' डिसी आणि मार्व्हलच्या कॉमिक इतकीच क्रेज एकेकाळी चाचा चौधरीची होती! – InMarathi

डिसी आणि मार्व्हलच्या कॉमिक इतकीच क्रेज एकेकाळी चाचा चौधरीची होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कॉमिक्स हा प्रत्येक पिढितल्या बालवाचकांचा आवडता प्रकार राहिला आहे. चित्रकथीच्या स्वरुपातील या गोष्टी आणि त्यातली पात्रं घराघरातल्या बाल वाचकांच्या जगाचा एक भाग असतात. आज टेलिव्ह्जिनच्या पिढीत भलेही कॉमिक्स वाचन कमी झालेलं आहे मात्र यातलीच अनेक पात्रं आजही मोठ्या पडद्यावर अजरामर आहेत.

अनेक परदेशी सुपरहिरोमध्ये आपलं स्थान बनवलेल्या आणि दोन पिढ्यांना वेड लावलेल्या अस्सल भारतीय सुपरहिरोचं नाव आहे, चाचा चौधरी!

 

chacha chaudhary IM

 

आज जी पिढी चाळीशी, पन्नाशीत आहे त्यांच्या बालपणीचा रविवार म्हणजे आनंदाचा वार असायचा कारण आजच्या पिढीसारखा विकेंड हॉबी क्लासेसचा ससेमिरा त्यांच्यामागे नसायचा.

रविवार म्हणजे आवडता नाष्टा, भरपूर दंगा आणि दूरचित्रवाणीवरच्या कार्यक्रमांचा खजिना. यावर कळस म्हणजे दुपारी कॉमिक्स वाचनाची घरातून मिळालेली मुभा. पाश्चिमात्य कॉमिक्सनी जगभरातल्या वाचकांना भुरळ घातल्याचा तो काळ होता.

अशातच एक अस्सल भारतीय कॉमिक्स आहे आणि त्यानं बघता बघता वाचकांचा ताबा घेतला. अबालवृध्दांचा लाडका हिरो, चाचा चौधरी अजरामर झाला. आजही त्याची आठवण काढणारे वाचक आहेत.

१९७० च्या दशकात इंग्रजी भाषेतील कॉमिक्स आणि त्यातले सुपर हिरो यांनी जगभरातल्या वाचकांना मोहिनी घातली होती. भारतातही कॉमिक्स वाचकांची संख्या मोठी होती मात्र भारतीय सुपरहिरोही कॉमिक्समधून भेटिला येऊ शकतो याची कल्पनाही भारतीय वाचकांनी केलेलि नव्हती.

अशातच लोटपोट या हिंदी मासिकातून कॉमिकबुक मालिका सादर होऊ लागली. अल्पावधीतच याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि बघता बघता घराघरात या कॉमिक मालिकेतील हिरो, चाचा चौधरी लोकप्रिय झाले.

 

lotpot IM

 

एरवी जे सुपर हिरो असत ते वयानं तरूण असत आणि आपल्या अचाट अमानवी शक्तींच्या मदतीनं मनुष्य जातीवर आलेल्या संकटांना ते चुटकीसरशी दूर करत असत. चाचा चौधरींचं वेगळेपण त्यांच्या दिसण्यापासूनच सुरु होतं.

लाल पगडी, हातात काठी, भारदार पांढर्‍या मिशा असणार्‍या चाचा चौधरींकडे इतर हिरोंप्रमाणे कोणत्याही जादुई शक्ती नव्हत्या मात्र तल्लख मेंदूतून असे एक एक नामी उपाय निघत असत की कोणतिही समस्या ते बघता बघता सोडवत असत.

घरातील एखाद्या वडीलधार्‍या व्यक्तीसारखे चाचा चौधरी वाटत असत. त्या काळच्या समाजात कुटुंबातील ज्येष्ठांना असाच मान मिळत असे. केवळ कुटुंबातच नव्हे तर आजूबाजूच्या कोणालाही काहिही समस्या असेल तर सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी ते अशा एखाद्या अनुभवी, वडीलधार्‍या व्यक्तीकडे जात असत.

अगदी नेमकी अशीच व्यक्ती चाचा चौधरींच्या रुपानं अवरतल्यानं वाचकांनी अगदी आपल्या घरातल्या सदस्यासारखी आपुलकी या काल्पनिक पात्रालाही दिली. त्या काळात मनोरंजनाची फ़ार मोजकी साधनं उपलब्ध होती. प्राण यांच्या चाचा चौधरी और साबू नावाच्या कॉमिक्सनं अबालवृध्दांना मनोरंजनाचं एक नविन दालन उघडून दिलं.

 

chacha chaudhary and sabu IM

 

या कॉमिक्सची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की लोक नुसतेच त्याचं वाचन करत नसत तर त्यावर गावोगावच्या पारांवर गप्पांचेर फ़डही जमत असत. चाचा चौधरी, बिल्लू, रमन, चन्नी चाची, पिंकी अशी अनेक पात्रं घरोघरीच्या गप्पांचा विषय बनली.

चाचा चौधरींसारख्या अमर पात्राला जन्म देणार्‍या व्यक्तीचं नाव आहे, प्राणकुमार शर्मा. व्यवसायानं व्यंगचित्रकार असणार्‍या प्राण यांचा जन्म लाहोर जवळील कसूर गावात झाला. फ़ाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात स्थलांतरीत झालं आइ मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात स्थायिक झालं.

शालेय शिक्षण झाल्यानंतर प्राणकुमार शर्मा मुंबईतील प्रसिध्द जे जे स्कूल ऑफ़ आर्ट मधे दाखल झाले. फाईन आर्ट्सची पदवी घेऊन ते बाहेर पडले, याव्यतिरिक्त राज्यशास्त्र विषयाची मास्टर्स पदविही त्यांनी घेतली. त्यांनी वृत्तपत्रातून व्यंगचित्रकार म्हणून नोकरी केली. या दरम्यानच त्यांनी डब्बू नावाचं पात्र निर्माण केलं.

चाचा चौधरींच्या पात्राची बिजं कुठेतरी डब्बूच्या जन्मातही आहेत. प्राण यांच्या कल्पनेतून चाचांचा जन्म झाला. हे पात्र इतकं लोकप्रिय झालं की २०२१ साली केंद्र सरकारच्या नमामि गंगे या उपक्रमाचे शुभंकर म्हणून त्याची निवड करण्यात आली.

 

pran IM

 

२००२ साली या पात्रा छोट्या पडद्यावरही आणण्यात आलं. लोकप्रिय अभिनेता रघुवीर यादव यांनी चाचा चौधरींची भूमिका साकारली. ४१५ भागात ही मालिका प्रसारित करण्यात आली. या कॉमिक्सचे दहाहून अधिक भारतीय भाषांत अनुवाद करण्यात आले आहेत.

२०१४ साली चाचांच्या जनकाचे, प्राण यांचे निधन झाले मात्र चाचांच्या रुपाने ते भारतीय बालसाहित्यात अमर झाले आहेत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?