची खिल्ली उडवायचो, ती गोष्ट रिलायन्स टेलीकॉमच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली आणि इतर सर्व टेलीकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले.
जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळ जिओ ने कॉलिंग, मेसिजिंग आणि इंटरनेट फुकट दिलं, पण यात एकच कमीपणा होता तो म्हणजे जिओ फक्त 4G मोबाईल फोन वर चालवता येते आणि 4G मोबाईल फोन तुलनेने काहीसे महाग, त्यामुळे समाजात अजूनही असा गट आहे, जो जिओचा वापर करत नाही आणि आपल्या पारंपारिक टेलीकॉम कंपनीचीच सेवा वापरतो आहे. त्यांनाच टार्गेट करण्याच्या उद्देशाने रिलायन्स जिओ घेऊ येत आहे एक असा फोन जो तुम्हाला फुकटात मिळणार आहे..अहो खरंच अगदी फुकटात आणि सोबत कॉलिंग, मेसेजिंग आणि इंटरनेट देखील अनलिमीटेड आहेच ते देखील अगदी नगण्य किंमतीत.
रिलायन्स इंडस्ट्री च्या ४० व्या वार्षिक मेळाव्यात मुकेश अंबानी यांनी हि ऐतिहासिक घोषणा केली. हा फोन फुकट तर मिळणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला १५०० रुपये सिक्युरिटी डीपोझीट म्हणून जमा करावे लागणार आहेत. जे ३ वर्षानंतर तुम्हाला परत मिळणार आहेत. म्हणजे पाहायला गेलं तर हा फोन ३ वर्षांसाठी फुकटच मिळणार आहे.
हा फोन घेतल्यावर तुम्हाला फक्त १५३ रुपयांमध्ये मध्ये एका महिन्यासाठी अनलिमीटेड इंटरनेट आणि वॉइस कॉलिंग देखील मिळणार आहे. सोबतच केवळ ५४ रुपयां मध्ये ७ दिवस मोफत इंटरनेट आणि कॉलिंग तर २४ रुपयां मध्ये २ दिवस मोफत इंटरनेट आणि कॉलिंग देण्यात येणार आहे.
जिओ 4G फोनची घोषणा करतान मुकेश अंबानी म्हणाले की,
देशातील ५० कोटीपेक्षा जास्त जनता आजही इंटरनेट पासून दूर आहे, आमचा प्रयत्न आहे की देशातील प्रत्येक गरीब व्यक्तिला परवडणार्या दरात इंटरनेटची सेवा द्यावी. सोबतच या फोन वर वॉइस कॉलिंग कायमस्वरूपी मोफत देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
वैशिष्ट्ये:
२.४ इंच आकार डिस्प्ले
4G VoLTE फोन
५१२ MB रॅम
४GB इंटर्नल मेमोरी
२ मेगा पिक्सल कॅमेरा
2000mAh बॅटरी क्षमत
ब्लुटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग
Jio Tv, Jio Music, Jio Cinema यांसारख्या सुविधा
iPhone सारखा स्वतंत्र प्लॅटफॉर्म
जिओ फोनचं बेटा व्हर्जन स्वातंत्र्यदिना दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी सादर करण्यात येईल. फोनचं प्री बुकिंग करायचं असल्यास २४ ऑगस्टपासून Myjio App वर किंवा रिलायन्स स्टोअरमध्ये जाऊन करता येईल.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page