ब्रेन हॅमरेज नेमका कसा होतो? ज्यामुळे एका कलाकाराला आपला जीव गमवावा लागला?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोणाच्याही जीवाचा काही भरोसा नाही. या जगाचा कोण कधी निरोप घेईल, याचा कोणी अंदाजही घेऊ शकत नाही. आधी सिद्धार्थ शुक्ला आणि आता दिपेश भान. एका झटक्यात लोकांचं असं निघून जाणं अत्यंत धक्कादायक आहे.
‘भाभीजी घर पर हैं’ याचे फेम अभिनेता दीपेश भानच्या निधनाच्या बातमीने एकूणच सर्वांना धक्का बसला आहे. दिपेश अवघा ४१ वर्षांचा होता. शोमध्ये मलखानची भूमिका करून जगाला खळखळून हसवणारा दीपेश असा अचानक जगाचा निरोप घेईल, असं कुणालाच वाटलं नसेल.
शनिवारी २३ जुलाई ला तो व्यायाम करून जिममधून घरी परतला होता, परंतु उशीर झाल्यामुळे शोच्या शूटिंगला न जाता तो मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला. सुरूवातीला तर तो उत्तम खेळत होता. परंतु मग अचानक त्यांची तब्येत बिघडू लागली आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला.
यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना रुग्णालयात नेलं परंतु रुग्णालयात नेण्यापूर्वीच दिपेशचा मृत्यू झाला होता. दिपेशच्या मृत्यूमुळे फिल्म इंडस्ट्रीला एक मोठा धक्का बसला आहे. दिपेशच्या मृत्यूचं कारण म्हणजे ब्रेन हॅमरेज, सध्या यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याविषयी आपल्याला पूर्ण माहीती असणं अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्रेन हॅमरेजबद्दल…
ब्रेन हॅमरेज म्हणजे नेमकं काय :-
ब्रेन हॅमरेज हे आपल्या मेंदूशी संबंधित आहे. ब्रेन हॅमरेज ही स्थिती आपल्या मेंदूमधील धमनी (हृदयातून शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त वाहून नेणाऱ्या नळ्या) फुटल्यामुळे उद्भवते. या स्थितीत आपल्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव सुरू होतो, रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात. तसेच, यामुळे मेंदूच्या अनेक भागांचं नुकसान होऊ शकतं. सोप्या शब्दात मेंदूतील रक्तवाहिनी फुटणे याला ब्रेन हॅमरेज म्हणतात.
ही समस्या साधारणपणे उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये, मोठ्या प्रमाणात औषधींचे सेवन करणारे आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना होण्याची शक्यता असते.
ब्रेन हॅमरेजचे लक्षण :-
डॉक्टरांच्या मते, ब्रेन हॅमरेजमध्ये अनेक प्रकारची लक्षणं दिसू शकतात, ज्याची वेळीच ओळख करून रुग्णाला तातडीने डॉक्टरांकडे नेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे लोकांना अचानक मुंग्या येणे, अशक्तपणा, सुन्नपणा येऊ शकतो. याशिवाय चेहरा, हात किंवा पाय यांना अर्धांगवायूचा झटका लागू शकतो. लक्षणं वेळेवर ओळखणे सर्वात महत्वाच आहे, अशा परिस्थितीत, विशेष खबरदारी घ्या. काही लक्षणे पुढीलप्रमाणे :-
● अचानक तीव्र डोकेदुखी.
● अन्न गिळण्यात अडचण येण.
● दृष्टी समस्या निर्माण होणं.
● शरीरामध्ये समतोल किंवा समन्वयाचा अभाव.
● एकूण गोंधळ होणं किंवा गोष्टी समजून घेण्यात अडचण.
● बोलण्यात अडचण होणं किंवा नीट बोलण्यात असमर्थता.
● सुन्नपणा, सुस्ती किंवा बेहोशी.
● झटके येणं.
ब्रेन हॅमरेज होण्यामागची कारणं :-
ब्रेन हॅमरेज होण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यातील प्रमुख कारण आज आपण जाणून घेऊया :-
● डोक्याला दुखापत.
● उच्च रक्तदाबाची समस्या असणं
● धमनीचा बाह्य भाग कमकुवत असणं
● धमनीला सूज असणं
● रक्ताशी संबंधित कोणत्याही आजाराने ग्रस्त (हिमोफिलिया, प्लेटलेट्सची कमतरता, स्किल सेल अॅनिमिया इ.)
●मेंदूतील ट्यूमर.
● यकृत रोग इ.
ब्रेन हॅमरेज पासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या काही टिप्स :-
● उच्च रक्तदाब असल्यास त्यावर नियंत्रण ठेवणं . जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्यावर वेळेवर उपचार करा. दररोज व्यायाम करा आणि नियमितपणे बीपी तपासत रहा.
● धूम्रपान करणाऱ्यांच्या शरीरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि परिणामतः ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे धूम्रपानापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
–
भूक लागल्यावर हे १० पदार्थ वाट्टेल ते खाल्लेत, तरीही वजन वाढीची चिंता सतावणार नाही
बॉडी कमवायचीये? फिट व्हायचंय? फक्त प्रोटीनवर अवलंबून राहू नका!
–
● मेंदूला इजा झाल्यास मेंदूतील रक्तस्राव होऊ शकतो. अशा परिस्थितीत वाहन चालवताना नेहमी हेल्मेट घालायला विसरू नका.
● छोट्या छोट्या आजारांवार वारंवार औषधे घेणे टाळा. शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यावरच औषधे घ्या.
ब्रेन हॅमरेज ही एक जीवघेणी स्थिती आहे. त्यामुळे जर आपल्याला याची कुठलीही लक्षणे दिसली तर त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. त्याच वेळी, आपली जीवनशैली निरोगी ठेवा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. सोबतच लक्षात ठेवा की शरीरात उद्भवणार्या कोणत्याही रोगावर आणि आजारावर स्वत:हून उपचार करू नका. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तुमचे उपचार करा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.